शुगरटुडे अल्पावधीत चांगला ब्रँड झालाय : शेखर गायकवाड

पुणे : शुगरटुडे मासिक आणि शुगरटुडेची ऑनलाईन आवृत्ती अल्पकाळामध्ये चांगला ब्रँड झाली आहे, असे गौरवोद्गार माजी साखर आयुक्त आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी काढले.
शुगरटुडे मॅगेझीनच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ प्रसिद्ध कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि शेखर गायकवाड यांच्या हस्ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झाला, त्यावेळी श्री. गायकवाड बोलत होते.
या छोट्याखानी औपचारिक कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनाचे प्रमुख, प्राध्यापक डॉ. अनिल कारंजकर, ॲड. विपुल मोरे, सौ. माधुरी कारंजकर, प्रकाशक सौ. नयनी पोतदार, रामदास बेडकुते, पत्रकार मंडळी आदींची उपस्थिती होती.
ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योग आणि संबंधित क्षेत्रासाठी शुगरटुडे मासिक म्हणजे उत्तम मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार डॉ. मुळीक यांनी काढले. या मासिकाची ऑनलाइन आवृत्ती देखील वाचकांच्या पसंतीस उतरली आहे, ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे, असेही ते म्हणाले.
शुगरटुडे मॅगेझीनच्या संकल्पनेपासून मी साक्षीदार आहे, या मासिकाचा प्रवास मी साखर आयुक्त असल्यापासून पाहत आहे. उत्तम दर्जामुळे ते अल्पावधीत वाचकप्रिय ठरले, असे श्री. गायकवाड पुढे म्हणाले. ‘शुगरटुडे’चे मुख्य संपादक नंदकुमार सुतार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
दुसरा मजला, व्हर्टेक्स प्लाझा, मार्केट यार्ड, पुणे असा कार्यालयाचा पत्ता असून, sugartodayinfo@gmail.com, contact@sugartoday.in हे ईमेल आहेत.