DSTA च्या नवीन कौन्सिलचे *शुगरटुडे*कडून अभिनंदन

पुणे : दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया)चे (DSTA(I)) नूतन अध्यक्ष सोहन शिरगावकर आणि नियामक मंडळातील (कौन्सिल) निवडून आलेल्या नवीन सदस्यांचे ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या DSTA च्या 2025 – 2028 या कार्यकाळासाठी सोहन एस. शिरगावकर यांच्यासह, उपाध्यक्षपद वगळता सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे. डीएसटीएच्या नूतन कौन्सिलची विद्यमान अध्यक्ष एस. बी. भड यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील मुख्यालयात शुक्रवारी बैठक झाली.
यावेळी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी एस. डी. बोखारे आणि डॉ. एम. के. डोंगरे हे इच्छुक होते. कार्यकारी मंडळातील १९ सदस्य बैठकीला उपस्थित होते. निवडणूक झाली तेव्हा सर्वांनी बोखारे यांच्या नावाला कौल दिला. त्यामुळे ते विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. आर. कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना व्ही. एम. कुलकर्णी आणि डॉ. दशरथ ठवाळ यांनी सहकार्य केले.
संस्थेचे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पो २२ आणि २३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे, यावेळी नवे नियामक मंडळ अधिकृतपणे सूत्रे स्वीकारणार आहे. या मंडळामध्ये 28 निवडून आलेले आणि तेवढेच निमंत्रित सदस्य असतात. नियामक मंडळातून कार्यकारी समिती (Executive Committee ) निवडलली जाते. त्यात सुमारे 15 सदस्य असतात. यासंदर्भातील घोषणा 22 सप्टेंबर रोजीच होईल.
श्री. एस. बी. भड यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात डीएसटीएला यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे नव्या कार्यकारी मंडळाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
नवे कार्यकारी मंडळ खालीलप्रमाणे
- अध्यक्ष:
- श्री. शिरगावकर सोहन एस.
- उपाध्यक्ष – महाराष्ट्र:
- श्री. बोखरे एस. डी.
- उपाध्यक्ष – गुजरात:
- श्री. पटेल एम.
- उपाध्यक्ष – कर्नाटक:
- श्री. माने सी. जी.
- साखर आणि संलग्न उद्योगांचे उत्पादक:
- श्री. मारवाडकर सतीश
तांत्रिक पदांसाठीचे उमेदवार (1 पोस्ट प्रत्येकी):
- तंत्रज्ञ – अभियांत्रिकी:
- श्री. घोडगावकर एस. व्ही.
- तंत्रज्ञ – प्रक्रिया:
- श्री. देव एस. बी.
- तंत्रज्ञ – कृषी:
- या पदासाठी कोणताही उमेदवार नाही (एस. एस. जोशी यांचा अर्ज बाद, तर डी. एस. फाळके यांची माघार)
- तंत्रज्ञ – सह-उत्पादने:
- श्री. श्रीकांत बी. एच.
- तंत्रज्ञ – व्यवस्थापन:
- श्री. कोलते व्ही. व्ही.
महाराष्ट्र झोन आणि इतर राज्यांमधील प्रतिनिधी (अनेक पोस्ट):
- बी – 1. महाराष्ट्र झोन – 1 (5 पोस्ट):
- श्री. बोरुडे एस. डी.
- श्री. गावित डी. बी.
- श्री. शिंदे एस. पी.
- श्री. माने एस. जी.
- श्री. घुले भास्कर एस.
- बी – 2. महाराष्ट्र झोन – 2 (5 पोस्ट):
- श्री. माटे पी. एम.
- श्री. कुलकर्णी यशवंत एस.
- श्री. माने आर. बी.
- श्री. सलगर समीर बी.
- श्री. पाटील डी. एस.
- बी – 3. महाराष्ट्र झोन – 3 (2 पोस्ट):
- श्री. कर्णे टी. एम.
- श्री. येवले जी. जी.
- बी – 4. कर्नाटक (4 पोस्ट):
- श्री. पाटील एस. बी.
- श्री. कामते बी. डी.
- डॉ. सिदनाळे व्ही. बी.
- बी – 5. गुजरात (2 पोस्ट):
- श्री. पबसेटवार बालाजी डी.
(जागा दोन असल्या तरी ए. आर. पाटील यांचा बाद झाल्याने एक जागा रिकामी)
‘इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट’ या नात्याने श्री. एस. बी. भड हेदेखील नव्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असतील.





