ऊसतोड मजूर कंत्राटदारांवर १४० गुन्हे दाखल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : ऊस तोडणी कंत्राटदारांविरुद्ध जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे १४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऊस वाहतूकदारांकडून १,६५८ तक्रारी नोंदविण्यात आल्या असून, या तक्रारीनुसार फसवणुकीची एकूण रक्कम १४ कोटींच्या पुढे जाते.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाहतुकदारांकडून खूप तक्रारी आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात विशेष मोहीम उघडून तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजवर शांत बसलेले वाहतूकदार शनिवारी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन त्यांनी तक्रारी नोंदवल्या.

गळीत हंगामादरम्यान, ऊस तोडणी मजुरांच्या पुरवठ्यासाठी ठेकेदारांनी लाखो रुपये उचलले आहेत. मात्र, आवश्यक कामगारांचा पुरवठा करण्यात आला नाही, अशी प्रामुख्याने तक्रार आहे.

दरम्यान पोलिस अधीक्षक बलकवडे म्हणाले की, तक्रारींची संख्या वाढू लागल्यानंतर आम्ही विशेष शिबिरांचे आयोजन केले. वाहतूकदार जे खास करुन ऊस उत्पादक शेतकरी असतात, त्यांना ऊस तोडणी कामगार आणि ठेकेदारांनी फसवले आहे. या तक्रारींची कालबद्ध चौकशी करून अहवाल दाखल करण्यास सर्व पोलिस ठाण्यांना सांगितले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »