आज हिंदी दिन

आज रविवार, सप्टेंबर १४, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक २३, शके १९४७
सूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:४२
चंद्रोदय : ००:०३, सप्टेंबर १५ चंद्रास्त : १३:०३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माहभाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – ०३:०६, सप्टेंबर १५ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – ०८:४१ पर्यंत
योग : वज्र – ०७:३५ पर्यंत
क्षय योग : सिद्धि – ०४:५५, सप्टेंबर १५ पर्यंत
करण : बालव – १६:०२ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०३:०६, सप्टेंबर १५ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : वृषभ – २०:०३ पर्यंत
राहुकाल : १७:१० ते १८:४२
गुलिक काल : १५:३८ ते १७:१०
यमगण्ड : १२:३४ ते १४:०६
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १२:५८
दुर्मुहूर्त : १७:०४ ते १७:५३
अमृत काल : २३:०९ ते ००:४०, सप्टेंबर १५
वर्ज्य :१४:०१ ते १५:३२
काश्मिरी हिंदू बलिदान दिन हा दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी काश्मिरी हिंदू समुदायाद्वारे पाळला जातो. या दिवशी १९९० च्या दशकात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या काश्मिरी पंडितांना श्रद्धांजली वाहण्यात येते, ज्यांना निर्वासित जीवन जगावे लागले होते. याव्यतिरिक्त, काश्मिरी हिंदू समुदाय १९ जानेवारी हा दिवस त्यांचा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करतो, जो १९९० मध्ये झालेल्या त्यांच्या निर्गमनाचा (पलायनाचा) दिवस आहे, असे काही स्त्रोतांमध्ये नमूद केले आहे.
या दिवशी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या आणि आपल्या मायभूमीतून विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या स्मृतींना उजाळा दिला जातो.
१९९० च्या दशकात काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादामुळे अनेक काश्मिरी हिंदूंना आपली घरे सोडून निर्वासित जीवन जगावे लागले. या काळात अनेक अल्पसंख्याक काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या स्मरणार्थ आणि आपल्या पूर्वजांना आदरांजली वाहण्यासाठी हा बलिदान दिन साजरा केला जातो.
( काही माहितीनुसार, काश्मिरी हिंदू १९ जानेवारी हा दिवस त्यांच्या निर्गमनाचा ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. १९९० च्या दशकात या दिवशी मोठ्या संख्येने काश्मिरी हिंदू काश्मीर सोडून गए होते आणि निर्वासित शिबिरांमध्ये राहायला लागले होते.
या निर्गमनामुळे अनेक विस्थापित पंडितांनी भावनिक नैराश्य आणि असहायतेचा अनुभव घेतला.
थोडक्यात, ‘काश्मिरी हिंदू बलिदान दिन’ हा १४ सप्टेंबरला साजरा केला जातो, तर ‘निर्गामन दिन’ किंवा ‘काळा दिवस’ १९ जानेवारी रोजी साजरा केला जातो, असे विविध स्त्रोतांमध्ये नमूद केले आहे. )
आज काश्मिरी हिंदू बलिदान दिन आहे.
हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही भारत सरकारच्या कामकाजाची भाषा आहे अनेकजण हिंदीला राष्ट्रभाषा असे समजतात परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व २२ भाषा अधिकृत आहेत.आपला देश समनतेला महत्व देतो त्यामुळेच सर्व भाषा समान आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.हिंदी ला देवनागरी लिपी मध्ये लिहीतात.
भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.
आज हिंदी दिन आहे.
पाल, बेंजामिन पिअरी : – बेंजामिन पिअरी पाल यांचा जन्म पंजाबमधील मुकुंदपूर येथे झाला. त्यांनी रंगून (त्यावेळचे ब्रम्हदेश) विद्यापीठाची बी.एस्सी. (ऑनर्स) पदवी व एम्.एस्सी.वनस्पतिशास्त्र (ऑनर्स) पदवी संपादन केली. पदव्युत्तर शिक्षणानंतर नंतर ते अमेरिकेतील केंब्रिज विद्यापीठात रोलँड बिफेन व फ्रँक एंगलडो या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गव्हावरील संशोधन करण्यासाठी गेले. येथे गव्हाच्या वाणावर संशोधन करत असताना त्यांनी हे दाखवून दिले की गव्हासारख्या स्व-परागी पिकात संकरित जोमचा सामुपयोग करणे शक्य आहे. त्यांनी केलेल्या गव्हावरील संशोधन कामावर वनस्पती अनुवांशिक आणि कृषी या विषयातील पीएच्.डी पदवी त्यांना प्रदान करण्यात आली.
ते ब्रह्मदेशातील म्हावबी येथील सेंट्रल राइस रिसर्च स्टेशन या संस्थेत साहाय्यक भात संशोधक अधिकारी म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात बिहारमधील पुसा येथील इम्पिरिअल ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (सध्याचे इंडियन ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट ) या संशोधन संस्थेत ते आर्थिक वनस्पतिवैज्ञानिक या हुद्यावर रुजू झाले. ही संस्था पुढे नवी दिल्ली येथे हलविण्यात आली आणि १९४७मध्ये तिचे नाव भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) असे ठेवले गेले. पाल ह्याच संस्थेतील एम्पेरिअल आर्थिक वनस्पतिविज्ञान व वनस्पतिविज्ञान विभागाचे प्रमुख बनले. पुढे संस्थेच्या संचालक पदावर त्यांची निवड झाली. या पदावर नियुक्त होणारे ते पाहिले भारतीय होते. या हुद्यावर १५वर्षे काम केल्यानंतर पाल यांची इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर) या संस्थेचे पहिले महासंचालक म्हणून नेमणूक झाली. या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते याच संस्थेत एमेरिटस् सायंटिस्ट या नात्याने संशोधकांना मार्गदर्शन करीत असत.
त्यांनी बटाटा व तंबाखूसारख्या विविध पिकांत आढळून येणाऱ्या संकरित वाणासंबंधी संशोधन केले. भारतात जनुक-संपत्ती शोधून तिचा संग्रह आणि रक्षण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या संघटनेने भारतातील ४०,०००च्या वर उपयुक्त वनस्पतींचे प्रकार प्रचारात आणले.
खाद्य वनस्पतींशिवाय पाल यांनी गुलाबाच्या अनेकविध जाती संकरक्रियेने विकसित केल्या. त्यापैकी, द पंजाब बेल, डॉ. होमी भाभा (पांढरा’, दिल्ली प्रिन्सेस आणि बंजारन(लाल) हे गुलाबाचे उल्लेखनीय प्रकार अतिशय लोकप्रिय झाले आहेत. त्यांचे पुस्तक द ब्युटिफुल क्लाइंबर्स ऑफ इंडिया हे १९६० मध्ये तर द रोझ इन इंडिया; हे गुलाबावरील पुस्तक प्रकाशित झाले. त्यांची व्हीट, कॅरोफायटा’, ‘फ्लॉवरिंग श्रबस व बुगनविलियाज ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. ह्या पुस्तकांशिवाय त्यांचे १६०च्या वर संशोधनात्मक व माहितीपूर्ण लेख शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
पाल यांनी संशोधित केलेल्या गव्हाच्या अनेक प्रजातींमुळे गहू उत्पादनात क्रांती झाली. त्यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या अनेक वाणांमुळे भारतात गव्हाचे उत्पादन वाढले. राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीने कृषी विज्ञानातील उत्कृष्ट संशोधनास चालना देण्यासाठी सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच डॉ. बी.पी. पाल स्मृती पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार स्थापन केला आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी पोस्टाचे तिकीट काढण्यात आले.
१९८९ : भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पिअरी यांचे निधन ( जन्म : २६ मे, १९०६ )
- घटना :
७८६ : ऋण अल रशीद बगदादच्या खलीफा झाला
१८९३ : सरदार खाजगीवाले, गणपतराव घोटवडेकर, व भाऊ रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला
१९१७ : रशियाने स्वतः:ला प्रजासत्ताक घोषित केले
१९४८ : दोन तासाच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला
१९५९ : सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्ष यान चंद्रावर कोसळले. चंद्रावर पोहोचणारी हि पहिली मानव निर्मित वस्तू होय.
१९६० : ORGANISATION OF THE PETROLIUM EXPORT COUNTRIES ( OPEC ) ची स्थापना झाली.
१९७८ : व्हेनेरा २ हे रशियन अंतराळ यान शुक्राकडे झेपावले
१९९७ : बिलासपूर – अहमदाबाद हावडा एक्सप्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण मृत्युमुखी पडले
२००० : मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज एम ई रिलीज केले. - मृत्यू :
•१९९८ : शिक्षणतज्ञ व व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन
•२०११ : कुस्तीगीर व प्रशिक्षक पै हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन ( जन्म : ५ जुन, १९५० )
जन्म :
१८६७: वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)
१८९७: नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)
१९०० : हिंदी राजभाषा करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान असणारे व्यौहार राजेन्द्र सिंह यांचा जन्म ( मृत्यू : २ मार्च, १९८८ )
१९०१: शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.
१९१२: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९९७)
१९२१: शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८९)
१९२३: फाळणीच्या काही काळ आधी जेठमलानी यांनी सिंध प्रांतात वकिलीला प्रारंभ केला. सन १९४८ मध्ये कराचीत दंगली उसळल्यानंतर जेठमलानी यांनी भारताची वाट धरली. भारतात दाखल झाले तेव्हा त्यांच्या खिशात होता अवघा एक पैसा! पुढे त्यांनी वकिली पेशाच्या जोरावर रग्गड पैसा कमावला. सर्वाधिक पैसे घेणारे भारतातील वकील, अशी ओळख त्यांना मिळाली. मात्र भारतात दाखल होताना खिशात असलेल्या त्या एका पैशाची आठवण जेठमलानी कायम काढत.
अमोघ युक्तिवाद अशी ख्याती असणारे , केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर, २०१९
१९३२: रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९८६)
१९४८: ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म.
१९६३: अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा जन्म.






