आजचे पंचांग

आज मंगळवार, एप्रिल १, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ११, शके १९४७
सूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:५२
चंद्रोदय : ०८:३१ चंद्रास्त : २२:१०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्थी – ०२:३२, एप्रिल ०२ पर्यंत
नक्षत्र : भरणी – ११:०६ पर्यंत
योग : विष्कम्भ – ०९:४८ पर्यंत
क्षय योग : प्रीति – ०६:०७, एप्रिल ०२ पर्यंत
करण : वणिज – १६:०४ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०२:३२, एप्रिल ०२ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : मेष – १६:३० पर्यंत
राहुकाल : १५:४७ ते १७:२०
गुलिक काल : १२:४२ ते १४:१५
यमगण्ड : ०९:३७ ते ११:१०
अभिजितमुहूर्त : १२:१८ ते १३:०७
दुर्मुहूर्त : ०९:०० ते ०९:५०
दुर्मुहूर्त : २३:३२ ते ००:१९, एप्रिल ०२
अमृत काल०६:५० ते ०८:१६
वर्ज्य : २१:५८ ते २३:२५
ll रामानंद बीडकर l होते सतेज सुंदर l
भक्ती मार्गाची ओढ फार l स्वामींकडे ते गेले होते l
पारखून घेति स्वामी l त्यांना ओळखून अंतर्यामी l
सत्व परीक्षा घेवुनी त्यांची l स्वरूप लीन त्यांना केले ll
आज रामानंद बळवंतराव बिडकर महाराज पुण्यतिथी आहे. – १ एप्रिल १९१३
( फाल्गुन वद्य दशमीला, शके १८३४ )
एप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या कढ्ल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो.
आज जागतिक दुसऱ्याची फजिती करण्याचा – एप्रिल फूल करण्याचा दिवस आहे.
‘पिन कोड’ प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतातल्या वाढत्या पत्रसेवेचा भार सांभाळणं हे दिवसेंदिवस मोठं काम होऊ लागलं होतं. त्यातच निरनिराळ्या भाषा, अपुरे लिहिलेले पत्ते अशा इतर अडचणीही होत्या.
नंतर आपल्या पोस्ट आणि टेलिग्राफ सेवेच्या नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिनकोड पद्धत अंमलात आणली. म्हणूनच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक म्हणतात.
या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली. श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासक होते.
१९९९: भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.( जन्म: २२ जून, १९१५)
चालत बोलता देव मठाधीश डॉ . शिवकुमार स्वामी – शिवन्ना यांनी आपले प्राथमिक शिक्षण सध्याच्या तुमकूर जिल्ह्यातील नागवल्ली गावातल्या ग्रामीण अँग्लो-व्हर्नाक्युलर शाळेत पूर्ण केले . १९२६ मध्ये ते पदवीधर झाले. या काळात ते सिद्धगंगा मठात काही काळ रहिवासी-विद्यार्थीही होते. वैकल्पिक विषय म्हणून भौतिकशास्त्र आणि गणितासह कला शिकण्यासाठी त्यांनी बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिवन्ना कन्नड , संस्कृत आणि इंग्रजी भाषांमध्ये पारंगत होते .
शिवन्ना यांनी पदवी प्राप्त करण्यापूर्वी महाविद्यालयातील उपस्थिती संपवली कारण त्यांना सिद्धगंगा मठाचे प्रमुख म्हणून उद्दाना शिवयोगी स्वामी यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले गेले होते . शिवन्ना यांचे मित्र आणि मठाचे प्रमुख वारस श्री मारुलाराध्या यांचे १६ जानेवारी १९३० रोजी निधन झाले. विद्यमान प्रमुख शिवयोगी स्वामी यांनी शिवन्ना यांना श्री मारुलाराध्याचे वारस म्हणून निवडले. औपचारिक दीक्षा घेतल्यानंतर, शिवन्ना, ज्याचे नाव शिवकुमार ठेवले गेले, त्यांनी 3 मार्च 1930 रोजी विरक्ताश्रमात (भिक्षूंचा आदेश) प्रवेश केला. त्यांनी शिवकुमार स्वामी असे पोंटिफिकल नाव धारण केले. ११ जानेवारी १९४१ रोजी शिवयोगी स्वामींच्या मृत्यूनंतर शिवण्णा यांनी मठाचा कार्यभार स्वीकारला.
स्वामींनी शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी एकूण १३२ संस्थांची स्थापना केली, ज्यात नर्सरी शाळेपासून ते अभियांत्रिकी, विज्ञान, कला आणि व्यवस्थापन तसेच व्यावसायिक प्रशिक्षणासाठी महाविद्यालये आहेत. त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या ज्या पारंपारिक संस्कृत तसेच आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवतात. स्वामींच्या गुरुकुलात पाच ते सोळा वर्षे वयोगटातील १०,००० पेक्षा जास्त मुले राहतात. घरे सर्व धर्म , जाती आणि पंथातील मुलांसाठी खुली आहेत ज्यांना मोफत अन्न, शिक्षण आणि निवारा दिला जातो (त्रिविधा दासोहा). मठातील यात्रेकरू आणि अभ्यागतांनाही मोफत जेवण मिळते. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकांच्या फायद्यासाठी वार्षिक कृषी मेळा भरवला गेला.
त्यांचे कार्य लक्षात घेऊन कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा गौरव केला तर भारत सरकारने २०१५ साली पदमभूषण पुरस्काराने सन्मान केला.
१९०७ : चालत बोलता देव , बहिणव बसवण्णा म्हणून ओळखले जाणारे तुमकूरचे सिधदगंगा मठाधीश डॉ . शिवकुमार स्वामी यांचा जन्म. त्यांचे कडे सिधदगंगा मठाची जबाबदारी १९३० पासून होती. ९ दशक त्यांनी मठाची सेवा केली. ( मृत्यू : २१ जानेवारी, २०१९ )
- घटना :
१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१८९५: ब्रिटीश-भारतीय लष्कर स्थापन झाले.
१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.
१९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.
१९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
१९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.
१९५५ : १ एप्रिल १९५५ या वर्षी गीतरामायणातील पहिले गीत ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती’ आकाशवाणी, पुणे ने प्रसारित केले. गीतरामायणात एकूण ५६ गीते आहेत. गीत रामायणातील गीतांचे प्रसारण १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत, म्हणजे १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या काळात झाले.
या कालावधीत गजानन दिगंबर माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले, सुधीर फडके यांनी संगीत दिलेले, आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या ‘गीतरामायणा’स भरीव लोकप्रतिसाद मिळाला.
बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी देशात तसेच परदेशांत केले.
१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान.
२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
• मृत्यू :
• १९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)
• १९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू खा. श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर , १९०४)
• २०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)
• २००३: गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.
• २००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर यांचे निधन. ते बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे. (जन्म: ११ डिसेंबर १९२५)
• २०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९२१)
- जन्म :
१६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)
१९१२: हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)
१९२४ : संघयोगी प्रचारक नाना ढोबळे यांचा जन्म ( मृत्यू : १५ ऑगस्ट, १९८६ )
१९३६: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म. ( मृत्यू : २३ नोव्हेंबर , २०२०)
१९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म. ( मृत्यू : ऑगस्ट, २०१८)