राष्ट्रसेविका समिती स्थापना दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, ऑक्टोबर २५, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक दिनांक ०३, शके १९४७
सूर्योदय : ०६:३६ सूर्यास्त : १८:०९
चंद्रोदय : ०९:४२ चंद्रास्त : २०:४२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : कार्तिक
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि :चतुर्थी – २७:४८+ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – ०७:५१ पर्यंत
योग : शोभन – पूर्ण रात्रि पर्यंत
करण : वणिज – १४:३४ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २७:४८+ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : ०९:२९ ते १०:५६
गुलिक काल : ०६:३६ ते ०८:०३
यमगण्ड : १३:४९ ते १५:१६
अभिजित मुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : ०६:३६ ते ०७:२२
दुर्मुहूर्त : ०७:२२ ते ०८:०८
अमृत काल : २४:५४+ ते २६:४२+
वर्ज्य : १४:०८ ते १५:५६

१९३६ : राष्ट्र सेविका समिती ही भारतातील हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी महिला संघटना असून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला आघाडी मानली जाते.

लक्ष्मीबाई केळकर यांच्या पुढाकाराने ऑक्टोबर २५, १९३६ रोजी राष्ट्रसेविका समिती स्थापण्यात आली. राष्ट्र सेविका समिती ह्या संघटना राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत. अखंड ८६ वर्षे कार्यरत असणारी एकमेव अखिल भारतीय हिंदू स्त्री संघटना होय. महिलांनी केवळ शिक्षित नव्हे तर सक्षम बनावे, तसेच मानसिक, शारीरिक व बौद्धीकरीत्या सक्षम बनावे, हा दृष्टिकोन समोर ठेऊन लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली.

देशभरात तीन हजारहून अधिक शाखा व अन्य सेवा कार्यात समितीचे योगदान आहे. राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविण्यासाठी राष्ट्रसेविका समितीचे उद्देश आहे. संपूर्ण देशभरात राष्ट्रसेविका समितीचे कार्य सुरू असून सुमारे बारा देशात हिंदू सेविका समितीच्या नावाने कार्य सुरू आहे.

आज राष्ट्रसेविका समिती स्थापना दिन आहे.

तदबीर से बिगड़ी हुई तक़दीर बना ले, तक़दीर बना ले
अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले,
लगा ले दांव लगा ले |

संगीतकार एस.डी. बर्मन यांच्यासोबत साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. पहिल्याच भेटीत सचिनदांना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या. १९५१मध्ये आलेल्या ‘नौजवान’ चित्रपटात या गीताचा समावेश झाला आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले. साहिर यांनी या प्रेमगीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता. या गीताने चित्रपटसृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हे गीत होते – ‘ठंडी हवाएँ लहराके आयें, ऋतु है जवाँ, तुम हो यहाँ, कैसे भुलायें…’

प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या ‘बाजी’ या प्रथमच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले…’ या गीताने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. अभिनेते देवानंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे. पश्चिम बंगालमधील ‘बाऊल’ परंपरेत कीर्तनाच्या स्वरूपात गायल्या जाणार्या ‘आन मिलो आन मिलो शाम सवेरे…’ हे गाणे साहिर यांच्यातील प्रतिभावंत गीतकारावर शिक्कामोर्तब करणारे ठरले.

‘प्यासा’चे यश हे फक्त त्यातील गीतरचनांमुळे आहे, संगीतामुळे नव्हे, असे साहिर यांचे म्हणणे होते. एसडी बर्मन यांच्या ते जिव्हारी लागले आणि ही जोडी तुटली. पण ‘प्यासा’तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या. त्यातील साहिर यांनी लिहिलेली सर्वच गीते अक्षरश: ‘महान’ असली तरी ये ‘दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…’ला तोड नाही.

सचिन बर्मन दूर गेल्यानंतर साहिर आणि ओ.पी. नय्यर ही जोडी जमली. या जोडीने ‘नया दौर’, ‘तुमसा नही देखा’ असे अनेक चित्रपट केले. १९५७मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या ‘माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार…’ या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. या शब्दांची जादू आजही संपलेली नाही.

१९८०: शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९२१)

  • घटना :
    १८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.
    १९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.
    १९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
    १९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
    १९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्यांदा मिळाले.
    २००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

• मृत्यू :

•१९५५: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन. (जन्म: २८ मे, १९२१)
•२००३: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर, १९२०)
•२००९: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी, १९२३)
•२०१२: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च, १९५५)

  • जन्म :
    १९४५: अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »