ऊस तोडणी मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; ४ ठार, १० जखमी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर गावी परतत असलेल्या ऊस तोड कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने भीषण धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला, एका बालिकेसह चार जण जागीच ठार झाले.

रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या या अपघातात १० जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील आगळगाव फाट्यावर उभा असणाऱ्या रस्त्याकडेला नादुरुस्त झालेल्या ट्रॅक्टरला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला.

दत्त कारखाना शिरोळ येथील ऊस तोड संपल्याने मंगळवेढा तालुक्यातील ऊस तोड कामगारांना सोडण्यासाठी ट्रॅक्टर जात होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्या नजिक ट्रॅक्टर (केए २८ टीबी ३५६९) आला असता ट्रॅक्टरचा बेल्ट तुटल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा करून दुरुस्तीचे काम सुरू होते.

दरम्यान या उभा असणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून मालवाहू ट्रक (एपी ३९ युएम ५३८८) या वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये शालन दतात्रय खांडेकर (वय ३४ रा.सीरनांदगी) लगमा तामराया हेगडे (वय ३५) दादा आप्पा आयवळे (वय १७) व निलाबाई परशुराम आयवळे (वय ३, सर्व रा. चिखलगी ता. मंगळवेढा जि. सोलापूर) हे जागीच ठार झाले.
जिल्ह्यातील कवठे-महांकाळ तालुक्यातील बागौर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर नागज फाटा येथे मंगळवारी पहाटे हा अपघात झाला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »