८१ साखर कारखान्यांची ४० कोटींची फसवणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

विधान परिषदेत तारांकित प्रश्न

नागपूर : गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक झाली आहे, अशी माहिती सरकारने विधान परिषदेत दिली.

भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न मांडला होता.

माढा तालुक्यातील बेंबळे येथील ऊस वाहतूकदार प्रशांत भोसले हे मध्यप्रदेशात ऊसतोड मजूर आणायला गेले असता तेथे आर्थिक फसवणूक करून त्यांची हत्या झाली होती. याच अनुषंगाने राज्यातील साखर कारखान्यांची, ऊस वाहतूकदारांची ऊसतोड मजूर व मुकादमांकडून होणाऱ्या फसवणुकीचा प्रश्न आमदार मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत मांडला.

गाळप हंगाम २००४ ते २०२० या १६ वर्षांच्या कालावधीत राज्यातील ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मुकादमांकडून ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांची फसवणूक झाल्याचे सरकारने लेखी उत्तरात नमूद केले.

ऊसतोड मजूर व मुकादमांकडून ऊस वाहतूकदार व साखर कारखानदारांच्या होत असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्याबाबत

तसेच ऊसतोड मजूर व मुकादमांची गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर कल्याण महामंडळाकडे नोंदणी करून महामंडळामार्फत ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे मागील तीन वर्षे ऊसतोड कामगार म्हणून काम करीत असतील, त्यांची संबंधित गावच्या ग्रामसेवकाने विहित नमुन्यात नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »