आज गोवर्धन पूजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, नोव्हेंबर २, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ११, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३९ सूर्यास्त : १८:०४
चंद्रोदय : ०७:१० चंद्रास्त : १८:३१
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : प्रतिपदा – २०:२१ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – ०५:५८, नोव्हेंबर ०३ पर्यंत
योग : आयुष्मान् – ११:१९ पर्यंत
करण : किंस्तुघ्न – ०७:२१ पर्यंत
द्वितीय करण : बव – २०:२१ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : तूळ – २३:२३ पर्यंत
राहुकाल : ०९:३१ ते १०:५६
गुलिक काल : ०६:३९ ते ०८:०५
यमगण्ड : १३:४८ ते १५:१३
अभिजितमुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : ०६:३९ ते ०७:२५
दुर्मुहूर्त : ०७:२५ ते ०८:११
अमृत काल : २०:१६ ते २२:०२
वर्ज्य : ०९:४१ ते ११:२७

विक्रम संवत २०८१ प्रारंभ

गोवर्धन पूजा उत्तर भारतातील हिंदू समाजातील प्रथा आहे. ही पूजा मथुरेच्या आसपासचे लोक विशेषतः करतात. यासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.

आज गोवर्धन पूजन आहे.

दिवाळी पाडवा – या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो.

नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण

भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी – बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.

आज दिवाळी पाडवा आहे.

भारतीय आगमन दिन हा कॅरिबियन बेटांमध्ये तसेच मॉरिशसमधील सुट्टीचा दिवस आहे. भारतातून वेठबिगारी मजूर या प्रदेशांत आल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
आज भारतीय आगमन आहे.

सोहराब मेहेरवानजी मोदी – हे भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. यांचा जन्म २ नोव्हेंबर, १८९७ रोजी मुंबई येथे एका सामान्य पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुंबईतील भरडा हायस्कूल येथे झाले. त्यानंतर ग्वाल्हेर येथे पोर्टेबल पॅथे सेटवर त्यांनी मूकपट प्रदर्शनाचा व्यवसाय केला. नंतर मोदींनी नासिकजवळ देवळाली येथे छावणीतील ब्रिटिश सैनिकांना फिरता सिनेमा दाखवण्याचा उपक्रम केला. त्याचवेळी दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटनिर्मितीचा त्यांना जवळून परिचय झाला.

१९२४ मध्ये आर्य सुबोध नाटक मंडळीत नट म्हणून त्यांनी प्रवेश केला. इंग्रजी व उर्दू अशा दोन्ही नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. त्यांची हॅम्लेटची भूमिका उल्लेखनीय आहे. ११ वर्षे रंगभूमीवर काम केल्यानंतर १९३५ साली पुण्यात आपल्या भावाबरोबर स्टेज फिल्म कंपनी स्थापन केली. खून का खून (हॅम्लेट) हा त्यांचा त्यांची प्रमुख भूमिका व दिग्दर्शन असलेला पहिला बोलपट होता.

त्यानंतर त्यांनी मुंबईत स्थायिक होऊन मिनर्व्हा मुव्हीटोनची स्थापना केली (१९३६). या कंपनीचे पहिले तीन चित्रपट पडले पण जेलर (१९३८) हा चित्रपट यशस्वी ठरला. त्यानंतर मोदींनी पुकार (१९३९), सिकंदर (१९४१) व पृथ्वीवल्लभ (१९४३) हे तीन भव्य ऐतिहासिक चित्रपट निर्माण केले. याचे नंतर गुजरातीतही भाषांतरण केले होते. या तीनही चित्रपटांत त्यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.

शीशमहल व भरोसा हे त्यांचे इतर उल्लेखनीय चित्रपट. मोदींचा झाँसी की रानी (१९५३) हा चित्रपट पहिला भारतीय रंगीत चित्रपट होय. हा चित्रपट फ्लेम अँड टायगर या नावाने तो इंग्लिशमध्ये प्रदर्शित केला गेला होता. मिर्झा गालिब (१९५४) या त्यांच्या चित्रपटाला सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतरचा त्यांचा कुंदन (१९५५) हा चित्रपट ला मिझराब या फ्रेंच कादंबरीवर आधारित होता.

मीनाकुमारीकी अमर कहानी (१९७६) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता तर रझिया सुलताना (१९८३) या चित्रपटातील वझिरे- आझमची केलेली भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका होती. आपल्या मिनर्व्हा मुव्हीटोन संस्थेतर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले असून २५ चित्रपटांचे दिग्दर्शन व २६ चित्रपटातून स्वतः भूमिका केल्या होत्या. त्यांच्या नवरत्न नाटक कंपनीने गुजराती भाषेतील धरतीनो छेडो घर व उर्दू भाषेतील सुबह का भूला ही नाटके सादर केली. उंच व भरदार शरिरयष्टी, भेदक डोळे, करारी मुद्रा, गंभीर धारदार आवाज, शब्दांची प्रभावी फेक करण्याची कुशलता या गुणांनी त्यांच्या भूमिका परिणामकारक होत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मेहताब ही त्यांची पत्नी होय. १९७९ साली त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ सेवेबद्दल दादासाहेब फाळके पारितोषिक बहाल करण्यात आले.

१८९७: दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी, १९८४)

डॉ महेंद्र लाल सरकार – यांचा जन्म कोलकत्ता येथील हावडा जिल्ह्यातील. मात्र लहानपणीच मातृ पितृ छत्र हरपले मात्र मामाकडे त्यांचे संगोपन झाले.
मात्र मुळातच हुशार असणारे महेंद्रजी यांनी लहान वयात इंग्रजी व बंगाली भाषांवर प्रभुत्व मिळवले. आणि परीक्षेत चुणूक दाखवत शिष्यवृत्ती सुद्धा मिळवली. पुढे हिंदू महाविद्यालयात प्रवेश मिळवला. पुढे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी कलकत्ता मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला.

त्यांनी अनेक शिष्यवृत्ती सह चमकदार शैक्षणिक कामगिरी पार पाडत १८६३ मध्ये M.D. ची पदवी मिळवली. पुढे चंद्रकुमार डे यांचे नंतर कलकत्ता विद्यापीठाचे दुसरे M.D. बनले. हि त्यांची उल्लेखनीय कामगिरी मनाली जाते.

डॉ सरकार यांच्या पुढाकाराशी ने राष्ट्ट्रीय विज्ञान संघटनेची स्थापना झाली. राष्ट्रीय पुनर्र्चनेसाठी या संघटनेचे योगदान असावे ही कल्पना त्यामागे होती.
मोठ्या संघर्षानंतर १८७६ मध्ये ” इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ( IACS ) ची स्थापना केली. जी भारताची पहिली राष्ट्रीय विज्ञान संघटना होती. आणि तिचे ते पहिले संचालक होते. त्या माध्यमातून त्यांनी IACS मधील मूलभूत विज्ञानावरील मूलभूत संशोधनावर लक्ष केंद्रित केले. तसेच पुढे त्यांनी मूलभूत विज्ञान विभाग आणि त्याची प्रयोगशाळा स्थापना केली. विज्ञान लोकप्रिय होण्यासाठी त्यांनी नियमितपणे व्याख्याने व प्रात्यक्षिक यांचेवर भर दिला.

शिवाय IACS हे नोबेल पारितोषिक विजेते सर सीव्ही रमण, के एस कृष्णन , मेघनंद साहा, यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ तयार करण्यासाठी उभे करण्यासाठी व्यासपीठ बनले. त्यांच्याकारकिर्दीतील एका विशिष्ट क्षणी विल्यम मॉर्गन यांनी लिहिलेल्या ” दी फिलॉसॉफी ऑफ होमिओपथी ” वाचून त्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यानंतर ते होमिओपथी विषयातील कलकत्त्यातील एक प्रमुख बनले.

आज IACS ही शिक्षण संस्था म्हणून उभी असून दहा एकर मध्ये तिचा विस्तार झालेला आहे. २०१८ मध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी असा दर्जा देण्यात आलेला आहे.

स्वामी रामकृष्ण परमहंस यांचेशी त्यांचा निकट संबंध होता. त्यांचे ते वैयक्तिक चिकित्सक होते.

१८३३: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म. ( मृत्यू: २३ फेब्रुवारी, १९०४ )

  • घटना :
    १९१४: रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.
    १९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.
    १९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.
    १९४०: दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.
    १९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.
    १९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.

• मृत्यू :
• १८८५: मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च, १८४३ )
• १९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.
• १९८४: मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध यांचे निधन.
• १९९०: गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक पद्मभूषण भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर, १९०३)
• २०१२: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)
• २०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: २२ जुलै, १९३०)

  • जन्म :
    १८८२: महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे, १९६३)
    १८८६: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च, १९७१)
    १९२१: ध्वनिमुद्रणतज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म.
    १९४१: केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.
    १९६०: संगीतकार अनु मलिक यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »