फुले १५००६ सह नवे वाण पुढच्या महिन्यात मिळणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : पाडेगाव येथी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या फुले १५००६ सह नवीन तीन ऊस वाण ऑक्टोबर २०२४ पासून विक्रीस उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे या ऊस विकास केंद्राने कळवले असून, याचा सर्व साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

म.फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत केंद्र सरकारच्या उपक्रमातून पाडेगावचे केंद्र ऊस संशोधनात देशात अग्रेसर आहे. या केंद्राने आतापर्यंत अनेक किफायतशीर ऊस वाण विकसित केले आहेत. आता फुले १५००६, फुले १३००७, फुले १५०१२ या नवीन अधिक फायदेशीर ऊस जातींची शिफारस केली आहे. हे तिन्ही वाण आगामी म्हणजे ऑक्टोबर २०२४ पासून ते जानेवारी २०२५ या कालावधीत सर्वांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे पाडेगाव केंद्राने कळवले आहे.

त्यासोबतच सध्याचे प्रचलित वाण को ८६०३२, फुले २६५, एमएस १०००१, कोएम ०९०५७ हेदखील पाडेगाव केंद्राने विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. अधिक माहितीसाठी डॉ. बी. एस. थोरवे (९८८१६४४५७३) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

फुले १५००६, फुले १३००७ आणि फुले १५०१२ हे तिन्ही वाण मध्यम पक्वतेचे म्हणजे १२ ते १४ महिने कालावधीचे आहेत. १५००६ हे २०२४ मध्ये, १५०१२ हे २०२२, तर १३००७ हे २०२३ मध्ये प्रसारित करण्यात आले आहे.

फुले १५००६ ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

को ८६०३२ पेक्षा अनुक्रमे १०.८०% आणि ११.२८% अधिक ऊस आणि साखर उत्पादन, कोएम ०२६५ पेक्षा अनुक्रमे १.६९% आणि ४.४३% अधिक ऊस आणि साखर उत्पादन देणारे वाण आहे.

* जाड व उंच वाढणारा, न लोळणारा, पाचट सहज निघणारा,
* काणी व पिवळया पानाच्या रोगास प्रतिकारक
* खोडकिड, कांडीकिड, शेंडेकिड व खवले किड या किडींना मध्यम प्रतिकारक्षम
* तांबेरा व तांबुस पाने, पोक्का बोईंग या रोगास मध्यम प्रतिकारक, अशी या वाणाची अन्य वैशिष्ट्ये आहेत.

फुले १५०१२ ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

* को ८६०३२ पेक्षा अनुक्रमे ११.०९% आणि १२.६६% अधिक ऊस आणि साखर उत्पादन
* कोएम ०२६५ पेक्षा अनुक्रमे १.६९% आणि ६.१६% अधिक ऊस आणि साखर उत्पादन
* रसवंतीसाठी उत्तम आणि पाण्याचा ताण सह करणारा
* लालकूज व मररोगास मध्यम प्रतिकारक
* खोडकिड, कांडी किड, शेंडे किड व खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडते
* तुरा उशिरा व कमी प्रमाणात येतो

फुले १३००७ ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

*को ८६०३२ पेक्षा अनुक्रमे ११.२२% आणि १०.२५% अधिक ऊस आणि साखर उत्पादन
*कोसी ६७१ पेक्षा अनुक्रमे २९.७०% आणि १९.७२% अधिक ऊस आणि साखर उत्पादन
*पाण्याचा ताण सहन करणारा
*लालकूज व चाबुक काणीस प्रतिकारक
*शेंडे किडीस कमी प्रमाणात बळी पडते
*तुरा तुरळक व कमी प्रमाणात येतो


(तज्ज्ञांचा सविस्तर लेख सप्टेंबर २०२४ च्या अंकामध्ये, ‘शुगरटुडे’ अंकाचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी ८९९९७७६७२१ या क्रमांकावर व्हॉट्‌सअप संदेश पाठवा)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »