उसाची ट्रॉली कारवर कोसळली; दाम्पत्यासह चौघे बचावले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

फुलंब्री : उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली कारवर कोसळल्याची घटना जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने पती-पत्नीसह ४ मुले बचावली आहेत. या प्रकरणी कारचालक उमराव अभिमान पाटील (रा. वाळूज, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलंब्री ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  दरम्यान, ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत मदतकार्य केले आणि कारमध्ये अडकलेल्या सहाही जणांना सुखरूप बाहेर काढले.

छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर चौका घाटात उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक कारवर कोसळली. यातील उसाच्या मोळ्या मागून येणाऱ्या कारवर कोसळल्या आणि यात कार दबली गेली. छत्रपती संभाजीनगरकडून फुलंब्रीकडे एक ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ऊस घेऊन अजिंठा येथे जात होते. चौका घाटातील उंच टेकडावर चढत असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा रॉड तुटला आणि वाहनाचा ताबा सुटला. ट्रॅक्टर मागे घसरत जाऊन त्याची ट्रॉली उलटली. याच वेळी मागून येत असलेली कार ट्रॅक्टरच्या अगदी जवळ आली. उलटलेल्या ट्रॉलीतील ऊस कारवर कोसळला आणि कारचा काही भाग दबला गेला. या कारमध्ये वाळूज येथील पती-पत्नी आणि चार मुले, असे सहाजण  थोडक्यात बचावले आहेत. या प्रकरणी कारचालक उमराव अभिमान पाटील (रा. वाळूज, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलंब्री ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »