हंगाम आढावा: २४, २५ रोजी साखर संकुलात बैठका

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : यंदाच्या साखर हंगामाबाबत आढावा घेऊन अंदाज जाहीर करण्यासाठी येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी पुण्यातील साखर संकुलात विभागनिहाय महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन केले आहे. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका होतील.

यासंदर्भात साखर संचालक (प्रशासन) राजेश सुरवसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गाळप हंगाम २०२३-२४ मधील गाळप सुरू झालेले असून ऊस गाळपाचा व साखर उत्पादनाचा दुसरा अंदाज करण्याकरिता सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या मुख्य शेती अधिकारी / केन मॅनेजर यांची आढावा साखर आयुक्तालय येथील सभागृह, चौथा मजला येथे आयोजित केलेली आहे. सर्व कारखान्यांच्या मुख्य शेती अधिकारी / केन मॅनेजर यांनी वेळेवर नमूद केलेल्या विषयांच्या माहितीसह हजर राहाणेबाबत आपले स्तरावरुन संबधिताना सूचना देण्यात याव्यात. तसेच सर्व प्रादेशिक सहसंचालक (साखर), यांनी विभागाच्या एकत्रित माहितीसह उपस्थित राहावे.

sugar meetings

विषय सूची
१) गाळप हंगाम सन २०२३-२४ मध्ये नोंद झालेले ऊस क्षेत्र, आजअखेर झालेले गाळप व होणारे संभाव्य गाळप,
२) सद्यस्थितीत कारखाना कार्यक्षेत्रात येत असलेली सरासरी ऊस उत्पादकता (टन प्रति हेक्टर) व हंगाम अखेरील संभाव्य ऊस उत्पादकता (टन प्रति हेक्टर)
३) ऊस तोडणी करीता पैशाची मागणी होत असल्यास कारवाई करण्याबाबत या कार्यालयाने दिनांक ०८/१२/२०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणूक केल्याबाबतचे पत्र
४) कारखान्याचा हंगाम बंद होण्याची अपेक्षित तारीख
५) कारखान्यांनी सभासदांकारिता ऊस विकासाच्या दृष्टीने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम
६) सध्या कारखान्याकडे असलेल्या एकूण उस तोडणी यंत्रांची संख्या व त्यापैकी कार्यरत असलेल्या यंत्रांची संख्या.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »