१२ लाखांची साखर परस्पर विकली; गुन्हा दाखल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

भोकरदन : तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहच न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका ट्रान्सपोर्टचालकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हातकणंगले येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सिद्धेश्वर शिवाजी होनमाने (रा. यादववाडी कुलाची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) असे तक्रारदाराचे नाव आहे.

होनमाने यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, अंबिका रोडलाईन्स यांनी तुमची साखर जालना येथे घेऊन जायची आहे का, असे सांगून तुमचा ट्रक घेऊन दालमिया भारत शुगर फॅक्टरी हरसुली पोरली  (ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर) येथे बोलावले. या ठिकाणी त्यांनी ५० किलो वजनाच्या ६०० साखरेच्या गोण्या त्यांच्या ट्रकमध्ये भरल्या व त्या गोपालपूरम श्री सर्वाया शुगर आंध्रप्रदेश येथे पोहचविणे आवश्यक होते.” मात्र त्यांनी १४ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान भोकरदन येथील नंदनवन हॉटेलजवळील एचपी पेट्रोल पंपाजवळ ३०० बॅग उतरविल्या व राहिलेल्या ३०० बॅग या केदारखेडा येथील रोडलगत असलेल्या गोडाऊनमध्ये उतरवून टाकल्या आणि पोबारा केला. साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहचलीच नाही. त्यामुळे साखर मालकाची फसवणूक करून तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपयांची साखर परस्पर विक्री केली. त्यानुसार १७ एप्रिल रोजी रात्री भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक साग शिंदे हे करीत आहेत.

तालुक्यात घटनेची चांगलीच चर्चा..!

तब्बल साडेबारा लाखाची साखर गायब केल्याच्या घटनेची चांगलीच चर्चा तालुक्यात पसरली आहे. संबंधित व्यक्तीने तालुक्यातील कोणाला साखर विक्री केली? यावरही खरमरीत चर्चा सुरू असून, भोकरदन पोलिसांच्या तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »