उत्तर प्रदेशात उसाचा दर आता ३७०० रु.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात उसाच्या ‘एसएपी’ प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे राज्यात उसाचा दर आता प्रति टन ३७०० रुपये झाला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी पत्रकारांना माहिती दिली की, उसाच्या दरात प्रतिक्विंटल 20 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सुरु प्रकाराला आता 370 रुपये प्रति क्विंटल, तर सामान्य वाणासाठी दर 360 रुपये असतील.
पूर्वी, सुरु ऊसाची खरेदी किंमत 350 रुपये प्रति क्विंटल होती, तर सामान्य वाणाची 340 रुपये प्रति क्विंटल होती.
2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने उसाच्या एसएपीमध्ये 25 रुपये प्रति क्विंटल वाढ केल्यावर हे दर लागू झाले. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने पिकासाठी घोषित केलेल्या रास्त आणि मोबदला किंमत (FRP) व्यतिरिक्त, साखर उत्पादक राज्यांच्या सरकारांद्वारे विशिष्ट प्रदेशातील उत्पादन खर्चावर आधारित SAP निश्चित केला जातो.

चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, आदित्यनाथ सरकारने गेल्या सहा वर्षांत उसाच्या किमतीत प्रति क्विंटल ५५ रुपयांनी वाढ केली आहे. 2017 मध्ये उसाचा दर 315 रुपये प्रति क्विंटल होता आणि मागील सरकारच्या काळात राज्यातील साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर होते.
ते म्हणाले, यूपीमध्ये 42 लाख कुटुंबे आणि 45 लाख मजूर ऊस लागवडीत गुंतलेले आहेत.

रू. ३९१० प्रति क्विंटलसह पंजाब उसाच्या दरात देशात आघाडीवर आहे, तर हरियाणा ३८६० दरासह दुसऱ्या स्थानी आहे. पुढील हंगामासाठी रू. ४००० दर देण्याची घोषणा हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आधीच केलेली आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये उसासाठी ‘एसएपी’ (स्टेट ॲडव्हाझरी प्राइस) जाहीर करण्याची पद्धत आहे. दरम्यान, पंजाबच्या शेतकऱ्यांनी रू. ४५० प्रति क्विंटल दर द्यावा, अशी मागणी केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »