भगवान विश्वकर्मा दिन, राष्ट्रीय श्रम दिवस

आज बुधवार, सप्टेंबर १७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक २६, शके १९४७
सूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:३९
चंद्रोदय : ०३:०९, सप्टेंबर १८ चंद्रास्त : १५:५०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : इंदिरा एकादशी – २३:३९ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : परिघ – २२:५५ पर्यंत
करण : बव – ११:५७ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २३:३९ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : १२:३३ ते १४:०४
गुलिक काल : ११:०१ ते १२:३३
यमगण्ड : ०७:५८ ते ०९:३०
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०८ ते १२:५७
अमृत काल : ००:०६, सप्टेंबर १८ ते ०१:४३, सप्टेंबर १८
वर्ज्य : १४:२८ ते १६:०४
प्रभासस्य तस्य भार्या बसूनामष्टमस्य च।
विश्वकर्मा सुतस्तस्यशिल्पकर्ता प्रजापतिः॥16॥
॥ दोहा ॥
श्री विश्वकर्म प्रभु वन्दऊं,
चरणकमल धरिध्यान ।
श्री, शुभ, बल अरु शिल्पगुण,
दीजै दया निधान ॥
भगवान विश्वकर्मा – विश्वकर्मा दिन / पूजा
आजही सोनार,लोहार,सुतार,कुंभार,कासार इत्यादी समाज त्यांना आपले दैवत मानतात.
भारतात दिनांक १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय श्रम दिवस आणि त्यांची जयंती म्हणुन साजरा करण्यात येतो.
केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी झाला. हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही.
मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पूजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्न असो; ते या सर्व आघाडय़ांवर अखेपर्यंत त्वेषाने लढत राहिले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा लढा होता. प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला.
कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा(आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली.
१८८५: पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)
गगन, सदन तेजोमय
गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश, देई अभय
गगन, सदन तेजोमय, गगन, सदन-
कवी वसंत बापट
• २००२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन. (जन्म: २५ जुलै १९२२)
विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी – लहानपणापासूनच ते परंपरावादी, अंधश्रद्धा व धर्मग्रंथांतून सांगितलेल्या विचारांवर नेहमीच प्रश्न उठवत असत. गरीब आणि अस्पृश्य यांची परिस्थिती पाहून त्यांचे मन क्षुब्ध झाले व त्यांनी धर्मग्रंथांचा चिकित्सापूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच त्यांची हिंदू धर्मावरील श्रद्धा डळमळली आणि त्यांनी सामाजिक समानतेचा व अस्पृश्योद्धाराचा प्रसार सुरू केला. १९०५ पासून पेरियार यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. याच काळात एरोडमध्ये प्लेगची साथ पसरली होती. अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले, त्यामुळे अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांनी एरोडमधून स्थलांतर केले. पण पेरियार यांनी रोग्यांची सेवाशुश्रूषा केली व मृतांवर स्वतः अंत्यसंस्कार केले.
१९१८ मध्ये ते एरोड नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील थोर नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या सल्ल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९२० मध्ये महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला. या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी स्वतःहून विविध संस्थांत असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदांचा राजीनामा दिला. या असहकार आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वैक्कोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. काँग्रेसमधील वरिष्ठवर्णीयांच्या धोरणाबद्दल मनात असंतोष निर्माण होऊन त्यांनी पक्षत्याग केला.
तमिळ व उपेक्षित समाजाला ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात संघटित केले. पददलित समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी १९२५ साली स्वाभिमान आंदोलन सुरू केले. आंतरजातीय विवाह व विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तसेच देवदासीप्रथा बंद करण्यासाठीच्या विधेयकास पूर्ण पाठिंबा दिला.
१९३१ मध्ये त्यांनी रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स व स्पेन या देशांचा दौरा केला. १९३३ मध्ये त्यांनी लोकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले आणि त्यामुळे पुन्हा त्यांना बंदिवास भोगावा लागला. पहिल्या काँग्रेस मंत्रिमंडळाच्या काळात १९३७ मध्ये त्यांनी प्रथम हिंदी भाषेविरोधी आंदोलन सुरू केले. त्यासाठीही त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
१९४४ साली त्यांनी जुन्या जस्टिस पक्षाचे रूपांतर द्रविड कळघम या नवीन पक्षात केले.
सार्वभौम व वर्णभेदरहित द्रविडनाडूची स्थापना हे त्यांच्या द्रविड कळघम पक्षाचे ध्येय होते. पुढे पेरियार यांनी पहिली पत्नी वारल्यानंतर मणिअम्माई या आपल्या २८ वर्षांच्या स्वीय सहायिकेसोबत दुसरे लग्न केले (१९४९). त्याच्या निषेधार्थ आण्णा दुरै यांच्या नेतृत्वाखाली काही अनुयायांनी त्यांचा पक्ष सोडून द्रविड मुन्नेत्र कळघम हा नवा पक्ष स्थापन केला. निवडणुका लढविण्यासाठीच मुख्यतः नवा पक्ष अस्तित्वात आला होता. पक्षात फूट पडली, तरी पेरियार यांचा तमिळ जनतेवरील वैयक्तिक प्रभाव कमी झाला नव्हता. १९७१ साली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन संमेलन भरवून धर्म, जात व भाषा यांच्या आधारावर होणारा सर्व प्रकारचा पक्षपात दूर करण्याचे सरकारला आवाहन केले, तसेच हिंदी भाषेला विरोध केला.
१९३४ पासूनच त्यांनी सामाजिक क्रांतीला वाहून घेतले होते. हिंदू धर्म हे ब्राह्मणांच्या वर्चस्वाचे व मक्तेदारीचे एक साधन आहे, मनुस्मृति ही अमानुष आहे आणि पुराणे म्हणजे परीकथा आहेत, अशी त्यांची मते होती.
वर्णव्यवस्था, बालविवाह, सक्तीचे वैधव्य यांविरुद्ध ते सतत प्रचार करीत. द वर्ल्ड टू कम, व्हाय द राइट्स फॉर कम्यूनल रिझर्व्हेशन, वर्ड्स ऑफ फ्रीडम : आयडिया ऑफ नेशन, सच्ची रामायण हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ. कुटियरसू (१९२५), रिव्होल्ट (१९२८), पकुत्तरिवू (१९३४), विधुथालई या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले.
वेल्लोर येथे वयाच्या ९४व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
१८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)
१९२९: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)
१९५०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹
- घटना :
१६३० : बोस्टन शहराची स्थापना झाली.
१९३९ : ह.भ.प. संत कवी श्री दासगणु महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाची प्रथम आवृत्ती अर्थातच महाराजांच्या अवतार कार्याचा अमृत ठेवा भक्तगणांसाठी प्रकाशित करण्यात आला. ( तारखे प्रमाणे )
१९४८ : हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे .
१९५७ : मलेशियाच्या संयुक्त राष्ट्र संघात प्रवेश
१९८३ : वनीसा विल्यम्स पहिली कृष्णवर्णीय मिस अमेरिका झाली.
२००१ : ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यानंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज परत सुरु झाले. - मृत्यू :
• १९९९: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. (जन्म: १५ एप्रिल १९२२) - जन्म :
१८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.
१९१५: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून २०११)
१९२९: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)
१९३०: व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)
१९३२: भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.
१९३७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.
१९३८: लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००९)
१९३९: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)
१९५१: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.
१९८६: भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.