आर. के. लक्ष्मण

आवडल्यास ही बातमी शेअर करा


आज शुक्रवार, ऑक्टोबर २४, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक दिनांक ०२, शके १९४७
सूर्योदय : ०६:३६ सूर्यास्त : १८:०९
चंद्रोदय : ०८:४९ चंद्रास्त : १९:५५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : तृतीया – २५:१९+ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : सौभाग्य – २९:५५+ पर्यंत
करण : तैतिल – १२:०३ पर्यंत
द्वितीय करण : गर – २५:१९+ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १०:५६ ते १२:२२
गुलिक काल : ०८:०२ ते ०९:२९
यमगण्ड : १५:१६ ते १६:४३
अभिजित मुहूर्त : ११:५९ ते १२:४६
दुर्मुहूर्त : ०८:५४ ते ०९:४१
दुर्मुहूर्त : १२:४६ ते १३:३२
अमृत काल : २०:०९ ते २१:५७
वर्ज्य : ०९:२१ ते ११:०९

आज संयुक्त राष्ट्र दिन आणि जागतिक विकास माहिती दिन आहे.

‘कॉमन मॅन’ – आर. के. लक्ष्मण – अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे शिकण्यासाठी लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग आर.केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढे लक्ष्मण पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी दिल्लीला गेले.

हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ब्लिट्झ मध्ये आणि नंतर फ्री प्रेस जर्नल मध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे देखील तेथेच काम करीत असत. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा फ्री प्रेसच्या मालकांचा दंडक होता. म्हणून त्यांनी ‘फ्री प्रेस’ची नोकरी सोडली. त्यानंतर अर्धशतकभर ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये व्यंगचित्रे काढत राहिले. यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्यांचे व्यंगचित्र या दैनिकात नाही असे एकदाही घडलेले नाही.

लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे – चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी असंख्य व्यंगचित्रे काढली आहेत पण त्यांनी कधीही या माध्यमाच्या आडून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत. आर. के. लक्ष्मण यांना सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे अचूक भान आहे. हेच भान त्यांच्या कॉमन मॅन’ मधून व्यक्त होते. कोणत्याही काळातील, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला त्यांचे विधान पटते, रुचते आणि म्हणूनच त्यांची लोकप्रियता दीर्घकाळ टिकून राहिली आहे.

आर.के. लक्ष्मण यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, आणि अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले.

१९२१: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी, २०१५)

पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे ( मूळचे कोलकाता )
त्यांचे काका कृष्णचंद्र डे हे प्रसिद्ध संगीतकार असल्याने घरात संगीताचे वातावरण, होते. साहजिकच मन्नादांवर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. के. सी. डे व उस्ताद डबीर खाँ यांच्याकडून त्यांनी गाण्याची मुळाक्षरे गिरवली. पुढे स्कॅाटिश चर्च कॅालेजमध्ये शिकताना सलग तीन वर्ष संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. संगीतात कारकीर्द करण्यासाठी १९४२ मध्ये के. सी. डे यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले.

मुंबईत के. सी. डे खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास व सचिनदेव बर्मन यांच्याकडे संगीत सहाय्यक या नात्याने त्यांनी उमेदवारी केली. याच काळात हिंदी चित्रपटसंगीताला त्यांना जवळून अभ्यासता आले. एकीकडे सहाय्यक संगीतकाराची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपली मूळ आवड म्हणजे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही सुरूच ठेवले होते. मुंबईत उस्ताद अमन अली खाँ आणि उस्ताद अब्दुल रहेमान खाँ यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे पुढील शिक्षण घेतले.

१९४३ मध्ये रामराज्य या चित्रपटासाठी शंकरराव व्यास यांच्या संगीत दिर्ग्दशनात हिंदी चित्रपटासाठी पहिले पार्श्वगायन करण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र उपर गगन विशाल (मशाल) या सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियता लाभली. संगीतकार शंकर-जयकिशन यांनी त्यांच्या गायकीचा चांगला वापर करुन घेतला. हिंदीसह मराठी, गुजराथी, बंगाली, मल्याळम, कन्नड, आसामी आदी अनेक भाषांतून सुमारे साडेतीन हजार गाण्यांचे पार्श्वगायन त्यांनी केले.

मन्ना डे यांना विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा गौरव करण्यात आला, त्यापैकी , १९७१ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. , २००४ जीवनगौरव महाराष्ट्र शासनाकडून गौरव. , २००५ पद्मभूषण पुरस्कार., २००७ दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. ‘झनक झनक तोरी बाजें पायलिया’ (मेरे हुजूर) या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार. ‘ए भाय जरा देखके चलो’ (मेरा नाम जोकर) या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार.

• २०१३: पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचे निधन. (जन्म: १ मे, १९१९)

  • घटना :

  • १८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
    १८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
    १९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
    १९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याचा उत्सव साजरा केला.
    १९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
    १९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
    १९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
    १९६४: उत्तर र्होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
    १९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
    १९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
    १९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
    २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
    २००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.

• मृत्यू :
• १९९१: ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट, १९१५)
• १९९२: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी, १९१९)
• १९९५: पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन.
• २०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.

  • जन्म :
    १८६८: औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल, १९५१)
    १८९४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै , १९८७)
    १९१०: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.
    १९१४: आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै, २०१२)
    १९२६: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर , २०१२)
    १९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.
    १९६३: भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »