दत्तू बांदेकर

आज शुक्रवार, ऑक्टोबर ३, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ११ शके १९४७
सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:२५
चंद्रोदय : १५:५० चंद्रास्त : ०३:२९, ऑक्टोबर ०४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : आश्विन
पक्ष :शुक्ल पक्ष
तिथि: पाशांकुशा एकादशी – १८:३२ पर्यंत
नक्षत्र : श्रवण – ०९:३४ पर्यंत
योग : धृति – २१:४६ पर्यंत
करण : वणिज – ०६:५७ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – १८:३२ पर्यंत
क्षय करण : बव – ०५:५६, ऑक्टोबर ०४ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : मकर – २१:२७ पर्यंत
राहुकाल : १०:५८ ते १२:२७
गुलिक काल : ०७:५९ ते ०९:२८
यमगण्ड : १५:२६ ते १६:५६
अभिजितमुहूर्त : १२:०३ ते १२:५१
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४०
दुर्मुहूर्त : १२:५१ ते १३:३९
अमृत काल : २२:५६ ते ००:३०, ऑक्टोबर ०४
वर्ज्य : १३:३० ते १५:०४
स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी – हे कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. काही काळ पुण्यात घालवल्यावर पुढे मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरलेला कुणी पाहिला नाही. मोठमोठ्या विद्वानांपासून ते अगदी गावंढळापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने लोभविले.
दत्तू बांदेकर हे आचार्य अत्र्यांचे ते उजवे हात होते. १९३४साली आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, सुंदर मानकर आणि कॅप्टन मा.कृ.शिंदे यांनी ’साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ’ नावाचे साहित्यावर चर्चा करणारे मंडळ काढले होते. मंडळाच्या पहिलीच सभा विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्मयावर मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाली होती. तेव्हापासून अत्रे आणि बांदेकरांची मैत्री सुरू झाली.
जुलै १९४०पासून बांदेकर आचार्य अत्र्यांच्या साप्ताहिक नवयुगमध्ये ’रविवारचा मोरावळा’ नावाचे सदर लिहीत.
चित्रपट विषयाला वाहिलेल्या ’चित्रा’ साप्ताहिकात ते प्रूफरीडर म्हणून लागले. पुढे ‘चित्रा’तून त्यांनी ‘तो आणि ती ‘ आजकालचे गुन्हेगार, सख्याहरी ‘ ही सदरे लिहिली. त्यातील ‘सख्याहरीला’ हे त्याच्या ‘प्रेयसीने लिहिलेली पत्रे ‘ हे स्वरूप होते. त्यातून सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या भानगडी यासंबंधी चुटपुटीत भाष्य असे. टवाळकीच्या ढंगात लिहिलेले सदर जितके लोकप्रिय झाले तितकेच टीकेचेही धनी झाले. पुढे अत्र्यांच्या ‘नवयुग ‘ मध्ये ते दाखल झाले आणि अखेरपर्यंत तेथेच राहिले.तील ’सख्या हरी’ या टोपणनावाखाली प्रकाशित होणाऱ्या बांदेकरांच्या सदरामुळे ते महाराष्ट्राचे लाडके लेखक झाले. अत्र्यांच्या नवयुगमधून बांदेकरांनी लिहिलेली ‘अक्काबाईचा कोंबडा’, ‘जग ही रंगभूमी’, ‘घारुअण्णांची चंची’ ही सदरे लोकप्रिय झाली.
दत्तू बांदेकर स्वतः प्रसिद्धिपराङ्मुख होते. ते इतके लाजरे होते की कधी जनतेसमोर ते आले नाहीत. त्यांनी कुणालाही आपली मुलाखत घेऊ दिली नाही की आपला फोटो काढू दिला. पां.वा. गाडगीळ यांनी एका लेखात लिहिले आहे की, “दत्तू बांदेकर इतके लाजाळे आणि एकान्तिक होते की आचार्य अत्र्यांनी मुद्दाम बोलावून आणि एकोणीस वर्षे ’नवयुग’मध्ये त्यांची लहर सांभाळून त्यांना ठेवले नसते तर, लेखक म्हणून दत्तू बांदेकर कधीच संपले असते.
त्यांचे मित्र मा.कृ.शिंदे यांना दत्तू बांदेकरांच्या नृत्याभिनयाच्या गुणाची चांगली कल्पना होती. पण शिंदे यांनी कितीही आटापिटा केला तरी दत्तूला ते रंगमंचावर आणू शकले नाहीत. दत्तू बांदेकर यांनी लिहिलेले ’विचित्र चोर’ हे नाटक रंगमंचावर आले खरे, पण पहिल्याच प्रयोगात आपटले. त्या नाटकाच्या सर्व उपलब्ध प्रती बांदेकरांनी जाळून टाकल्या.
दत्तू बांदेकरांच्या ’जावई शोध’ या दुसऱ्या नाटकाचा मात्र प्रयोग झाला. या नाटकाची भाषा कोकणीमिश्रित मराठी असून त्यात बांदेकरांनी कारवारमधील काळू नदीचे आणि निसर्गसौंदर्याचे वर्णन केले आहे. १९५१ साली कारवारला अ.का. प्रियोळकर यांच्या अध्यक्षतेखाली जे मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यात या नाटकाचा प्रयोग झाला.
१९५९ : विनोदी लेखक , विडंबनकार, व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचे निधन ( जन्म : २२ सप्टेंबर, १९०९ )
- घटना :
१६७० : शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटून खजिना स्वराज्यासाठी आणला
१७७८ : ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कुक अलास्का येथे पोहोचले
१९३२ : इराकला युनाइटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले
१९३५ : जनरल डी बोनोच्या नेतृत्वाखाली इटलीने इथोपिया पादाक्रांत केले
१९४२ : जर्मनीतील पीनेमुंडे येथील तळावरून सर्वप्रथम व्ही २ या ४ क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण म्हणजे अंतराळात पोहोचलेली सर्वप्रथम मानव निर्मित वस्तू आहे.
१९५२ : युनायटेड किंग्डमने यशस्वीरीत्या अण्वस्त्र शस्त्रांची यशस्वी चाचणी करून जगातील तिसरे परमाणू सशस्त्र राष्ट्र बनले
१९८५ : स्पेस शटल अटलांटिसने अंतराळात प्रथमतः झेप घेतली.
१९९० : पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
• मृत्यू :
१९५९: विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९०९)
१९५९ : भारतीय लेखक व राजकारणी मा पो सिवागनम ( मा. पो. सी ) यांचे निधन ( जन्म : २६ जून, १९०६ )
१९९५: भारतीय लेखक व राजकारणी मा. पो. सी. यांचे निधन. (जन्म: २६ जुन १९०६)
२००७ : सलमान खान व त्याचे अंगरक्षकाविरुद्ध एफ आय आर नोंदवणारे रवींद्र पाटील यांचे टी बी मुळे निधन ( अर्थात हे मृत्यू कारण संशयास्पद आहे )
२००७ : पत्रकार , लेखक शैक्षणिक तज्ञ् एम एन विजयन यांचे निधन ( जन्म : ८ जून, १९३० )
२०१२ : दिल्लीचे महापौर, सिक्कीमचे राज्यपाल केदारनाथ सहानी यांचे निधन ( जन्म : २४ ऑक्टोबर, १९२६ )
२०१२ : भारतीय धर्म शास्त्रज्ञ् व विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचे निधन ( जन्म : १ सप्टेंबर, १९३१ )
- जन्म :
१९०३ : हैदराबाद संस्थान स्वातंत्र्य चळवळीतील नेते, समाज सुधारक व शिक्षण तज्ञ् स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म ( मृत्यू : २२ जानेवारी, १९७२ )
१९०७ : निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता इ. साहित्य प्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म ( मृत्यू : २ सप्टेंबर, १९९० )
१९१४ : टीकाकार म. वा. धोंड यांचा जन्म ( मृत्यू : ५ डिसेंबर, २००७ )
१९४९ : चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म.