राज्यात रोज दहा टन लाख ऊस गाळप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप हंगाम चालणार

पुणे : सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात सर्व साखर कारखान्यांचे मिळून रोज सरासरी दहा लाख टन ऊस गाळप होत आहे. या महिन्यापासून गळितास येणाऱ्या उसाला साखर उतारा वाढण्याची अपेक्षा आहे, असे साखर आयुक्त कार्यालयातून समजले.

राज्यात 96 सहकारी आणि 99 खासगी मिळून 195 साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. या हंगामात आतापर्यंत 402 लाख टन ऊसगाळप पूर्ण झाले आहे आणि ३५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या ऊसगाळप हंगामात 28 डिसेंबरअखेर 102 सहकारी आणि 99 खासगी मिळून 201 साखर कारखान्यांनी 478 लाख टन ऊसगाळप पूर्ण केले आहे, तर 9.32 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 44 लाख 65 हजार टनाइतके साखर उत्पादन तयार केले होते. म्हणजे यंदा आतपर्यंत 76 लाख टनांनी ऊसगाळप कमी झाले आहे.

राज्यात कोल्हापूर विभागातील ऊसगाळप पुणे विभागापेक्षा तुलनेने कमी आहे. या विभागात 84.11 लाख टन ऊसगाळप पूर्ण झाले आहे. मात्र, साखर उत्पादन आणि उतार्‍यातील कोल्हापूर विभागाची आघाडी कायम आहे. या विभागाचा साखर उतारा 10.09 टक्क्यांइतका सर्वाधिक असून, सुमारे 84.88 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झाले आहे.

पुणे विभागातील 29 कारखान्यांनी 92 लाख टन ऊसगाळप पूर्ण केले असून, 9.09 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 83.68 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. सोलापूर विभागात 87.06 लाख टन ऊसगाळप, तर 8.12 टक्के उतार्‍यानुसार 70.71 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे. विभागनिहाय ऊसगाळप पाहता अहमदनगरमध्ये 51.66 लाख टन, औरंगाबाद 38.02, नांदेड 45.59, अमरावती 3.48, नागपूरमध्ये 0.83 लाख टनाइतके ऊसगाळप पूर्ण केले.

राज्यात अद्याप 518 लाख टन उसाचे गाळप पूर्ण होणे बाकी आहे. सद्यस्थितीत दहा लाख टन प्रतिदिन या सरासरीनुसार फेब्रुवारी महिनाअखेर ऊसगाळप सुरू राहील, असा अंदाज आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »