राज्यातील ऊस वाहतूक नियमावली जाहीर; उल्लंघन केल्यास कारावास!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यातील आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त संजय कोलते यांनी ऊस वाहतुकीसंदर्भात नवी नियमावली नुकतीच जाहीर केली आहे. या नियमावलीचे सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

साखर आयुक्तांनी केंद्र सरकारचा ‘दि ट्रान्स्पोर्ट ऑफ अॅनिमल्स ऑन फूट रुल्स’, ‘दि. प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ड्रॉट अॅण्ड पॅक अॅनिमल्स रुल्स’ अंतर्गत आयुक्तांनी या सूचना दिल्या आहेत.

काय आहे नियमावली?

-बैलगाडीतून उसाची वाहतूक करताना बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येऊ नये.

-क्षमतेपेक्षा जास्त वजन लादू नये.

-सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पशुधनाची ने-आण करू नये.

-नियमानुसार जनावरांना दिवसभरातून नऊ तासांहून अधिक काळ वाहतूक करू देऊ नये.

-तापमान ३७ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल, अशा ठिकाणी दुपारी १२ ते ३ या वेळेमध्ये बैलांना विश्रांती देण्यात यावी.

-३० किलोमीटर दिवस किंवा आठ तास आणि खाण्यापिण्यासाठी चार किलोमीटर प्रती दोन तास या पलीकडे प्राण्यांची पायी ने-आण करता येणार नाही.

-आजारी, जखमी, कुपोषित आणि जास्त वय असलेल्या बैलांचे स्वास्थ्य उचित राहावे, यासाठी त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात यावी. यासाठी स्थानिक पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने कारखाना परिसरात एक पशुवैद्यक व एका साहाय्यकाची सेवा उपलब्ध करून घ्यावी.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »