गीताजयंती
आज बुधवार, डिसेंबर ११, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २०, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०२ सूर्यास्त : १८:०२
चंद्रोदय : १४:३३ चंद्रास्त : ०३:३८, डिसेंबर १२
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : मोक्षदा एकादशी – ०१:०९, डिसेंबर १२ पर्यंत
नक्षत्र : रेवती – ११:४८ पर्यंत
योग : वरीयान् – १८:४८ पर्यंत
करण : वणिज – १४:२७ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०१:०९, डिसेंबर १२ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : मीन – ११:४८ पर्यंत
राहुकाल : १२:३२ ते १३:५४
गुलिक काल : ११:०९ ते १२:३२
यमगण्ड : ०८:२४ ते ०९:४७
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१० ते १२:५४
अमृत काल : ०९:३४ ते ११:०३
अमृत काल : ०३:१५, डिसेंबर १२ ते ०४:४३, डिसेंबर १२
वर्ज्य : ०६:१२, डिसेंबर १२ ते ०७:४०, डिसेंबर १२
मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. गीतेचा या दिवशी जन्म झाला म्हणून मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जातो. या एकादशीला मोक्षदा एकादशी असे नाव आहे आणि भगवद्गीता ही मोक्षदा आहे, अशी अनेक साधुसंतांची साक्ष आहे.
भागवत धर्माचाच नव्हे तर हिंदू धर्मातील सगळ्या धार्मिक संप्रदायाचा मान्य असलेला हा ग्रंथ आहे. ख्रिश्चनाचे बायबल व मुसलमांनाचे कुराण त्यांच्याप्रमाणे गीता हा हिंदूचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ म्हणून समजला जातो.
केवळ सातशे श्लोकांच्या एका महान ग्रंथाने वर्षानुवर्षे संपूर्ण जगावर घातलेली ही मोहिनी हे जगातील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. गीतेवरून स्फूर्ति घेऊन गीतेनंतरच्या पुढील काळात पिंगलगीता शपांकगीता, मंकिगीता, बोध्यगीता विचरव्युगीता, हारीगीता, वृत्रगीता पराशरगीता, हंसगीता, ब्राह्मणगीता, अवधूतगीता सूर्यगीता, ब्रह्मगीता, अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, उत्तरगीता, कपिलगीता, व्यासगीता, गणेशगीता, देवीगीता, पांडवगीता, भिक्षुगीता, शिवगीता, रामगीता, सूतगीता अशा असंख्य गीता एवढेच काय पण यमगीतादेखील लिहिली गेली.
भारताच्या बाहेरही शेकडो वर्ष या ग्रंथांचे भक्त झाले आहेत. अरबी मुसाफिर अल बीरूनी (९७३-१०४८) याला हा ग्रंथ फार पसंत पडला, लंङन येथे १७८५ साली विल्कीन्सन याने गीतेचे इंग्लिश भांषातर प्रसिद्ध केले. त्यामुळे युरोपमध्ये याची चांगली प्रसिद्धी होऊ लागली. ई. आर्नल्डने केलेले गीतेचे द सॉग सिलेस्टिअल हे भांषातररही प्रसिद्ध आहे. १८२३ साली आउगुस्ट हिल्हेल्म फोन स्लेगेल (१७६७-१८४५) याने गीतेची परिशुद्ध आवृती लॅटिन भाषांतरासह १८२३ मध्ये प्रसिद्ध केली. हे भाषांतर जर्मन पंडित व्हिल्हेल्म फोन हंबोल्ट(१७६७-१८३५) याने वाचले आणि तो हर्षित झाला. तो म्हणाला महाभारतील भगवद्गीता हि घटना फार सुंदर आहे. आपणास माहीत असलेल्या साहित्यांच्या जगात बहुधा सर्वश्रेष्ठ अशी ही तत्त्वज्ञानात्मक कविता आहे, असे म्हणावे लागते. बर्लिन ॲकॅडेमीमध्ये त्याने या विषयावर विस्तृत असा शोधप्रबंध लिहिला व श्लेगेलच्या गीतांभाषातरावर विस्तृत समालोचना लिहिली. त्यानंतर आतापर्यत युरोपियन भाषामध्ये गितेचे पुनःपुन्हा भांषातरे होत राहिली.
सर्व भाष्यकारांच्या मते संपूर्ण गीताशास्त्राचा निःश्रेयस पर्यवसायी सारभूत अर्थ सांगणारा आदेश असा.
“मत्कर्मकृन्मत्परमो मदभक्तः संगवर्जितः ll
सर्वभूतेषु यःस मामेति पांडव ll (गीता ११.५५)
अर्थ : ” माझ्याकरता कर्मे करणारा, मीच ज्याचे अंतिम उदिष्ट आहे, माझा भक्त, आसत्किरहित, प्राणिमात्राबद्ल निर्वेर वृत्तीचा असा जो तो, हे पांडवा, माझ्यापाशी येतो”.
यावरूनही मानवी मनावर, जीवनावर, विचारांवर गीतेचा किती प्रभाव पडलेला आहे ते कळते. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीताजयंती म्हणून सन्मानिताना तिला ‘ मोक्षदा ‘ म्हणजे मोक्ष प्राप्त करून देणारी. म्हणून गौरविणे किती यथार्थ आणि उचित आहे.
आज ‘ मोक्षदा ‘ एकादशी / गीताजयंती आहे .
संत माणिक प्रभूंच्या दत्तोपासनेच्या परंपरेला ‘सकलमत संप्रदाय’ असे नाव होते. नावावरूनच हे स्पष्ट आहे की, या संप्रदायात समन्वयाचा मोठा प्रयत्न झालेला आहे. या संप्रदायाचा असा सिद्धांत आहे की, जगातील सर्व धर्म व संप्रदाय हे त्यांच्या त्यांच्या अनुयायांना परमेश्वराची प्राप्ती करून देणारे आहेत. तेव्हा प्रत्येकाने अन्य संप्रदायांना विरोधी वा त्याज्य न मानता समन्वयाच्या उदार दृष्टीने त्यांतील सत्त्वांश ग्रहण करावा. या संप्रदायाचे उपास्य श्रीचैतन्यदेव ( आत्मदे – या विश्वात भरून उरलेले चैतन्यतत्त्व) हे आहे. या संप्रदायांत श्रीदत्तात्रेयाचे स्वरूप मधुमती नामक शक्तिसहित आराधिले जाते. ‘‘हा संप्रदाय अद्वैती व सर्वव्यापी असल्यामुळे अमक्याच एका देवतेचा मंत्र घेतला पाहिजे, असा आग्रह मुळीच नाही. कारण आपले सद्गुरूच नाना वेशांनी या जगात नटलेले आहेत, सर्व स्वरूपे त्यांचीच आहेत; म्हणून बाह्यत: भेद दिसला, तथापि वस्तुत: सर्व देवता एकरूपच आहेत, असा निश्चय ठेवून मंत्र घेतल्यास बाधक होणार नाही.’’
आज माणिक प्रभू समाधी दिन आहे जन्म: २२/१२/१८१७ (श्रीदत्त जयंती)
१९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणव मुखर्जी यांचा जन्म. ( मृत्यू : ३१ ऑगस्ट, २०२० )
श्री बाळासाहेब देवरस : संघविचारांचे व्युत्पन्न भाष्यकार
‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे महाराष्ट्रातील भक्ती आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोलले जाते. तशीच तुलना करायची झाली, तर आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सूत्रपात केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशव्यापी पायाभरणी द्वितीय सरसंघचालक प्रा. माधव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांनी केली आणि त्यावर संघाला समाजोन्भिमुख करीत तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस यांनी त्यावर कळस चढविला, असे म्हटले तर ते मुळीच वावगे ठरणार नाही.
पू. बाळासाहेबांचा जन्म नागपूरमध्ये झाला. तेथील न्यू इंग्लिश स्कूल मधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण मोरीस कॉलेज (सध्याचे नागपूर महाविद्यालय) येथून पूर्ण करून १९३५ साली नागपूर विद्यापीठाकडून कायद्याची पदवी (L. L. B.) प्राप्त केली.
संघसंस्थापक, सरसंघचालक पू. डॉ. हेडगेवारांशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्यापासून प्रेरित होऊन ते संघाशी जोडले गेले आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या जीवनाचे एकच ध्येय ठरविले “संघकार्य” !
पू. डॉक्टरांनी त्यांची कार्यकुशलता पाहून त्यांना बंगालमध्ये संघाचा प्रचारक म्हणून पाठविले. महाराष्ट्राबाहेर गेलेले बाळासाहेब पहिले संघप्रचारक होत. कालांतराने त्यांना डॉक्टरांनी नागपूरला बोलावून घेतले आणि ‘तरुण भारत’ ह्या वर्तमानपत्राच्या ‘संपादक पदा’ची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. पू. डॉक्टरांनंतर पू. गुरुजींच्या सरसंघचालक कार्यकाळात बाळासाहेबांनी विविध जबाबदा-या यशस्वीपणे पार पडल्या. पू. गुरुजींनी १९६५ मध्ये त्यांच्यावर ‘सरकार्यवाह’ ही नवीन जबाबदारी सोपविली. १९७३ साली पू. गुरुजींच्या निधनानंतर, पू. गुरुजींनीच लिहून ठेवल्यानुसार पू. बाळासाहेब ‘सरसंघचालक’ झाले. त्यांच्या कार्यकाळात आलेल्या ‘आणीबाणी’सारख्या आव्हानात्मक ‘अग्निपरीक्षे’तून संघाला त्यांनी सुखरूप बाहेर काढले. प्रसंगी त्यांच्यासह अनेक पदाधिकारी, सामान्य स्वयंसेवकांना कारावासही भोगावा लागला.
त्यांच्या संघसमर्पित जीवनाचे उदाहरण स्वयंसेवकांना देताना पू. गुरुजी म्हणत की, “पू. डॉक्टरांना ज्यांनी पहिले नसेल त्यांनी पू. बाळासाहेबांचे जीवन पहा, अभ्यासा !”
पू. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली असंख्य सेवाकार्ये आजही संपूर्ण भारतभर, ठिकठिकाणी कार्यरत आहेत, नवनवीन कार्यकर्ते निर्माण करीत आहेत.
”संघटित हिंदू समाज विषमतारहित असावा…”
मी असे धरून चालतो की, आपले जे दलित बंधू आहेत त्यांना करुणा नको आहे, त्यांना बरोबरीचे स्थान पाहिजे आहे आणि ते बरोबरीचे स्थान त्यांना आपल्या पुरुषार्थाने मिळवावयाचे आहे. असे असल्याने ते त्या दृष्टीनेच विचार करतात हे मला माहीत आहे. आतापर्यंत ते मागे राहिले असल्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या सवलती देणे आवश्यक आहे. त्या सवलती त्यांनी घ्याव्याही. त्या सवलती मागण्याचा त्यांना हक्क आहे आणि त्या सवलती किती काळ चालू ठेवायच्या हाही त्यांचाच प्रश्न आहे. ते त्यांनीच ठरवावयाचे आहे. पण सरतेशेवटी सर्व घटकांच्या बरोबरीने त्यांना राहायचे आहे आणि त्यांच्या स्वतःच्या योग्यतेमुळे ते सगळ्यांच्या बरोबरीचे आहेत, हेच त्यांना सिध्द करायचे आहे. हे त्यांच्याही मनात आहे हे अनेकांशी बोलणे होत असल्याने मला माहीत आहे. तेव्हा हे कसे करायचे, योग्य काळ कोणता होईल हे त्यांनीच ठरवावयाचे आहे. पण शेवटी तो दिवस आला पाहिजे की जेव्हा आपण सगळे समान आहोत आणि योग्यतेच्या दृष्टीने समान आहोत, हे या समाजामध्ये प्रस्थापित होईल.
आपल्या हिंदू समाजात काही दोष आहेत. हे उघडच आहे. परंतु, या दोषांबरोबरच आपल्या समाजाची काही वैशिष्ट्येही आहेत. जगातील विचारवंतांनी ही वैशिष्ट्ये सर्व मानवजातीला उपकारक आहेत हे मान्य केले आहे. ही जीवनमूल्ये मानणारा, त्याप्रमाणे वागणारा, एकरस, समतायुक्त, संघटित हिंदू समाज इथे राहिला तरच ही वैशिष्ट्ये कायम राहणार आहेत आणि जगाला उपकारक होणार आहेत. म्हणून या गोष्टींचा विचार करणे आपल्या सर्वांचे काम आहे. दुःखाची गोष्ट आहे की, आज हिंदू समाज विघटित आहे, दुर्बल आहे. ‘सर्व माणसे ईश्वराची लेकरे आहेत’ याच्याही पुढे जाऊन ते ईश्वराचेच अंश आहेत असे मानणाऱ्या हिंदू धर्मामध्ये उच्च-नीचतेचे भाव आले आहेत. याबद्दल डॉ. आंबेडकरांनी अत्यंत दुःख प्रकट केले आहे आणि म्हटले आहे की, ‘’वास्तविक समानतेचे साम्राज्य स्थापन करण्याकरिता त्याच्यापेक्षा अधिक मोठा सिध्दान्त सापडणार नाही.” असे असूनही दुर्दैवाने येथे असमानता आली आहे. उच्च-नीचतेचे भाव आले आहेत. तेव्हा, या देशाच्या उध्दाराकरिता हिंदू संघटन आवश्यक आहे आणि हिंदू संघटन होण्याकरिता सामाजिक समता आवश्यक आहे! त्या दृष्टीने आपण काय करू शकतो याच भूमिकेतून सर्वांनी विचार केला पाहिजे.
(दि. ८ मे १९७४ रोजी पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत केलेल्या भाषणातील निवडक भाग)
१९१५: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९९६)
- घटना :
१९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.
१९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
१९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
१९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
२००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.
२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.
२०१९ : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९-
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे.
सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. प्रस्तावित विधेयक ही अट शिथिल करून ती सहा वर्षांवर आणण्याची शिफारस करतं.
यासाठी सध्याच्या भारतीय नागरिकत्व कायदा, 1955मध्ये काही बदल करण्यात येतील, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल. याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नाही तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याचीही तरतूद आहे.
हे विधेयक १० डिसेंबर रोजी लोकसभेत तर ११ डिसेंबर रोजी राज्यसभेत मंजुर झाले.
• मृत्यू :
• १७८३: रघुनाथराव पेशवा यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट, १७३४)
• १९८७: लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी. ए. कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १० जुलै , १९२३)
• १९९८: राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी, १९१५)
• २००१: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन. (जन्म: १७ मार्च, १९०९)
• २००२: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी१९२०)
• २००४: भारतरत्न गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर, १९१६)
• २०१२: सतार वादक, भारतरत्न पण्डित रवी शंकर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२०)
• २०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.
• २०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन. (जन्म: १८ मे, १९७२ )
- जन्म :
१८६७: आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च, १९४०)
१८८२: तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर, १९२१)
१८९२: पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.
१८९९: कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.
१९०९: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च, १९८९)
१९२२: अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.
१९२५: | असावा सुंदर चॉकलेटचा बंगला | चंदेरी सोनेरी चमचमता चांगला |
मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ , एप्रिल २००६)
१९२९: लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००२)
१९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)
१९४२: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९९)
१९६९: भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.