म्हणे, उसाला जास्त पाणी लागते… टीकाकारांचे तोंड होणार बंद!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : उसाला खूप पाणी लागते, त्यात इतर चार पिके होतात…. अशी टीका सर्रास होत असते. मात्र नव्या संशोधनाने टीकाकारांचे तोंड बंद होणार आहे. इतर कोणत्याही पिकापेक्षा उसाची प्रति घनमीटर उत्पादकता अधिकच आहे, असे नव्या संशोधनात आढळून झाले आहे.

ISMA आणि IISR नामवंत संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनाचे अंतरिम निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत. उसाची प्रति घनमीटर पाण्यापासूनची उत्पादन क्षमता सुमारे 7.14 किलो असल्याचे निदर्शनास आले आहे, ती असाधारण आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

इथेनॉल उत्पादनाबाबतही ऊस आघाडीवर आहे. १ लिटर इथेनॉल उसापासून तयार करण्यासाठी सुमारे २ किलो लिटर म्हणजे, सुमारे दोन हजार लिटर पाणी लागते, तर अन्य पिकांपासून १ लिटर इथेनॉल बनवताना ३ किलो लिटर, म्हणजेच तीन हजार लिटर पाण्याची गरज लागते, असे संशोधन सांगते.

मका, तांदूळ आणि गहू यांच्या उत्पादकतेपेक्षा उसाची उत्पादकता लक्षणीयरीत्या जास्त आहे, इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) या संस्थेने गेल्या वर्षी लखनौस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च (IISR) च्या माध्यमातून या विषयावर संशोधन सुरू केले. त्यात उसाची कार्यक्षमता इतर कोणत्याही पिकांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आढळून आली.

यासंदर्भात ISMA ने एका निवेदनात म्हटले आहे की, IISR ने अभ्यासाचा प्रथम वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे – भारतातील ऊस लागवडीमध्ये पाणी वापर, हा अभ्यासाचा विषय होता. त्याच्या निष्कर्षांनी नेहमी उसावर तोंडसुख घेणाऱ्यांना मोठी चपराक दिल्याचे मानले जात आहे. आजपर्यंत काही स्वयंघोषित तज्ज्ञांनी उसाची बदनामी केली, त्यांना या संशोधनाने थेट आव्हान दिले आहे.

ऊस विरुद्ध इतर विविध पिकांच्या सिंचनाच्या पाण्याच्या गरजांचा अंदाज लावणे, तसेच ऊस पिकासाठी वार्षिक सिंचनाच्या पाण्याच्या वापराचे वेगवेगळ्या पद्धतींनी मूल्यांकन करणे, पाणी बचतीसाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या कृषी तंत्रांचे मूल्यांकन करणे, ही दोन वर्षांच्या या संशोधन प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

“पहिल्या वर्षाच्या अहवालाच्या निष्कर्षांनी पुष्टी केली आहे की ऊस मका, तांदूळ आणि गहू या पिकांपेक्षा ऊस जास्त कार्यक्षमतेने पाणी वापरतो,” असे ISMA ने म्हटले आहे.

आयआयएसआर आणि कोईम्बतूर (तामिळनाडू) येथील ऊस प्रजनन संस्थेच्या सहा संशोधन केंद्रांवर हा अभ्यास केला जात आहे.

“या अभ्यासाचे प्राथमिक निष्कर्ष पाहिले असता, पाणी वापर आणि इथेनॉल उत्पादनात उसाची कार्यक्षमता स्पष्टपणे अधोरेखित होते. हे निष्कर्ष जलसंधारण आणि उत्पादकतेच्या दृष्टीने ऊस लागवडीचे फायदे प्रदर्शित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत,” असे दीपक बल्लानी (ISMA महासंचालक) म्हणाले.

ते म्हणाले की, दोन वर्षांच्या प्रकल्पामध्ये प्रत्येक केंद्रावर दोन वनस्पती पिके आणि ऊसाच्या एक रॅटून पिकाचे विश्लेषण करणे समाविष्ट आहे.

अभ्यासाचा हवाला देत, ISMA म्हटले आहे की, मका आणि तांदूळ यांसारख्या पिकांच्या तुलनेत उसाला 1313 घनमीटर प्रति हेक्टर दरमहा पाणी लागते, हेच प्रमाण वरील पिकांसाठी 1600 घनमीटरपेक्षा अधिक लागते.

(संशोधनाचा संपूर्ण अहवाल आणि विश्लेषण वाचण्यासाठी आपला ‘शुगरटुडे’चा अंक आजच बूक करा : ८९९९७७६७२१ या क्रमांकावर व्हॉट्‌सॲप करा.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »