अस्पृश्यता निवारण दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, डिसेंबर १८, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २७, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०६ सूर्यास्त : १८:०५
चंद्रोदय : २१:०५ चंद्रास्त : ०९:४८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : तृतीया – १०:०६ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – ००:५८, डिसेंबर १९ पर्यंत
योग : इन्द्र – १९:३४ पर्यंत
करण : विष्टि – १०:०६ पर्यंत
द्वितीय करणबव – २१:५८ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : १२:३५ ते १३:५८
गुलिक काल : ११:१३ ते १२:३५
यमगण्ड : ०८:२८ ते ०९:५१
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१३ ते १२:५७
अमृत काल : १८:३० ते २०:०७
वर्ज्य : ०८:४९ ते १०:२६

गणेश मंत्र
|| ॐ तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ||

तथा

|| ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।

आज श्री गणेश चतुर्थी आहे.

म. गांधी, म. फुले, डॉ . बाबासाहेब आंबेडकर , शाहू महाराज अशा अनेक समाज सुधारकरांनी अस्पृश्यते विरुद्ध आजवर लढा दिला आहे.

सावरकरांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी ‘पतित पावन मंदिर’ सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

आज अस्पृश्यता निवारण दिन आहे.

१८ डिसेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने स्थलांतरित श्रमिकांचे अधिकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणार्थ ‘आंतरराष्ट्रीय करारा’चा स्वीकार केला. म्हणून दरवर्षी १८ डिसेंबरला संपूर्ण जगात ‘जागतिक स्थलांतर दिन’ (International Migrants Day) साजरा केला जातो.

आज जागतिक स्थलांतर दिन आहे.

गैरसमज शंभूराजांबद्दलचे
इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी —–
संभाजीराजे यांचे बद्दलचे गैरसमज अभ्यास करून दूर करणारे लेखन करणारे इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचे आज पुण्यस्मरण
खालील मजकूर (फेस बुक –संभाजी राजे(The Great Maratha)December 17, 2013 मधुन )
मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांनी कमळा हे दिर्घकाव्य लिहून शंभुराजेंच्या तथाकथित प्रेयसीला इतिहासात अजरामर केले आहे. काही चित्रपटकारानी शंभुराजेंच्या चरित्रावर चिखलफेक करण्यासाठी हा चित्रपट बनवला. या चित्रपटाने शंभुराजेंच्या चरित्राबद्दल असलेला गैरसमज साक्षर विश्वापासून थेट जनमानसांसमोर पद्धतशीरपणे पोहचवला.

आजही कोल्हापूरजवळ पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणार्या एका समाधी मंदिरास कमळेचे मंदिर म्हणून संबोधले जाते. कमळेचे हे स्थायी मंदिर वर्षानुवर्षे शंभुराजेंची बदनामी करीत आहे. या गैरसमजाच्या मुळाशी जाणे आवश्यक होते म्हणून मु. गो. गुळवणी यांनी शोधनिबंध लिहिला आणि सत्य समोर आले की सज्जाकोटीच्या खाली असलेल्या आपटी गावातील हे थडगे दुसर्या संभाजी राजांच्या ( राजाराम पुत्र ) काळातील करवीर दरबारातील सरदार यशवंतराव थोरात व त्यांची पत्नी गोहाबाई यांचे समाधी मंदिर आहे.

तहसील कार्यालयात याची नोंद आहे, सर्व्हे नं १९७, क्षेत्र १ एकर १५ गुंठे, खराब ३ गुंठे, आकार ३ रुपये ४ आणे. जमिनीचा वहिवाटदार म्हणून श्री आप्पा धोंडी कदम यांचे नाव असून ३ गुंठे खराब जमिनीवरील हे थडगे थोरातांचे थडगे म्हणून कागदोपत्री नोंद आहे.

सरदार यशवंतराव थोरात जेव्हा लढाईत भाला लागून धारातीर्थी पडले, तिथेच त्यांची पत्नी गोहाबाई सती गेल्या. थोरात घराण्यातील लोकांनी पती पत्नीचे स्मरण म्हणून हे समाधी मंदिर बांधले. हे श्री गुळवणी यांनी सिद्ध केलंय. यावरून असे लक्षात येते की, कमळा हे काल्पनिक पात्र ही काही इतिहासकार आणि नाटककारांची हरामखोरी आहे.

२००० : इतिहास संशोधक , वैदिक संस्कृतचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचे निधन.

“नौ बरस क जब हम भइनी, विधा पढ़न-पाठ पर गइनी,वर्ष एक तक जब मारल-मति, लिखे ना आइल राम-गति..”“मन में तनिक ना विद्या भावत, घुमनी फिरनी गाय चरावत,गइयाँ चार रहीं घर माहीं, तिनके नित चरावन जाहीं..”

१८८७ : भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचा जन्म ( मृत्यू : १० जुलै, १९९७१ )

  • घटना :
    १२७१ : कुब्लाई खान यांनी साम्राज्याचे नाव युआन करून राजवंश केले
    १७७७ : अमेरिकेत प्रथमच थॅंक्सगिविंग डे साजरा करण्यात आला
    १८३३ : रशियात राष्ट्रगीत गॉड Save The Zar ! हे प्रथमच गायले गेले
    १९५८ ; जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले
    २००६ : संयुक्त अरब अमिराती मध्ये प्रथमच निवडणूक घेतली गेली
    २०१६ : भारतीय जुनिअर हॉकी संघाने बेल्जीयमला हरवून जुनिअर वर्ल्ड कप जिंकला.

• मृत्यू :

१९९३ : चित्रपट दिगदर्शक राजा बारगीर यांचे निधन
१९९५ : राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर यांचे निधन.
२००४ : क्रिकेटपटू व माजी कर्णधार विजय हजारे यांचे निधन.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »