गुरुपुष्यांमृत योग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, सप्टेंबर १८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक २७, शके १९४७
सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३८
चंद्रोदय : ०४:०६, सप्टेंबर १९ चंद्रास्त : १६:३४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वादशी – २३:२४ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – ०६:३२ पर्यंत
योग : शिव – २१:३७ पर्यंत
करण : कौलव – ११:२८ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २३:२४ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : १४:०४ ते १५:३५
गुलिक काल : ०९:२९ ते ११:०१
यमगण्ड : ०६:२७ ते ०७:५८
अभिजित मुहूर्त : १२:०८ ते १२:५७
दुर्मुहूर्त : १०:३० ते ११:१९
दुर्मुहूर्त : १५:२३ ते १६:१२
अमृत काल : ०५:२७, सप्टेंबर १९ ते ०७:०५, सप्टेंबर १९
वर्ज्य : १९:३८ ते २१:१६

आज गुरुपुष्यांमृत योग आहे.

१९९२ : भारताचे ६ वे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन ( जन्म : १७ डिसेंबर, १९०५ )

बिना टिकिट के ट्रेन में चले पुत्र बलवीर
जहाँ ‘मूड’ आया वहीं, खींच लई ज़ंजीर
खींच लई ज़ंजीर, बने गुंडों के नक्कू
पकड़ें टी.टी., गार्ड, उन्हें दिखलाते चक्कू
गुंडागर्दी, भ्रष्टाचार बढ़ा दिन-दूना
प्रजातंत्र की स्वतंत्रता का देख नमूना
या फिर:
राशन की दुकान पर, देख भयंकर भीर
‘क्यू’ में धक्का मारकर, पहुँच गये बलवीर
पहुँच गये बलवीर, ले लिया नंबर पहिला
खड़े रह गये निर्बल, बूढ़े, बच्चे, महिला
कहँ ‘काका’ कवि, करके बंद धरम का काँटा
लाला बोले – भागो, खत्म हो गया आटा

१९०६ : हिंदी हास्यकविता, वात्रटिकांकरता ते नावाजलेले पद्मश्री प्रभुलाल गर्ग उर्फ काका हाथरासी यांचा जन्म ( मृत्यू : १८ सप्टेंबर, १९९५ )

डॉ. रजनीकांत शंकरराव आरोळे (जन्म :१८ सप्टेंबर, इ.स. १९३४:राहुरी, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र – मृत्यू : २६ मे, इ.स. २०११:पुणे, महाराष्ट्र) हे महाराष्ट्रातील जामखेड येथील डॉक्टर व समाजसेवक होते. त्यांनी आरोग्यसुविधा गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यात मोलाची कामगिरी बजावली.

आरोळ्यांनी इ.स. १९५९ वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस. पूर्ण केले. त्यांनी इ.स. १९६० मध्ये कर्नाटकातील कोलार येथे निवासी डॉक्टर म्हणून आरोग्य सेवेला प्रारंभ केला. यानंतर इ.स. १९६२ साली त्यांना नगर जिल्ह्यातील वडाळा मिशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. फुलब्राइट शिष्यवृत्तिधारक म्हणून त्यांनी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.

आरोळे अखेरच्या कालखंडात ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने २५ मे, इ.स. २०११ ला त्यांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
इ.स. १९७९ साली आरोळे यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्याना मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले.इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. इ.स. २००५ साली मदर तेरेसा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

१९३४ : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित समाजसेवी डॉक्टर डॉ. रजनीकांत शंकरराव आरोळे यांचा जन्म ( मृत्यू : २६ मे २०११ )

  • घटना :
    १५०२: शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.
    १८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
    १८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.
    १८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.
    १९१९: नेदरलंड देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
    १९२४: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.
    १९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.
    १९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.
    १९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.
    १९६०: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या शिष्टमंडळचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात आले.
    १९६२: बुरुंडी, जमैका, र्वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
    १९९७: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.
    १९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
    २००२: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
    २००९: रेडिओवर सलग १५ वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाइट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.
    २०१६: सरकारविरोधी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये १७ भारतीय लष्कराचे जवान ठार मारले.

• मृत्यू :

१९९३ : विनोदी अभिनेते व दिग्दर्शक असित सेन यांचे निधन ( जन्म : १३ मे १९१७ )
१९९९ : मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन
२००४ : दलित साहित्याचे समीक्षक डॉ भालचंद्र फडके यांचे निधन
२०१३ : भारतीय राजकारणी वेलियाम भार्गवण यांचे निधन.

  • जन्म :
    १९१२ : चित्रपट व रंगभूमीवरील कलाकार राजा नेने यांचा जन्म ( मृत्यू : २१ फेब्रुवारी, १९७५ )
    १९४० : साहित्यकार शिवाजी सावंत यांचा जन्म ( मृत्यू : १८ सप्टेंबर, २००२ )
    १९५० : अभिनेते विष्णू वर्धन यांचा जन्म ( मृत्यू : ३० डिसेंबर, २००९ )
    १९६८ : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक व राजकारणी उपेंद्र राव यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »