साखर उद्योगातील तरुण नेतृत्व : ‘शुगरटुडे’ विशेषांक प्रसिद्ध
पुणे : साखर आणि सहकार विश्वाला समर्पित एकमेव मराठी मॅगेझीन ‘शुगरटुडे’चा दीपावली विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. साखर कारखानदारीमध्ये तरुण नेते देत असलेल्या योगदानावर या अंकात विशेष अंकात प्रकाश टाकण्यात आहे.
‘शुगरटुडे’ मॅगेझीन गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत आहे. सध्या ‘शुगरटुडे’चे दहा हजार वर्गणीदार आहेत. तर ऑनलाइन वाचकांची संख्या सुमारे दीड लाख आहे.
या प्रकाशनाच्या माध्यमातून या क्षेत्रांतील चांगल्या घटनांची उत्तम नोंद घेण्यासोबतच, तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींच्या लेखणीतून शाश्वत विकास मूल्ये रूजवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
कृषिरत्न आणि नामवंत कृषी शास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक हे मासिकाचे प्रमुख मार्गदर्शक असून, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, मा. कुलगुरू आणि भारत सरकारच्या पंचवार्षिक ऊस संशोधन मूल्यमापन समितीचे अध्यक्ष डॉ. योगेंद्र नेरकर, ऊसतज्ज्ञ डॉ. सुरेशराव पवार (ज्यांनी संशोधित केलेल्या ऊस वाणांची ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर लागवड होते) आणि ऊस तज्ज्ञ व ‘ऊस संजीवनी’चे लेखक, संशोधक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांचा मार्गदर्शक मंडळात समावेश आहे. ‘सकाळ’, ‘पुढारी’ अशा वृत्तपत्रांचे माजी संपादक आणि महनीय पत्रकार नंदकुमार सुतार मासिकाचे संपादक आहेत.
‘शुगरटुडे’ मासिकाची वेबसाइटदेखील आहे, तसेच ते छापील आवृत्तीसोबतच, ई-बुक (फ्लिपबुक) स्वरूपातही प्रसिद्ध होते. वेबसाइटची सुमारे १ लाख ५० हजारांपर्यंत मासिक वाचक संख्या आहे, तर ‘फ्लिपबुक’चे (ईबूक) सुमारे ५ ते ६ हजार वाचक आहेत. ‘शुगरटुडे’ मासिक अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. छापील आवृत्तीच्या सुमारे दहा हजार प्रती दरमहा प्रसिद्ध होतात, तर ‘दिवाळी विशेषांका’ला दुप्पटीहून अधिक मागणी असते. यूट्यूब चॅनलचे तीन हजारांहून अधिक सबस्क्राइबर आहेत, एकूण दर्शक संख्या दोन लाखांवर आहेत.
दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशित या विशेषांकाची मागणी करण्यासाठी ८९९९७७६७२१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा sugartodayinfo@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.