मार्गशीर्ष मास प्रारंभ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, डिसेंबर २, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ११, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५६ सूर्यास्त : १८:००
चंद्रोदय : ०७:५० चंद्रास्त : १८:४९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : प्रतिपदा – १२:४३ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – १५:४५ पर्यंत
योग : धृति – १६:०१ पर्यंत
करण : बव – १२:४३ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ००:५९, डिसेंबर ०३ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : वृश्चिक – १५:४५ पर्यंत
राहुकाल : ०८:१९ ते ०९:४२
गुलिक काल : १३:५१ ते १५:१४
यमगण्ड : ११:०५ ते १२:२८
अभिजितमुहूर्त : १२:०६ ते १२:५०
दुर्मुहूर्त : १२:५० ते १३:३४
दुर्मुहूर्त : १५:०३ ते १५:४७
वर्ज्य : ००:०४, डिसेंबर ०३ ते ०१:४४, डिसेंबर ०३

मार्गशीर्ष मासारंभ – मार्गशीर्ष महिना सर्वोत्तम आहे असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे.

मार्गशीर्ष मास हा “श्री लक्ष्मीचा मास ” तसेच हा मास ” केशव मास ” म्हणून मानला जातो.

मार्गशीर्ष मास प्रारंभ.

देवदीपावलीचा दिवस हा मुख्यत: महाराष्ट्रात कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा दिवस असतो. या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.

उत्तर भारतात विशेषत: काशीला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली असते. शंकराने जेव्हा त्रिपुरासुराचा वध केला तेव्हा देवांनी याच दिवशी दीपावली साजरी केली होती, असे सांगितले जाते. या वर्षी (२०१६ साली) काशीमधल्या ८४ घाटांवरती सव्वालाख दिवे उजळवले होते, आणि शिवाय दशाश्वमेघ घाटावरती गंगेची भव्य आरती झाली होती.

आज देव दीपावली आहे .

आज जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन आहे.

आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक – यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणिशास्त्र अशा शास्त्रीय विषयांवरील पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली. मुख्यत: शास्त्रीय लेखनासाठी मोडक यांची ओळख असली तरी त्यांनी इतिहासविषयक लेखनही केलेले आहे. शास्त्रीय विषयांच्या प्रसारासाठी ‘मराठी विद्यापीठा’ची योजनाही त्यांनी मांडली होती.

‘‘शास्त्रीय विषयाच्या ज्ञानाची हल्लीं फार आवश्यकता भासूं लागली आहे.

स्वदेशी चळवळींनें हल्लीं बरीच उसळ खाल्ली आहे. स्वदेशी जिन्नस वापरावयाचा बऱ्याच लोकांचा निश्चय आहे. परंतु हा निश्चय सिद्धीस जाण्यास स्वदेशी जिन्नस उत्पन्न करण्याचे कारखाने निघाले पाहिजेत. देशी गिरण्यांतील कापड स्वदेशी म्हणून आपण वापरतों. परंतु तें कापड काढण्यास लागणारी सर्व यंत्रें अद्याप परदेशीच आहेत. साबण, मेणबत्त्या, आगकाडय़ा वगैरे कांहीं जिन्नस येथें निपजतात. परंतु त्यांचीही सर्व उत्पत्ति देशी साधनांनीं होत नाहीं.. लोखंड, तांबें, पितळ, जस्त, कथिल वगैरे सर्व धातु परदेशांतून येतात. त्यांच्या खाणी येथें असून आम्हांस सुधारलेल्या रीतींनीं गाळतां येत नाहीं. शास्त्रीय विषयांचा फैलाव झाल्याशिवाय या गोष्टी सिद्धीस जाणार नाहींत.. हे विचार त्यांनी वारंवार मांडले.

  • १९०६: कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक यांचे निधन.
  • डॉ1अनिता अवचट
    त्यावेळी उद्घाटनाच्या भाषणात पु. ल. म्हणाले होते, ” आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करतोय या केंद्राची भरभराट होऊ दे, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देणार नाही. त्या चुकीच्या शुभेच्छा होतील. म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो की असं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे. तेव्हा आपण इथे एक सांस्कृतिक केंद्र सुरू करू.”

किती मोठ्या शुभेच्छा पु. लं. नी दिल्या होत्या.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची , (येरवडा, पुणे) स्थापना दि.२९ ऑगस्ट १९८६ रोजी येरवडा मनोरुग्णालयातील एका वॉर्डमध्ये डॉ.अनिता अवचट व डॉ.अनिल अवचट यांनी केली. पु.ल.देशपांडे यांनी सुरुवातीची आर्थिक मदत दिली. मुक्तांगण हे नावही त्यांनीच सुचविले.

व्यसन हा आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याची जबाबदारी इतर कोणाची नसून आपलीच आहे, याची जाणीव व्यसनी माणसास उत्स्फूर्तपणे झाली तरच या सर्व उपचाराचा फायदा होतो. अशी जाणीव लवकरात लवकर, परिणामकारकरित्या निर्माण व्हावी यासाठी पोषक वातावरण मुक्तांगणमध्ये निर्माण केले आहे. इथे सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक उपक्रम चालू असतात. उदा. योग, ध्यान, खेळ, समूह उपचार, संगीत उपचार, मनोनाट्य, व्यवसाय शिक्षण, महिन्याचे हस्तलिखित मासिक, खेळांच्या स्पर्धा, व्यसनमुक्तीचे वाढदिवस, कुटुंबियांच्या सभा, अपत्यांच्या सभा, कलाकुसर वर्ग, निसर्गात जाऊन झाडे, पक्षी, प्राणीनिरीक्षण, फिल्म शो इ. या सर्वांचा रोख व्यसन या प्रश्नाशी असतो.
व्यसन सुटल्यावर पोकळी निर्माण होते, ती उत्तमरितीने भरून काढण्यासाठी या विविध उपक्रमांचा फायदा होतो.

पुनर्वसन – येथील वास्तव्याच्या शेवटच्या भागात त्याला झेपेल असा कार्यक्रम तयार केला जातो. पूर्वीची देणी मिटविणे, आपण केलेल्या जखमा भरून काढणे, गेलेले काम परत मिळविणे, मोडलेले लग्न परत जमवून आणणे इ. गोष्टींचा समावेश यात होतो.
भारत सरकारने ‘मुक्तांगण’ मॉडेलला स्वीकारून विस्तार करण्यासाठी मान्यता दिली.

सन १९९९ मध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि गुजरात या पाच राज्यांतील व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ‘मुक्तांगण’वर सोपवली. त्यातूनच ‘रिजनल रिसोर्स अॅण्ड ट्रेनिंग सेंटर्स’ तयार झाली. आज पाच राज्यांमध्ये १००हून अधिक केंद्रे आहेत. एखाद्याला व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायचं असेल, तर मार्गदर्शक होईल असं ‘मिनिमम स्टॅण्डर्ड ऑफ केअर’ नावाचं मॅन्युअल सरकारनं करायला सांगितलं. ते करण्यातही ‘मुक्तांगण’चा मोठा वाटा होता. भारतात जी ४००हून अधिक केंद्रे व्यसनमुक्तीसाठी काम करत आहेत, त्यांना ते वापरणं बंधनकारक आहे.

१९४२: मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म. (मृत्यू : १० फेब्रुवारी , १९९७)

  • घटना :
    १४०२: लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
    १९४२: एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला.
    १९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.
    १९७१: अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.
    १९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.
    १९८८: बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्या त्या पहिल्या महिला आहेत.
    १९८९: भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.
    १९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर
    २००१: एन्रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

• मृत्यू :

• १९९६: आंध्र प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी, १९१९)
• २०१४: महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी, १९२९)

  • जन्म :

१८५५: कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे, १९२३ )
१८९८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इन्दर लाल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै, १९१८)
१९०५: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्म. (मृत्यू : ४ मे , १९८०)
१९३७: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म.
१९४७: भारतीय क्रिकेटपटू धीरज पारसणा यांचा जन्म.
• १९५९: अभिनेते बोमन ईराणी यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »