आज गुरु पुष्यांमृत योग
आज गुरुवार, नोव्हेंबर २१, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ३०, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:४९ सूर्यास्त : १७:५९
चंद्रोदय : २३:१९ चंद्रास्त : ११:५८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – १७:०३ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – १५:३५ पर्यंत
योग : शुक्ल – १२:०१ पर्यंत
करण : वणिज – १७:०३ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०५:२९, नोव्हेंबर २२ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : १३:४८ ते १५:१२
गुलिक काल : ०९:३७ ते ११:०१
यमगण्ड : ०६:४९ ते ०८:१३
अभिजितमुहूर्त : १२:०२ ते १२:४७
दुर्मुहूर्त : १०:३३ ते ११:१७
दुर्मुहूर्त : १५:०१ ते १५:४५
अमृत काल : ०८:५९ ते १०:३८
वर्ज्य : ०५:१४, नोव्हेंबर २२ ते ०६:५६, नोव्हेंबर २२
आज गुरु पुष्यांमृत योग आहे.
विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार म्हणून ज्यांनी अनेक वर्षे अगदी आजच्या पिढीपर्यंत हसवलं, ज्यांचे विनोदी साहित्य आजही ताजेतवाने वाटते असे विनोदी साहित्याचे जनक म्हणजे चिंतामण विनायक तथा चि.वि. जोशी.
पाली भाषेवरील प्राविण्यामुळे त्यांनी जातक कथांचा अनुवाद केला होता.
शाक्यमुनी गौतम, बुध्द संप्रदाय व शिकवण हे पालीभाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अनुवादित साहित्याबरोबरच त्यांचे विनोदी लेखन प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे. एरंडाचे गुऱहाळ, चिमणरावांचे चऱहाट, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव, ओसाडवाडीचे देव , गुंडयाभाऊ, द्वादशी, गुदगुल्या, रहाटगाडगे, हास्य चिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी अनेक विनोदी कथासंग्रह प्रकाशित आहेत. अत्यंत दर्जेदार आणि कोटीबाज विनोद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय होते. मानवी स्वभावांतील विसंगती सुक्ष्मपणे हेरुन त्या विसंगतीतून भावनिक आणि शाब्दिक विनोद उभा करणे ही चि.वीं.ची खासियत होती, साधी, सोपी, सरळ भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग त्यातून निर्मित विनोद, त्यामुळे त्यांचे लेखन आणि विनोदी भाव सर्वसामान्य माणसांपर्यंत चटकन पोहोचत असत. या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना लोकप्रियता लाभली.
मागील पिढीतील आणि सद्य काळातील लेखकांनी स्वतची अशी काही व्यक्तिचित्रे उभी केली, त्याचप्रमाणे चि.वी. नी उभे केलेले हास्यव्यक्तिमत्व म्हणजे चिमणराव` चिमणरावांचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून इतकं जीवंत झालं होतं की चिमणराव म्हणजे चि. वि. चा मानसपुत्र असे मानले जात असे. अनेकांच्या अनेक विनोदी पात्रांमधला एकमेव असे चिमणरावांचे वर्णन केले जात असे. भोळसट, हास्यकारक वर्तन करणारा असा हा चि.वि. चा चिमणराव मराठी साहित्यात अजरामर झाला आहे. त्या काळातील साहित्यिकांच्या लेखनावर पाश्चात्य लेखकांचा बहुतेक प्रभाव असे. इंग्रजी विनोदी पाश्चात्य लेखकांच्या बाबतीतही असेच म्हणता आले असते. परंतु या बाबतीत मात्र चि.विं. नी आपल्या व्यक्तीरेखेवर पाश्चात्य छाप पडू न देता चिमणरावांचे व्यक्तीत्व हे संपूर्ण ब्राम्हणी असे रंगविलेले आहे. ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचीच एक प्रतिमा आहे. साहित्य लेखन हा अनेक लेखकांचा हातखंडा असला तरी विनोदी साहित्य निर्मिती हा अतिशय कठीण असा साहित्याचा प्रकार. तो सहजतेने हाताळणारे चि.विं. सारखे विनोदी साहित्यिक विरळाच.
१९६३: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९२)
१९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस अलीपूर कारागृहात देशासाठी बलिदान (फाशी ) ( जन्म : ३० जून , १८८२ )
- घटना :
१८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
१९११: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.
१९४२: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
१९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
१९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले. - मृत्यू :
••१९७०: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर, १८८८)
२००२ : हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक गोविंद भाई श्रॉफ यांचे निधन ( जन्म : २४ जुलै, १९११ ) - जन्म :
१८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी, १९८७)
१९२६: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर, १९९२)
१९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर , २०१३)
१९३९: उत्तर प्रदेशचे नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म. ( मृत्यू : १० ऑक्टोबर, २०२२ )
१९८७: भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.