ऊस वाहतूकदाराला तब्बल १० लाख रुपयांचा गंडा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : ऊसतोड कामगार पुरविण्याचा बहाणा करून एका वाहतूकदाराला  तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वाशिम जिल्ह्यातील संशयिताविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लक्ष्मण आडे (रा. कुहा, ता. रिसोड, जि. वाशिम)  असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रावसाहेब वाळकृष्ण कदम (तुंग, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित संदीप आडे याने रावसाहेब कदम या ऊस वाहतूकदाराला ऊस गळीत हंगामासाठी दहा पुरुष आणि दहा महिला पुरवितो, असे सांगितले होते. त्यासाठी त्याने तब्बल १० लाख रुपये उचल घेतली. पाच लाख पाच हजार रुपये रोखीने, तर चार लाख ९५ हजार रुपये ऑनलाईन बँकेद्वारे घेतले होते. पण दहा लाख रुपये देऊनही संदीप आडेने कामगार पुरविले नाहीत. रावसाहेब कदम यांनी वारंवार याबाबत पैशाची मागणी केली असता ते पैसे देण्यास आडे याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच कदम यांनी आडे याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »