स्मिता पाटील
आज शुक्रवार, डिसेंबर १३, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २२, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०३ सूर्यास्त : १८:०३
चंद्रोदय : १६:०४ चंद्रास्त : ०५:४९, डिसेंबर १४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – १९:४० पर्यंत
नक्षत्र : भरणी – ०७:५० पर्यंत
क्षय नक्षत्र : कृत्तिका – ०५:४८, डिसेंबर १४ पर्यंत
योग : शिव – ११:५४ पर्यंत
करण : कौलव – ०९:०३ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – १९:४० पर्यंत
क्षय करण : गर – ०६:१८, डिसेंबर १४ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : मेष – १३:१९ पर्यंत
राहुकाल : ११:१० ते १२:३३
गुलिक काल : ०८:२५ ते ०९:४८
यमगण्ड : १५:१८ ते १६:४०
अभिजितमुहूर्त : १२:११ ते १२:५५
दुर्मुहूर्त : ०९:१५ ते ०९:५९
दुर्मुहूर्त : १२:५५ ते १३:३९
अमृत काल : ०३:३६, डिसेंबर १४ ते ०५:०४, डिसेंबर १४
वर्ज्य : १८:४९ ते २०:१७
आज रपट जाएँ तो हमेंं ना उठई यों , गगन सदन तेजोमय ही गाणी कानावर पडली की आठवण येते ती – – –
“स्मिता पाटीलची*
वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणा-या स्मिता पाटीलची . त्या जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या.
स्मिता पाटील या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
तिची भूमिका असणारा गुजरातच्या दूध व्यापाऱ्यांवर आधारलेला मंथन (१९७६) हा सिनेमा यशस्वी तर झालाच पण भारतीय सिनेजगतात आजही सिनेमा महत्वाचा मानल्या जातो. १९७७ हे वर्ष तिच्या आयुष्यतील खूप महत्वाचं असं वर्ष ठरलं तिने काम केलेल्या ‘भूमिका’ चित्रपटातल्या रोल साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं. पुढे ‘चक्र’ मध्ये याची पुनरावृत्ती झाली. त्या दशकात तिने शबाना आझमी, ओमपुरी, नसरुद्दीन शाह यांसारख्या कसदार अभिनेत्यांसोबत काम केले पण, यामुळे तिच्या वर समांतर चित्रपटात काम करणारी अभिनेत्री हा शिक्का बसला तो कायमचा. पण कोण काय बोलेल याचा विचार करणारी ती अभिनेत्री नव्हतीच.
त्याच साली आलेल्या जैत ते जैत या चित्रपटामध्ये चिंधी ची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या चित्रकारणाच्या वेळी ती भूमिकेत एवढी समरस होऊन गेली होती कि एखाद्या सामान्य कातकरी स्त्रीप्रमाणे सहजच डोंगर चढायची उतरायची. पुढे तिने गमन, अर्थ, चक्र,बाजार यासारख्या वेगळी धाटणीच्या चित्रपटात पण भूमिका केल्या आणि अभिनयाचा वस्तुपाठ घालून दिला. यापैकी अर्थ मधली ‘कविता संन्याल’ आणि बाजार मधली ‘नजमा’ माझ्या खासच आवडीची.
समांतर चित्रपटांसोबत तिने व्यावसायिक हिंदी सिनेमे ही केले आणि ते ही तितकेच हीट झाले. अमिताभ सोबत ‘नमक हलाल’ मध्ये ‘आज रपट जाये तो’ मध्ये या गाण्यातली तिची ही निराळी अदा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि ती कमर्शियल चित्रपटात सुद्धा तितक्याच सहजपणे काम करू शकते हे सिद्ध झालं.
मग १९८२ साली आला जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ त्यात तिने ‘सुलभा महाजन’ ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनातही ती महीलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते. आपल्या संबंध आयुष्यात ती कायमच सडेतोड राहीली आहे. समाज काय म्हणेल याची तिने कधीच फिकीर केली नाही. राज बब्बर सोबत केलेलं लग्न हे त्याचं उत्तम उदाहरण .
१९८५ साली भारत सरकारने पदमश्री गौरव पुरस्काराने सन्मानीत केले.
• १९८६: अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९५५ – पुणे)
मनोहर पर्रीकर – साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रिकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रिकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला…
गोव्यात भाजपची संघटनात्मक पातळीवर बांधणी करून पक्षाला सत्तेपर्यंत पोहचवण्यात पर्रिकर यांचा सिंहाचा वाटा राहिला. जून २००२ मध्ये गोवा विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली. छोटे पक्ष आणि एका अपक्ष आमदाराच्या पाठिंब्याने पर्रिकर पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पर्रिकर यांनी घट्ट पाय रोवले.
२०१२च्या विधानसभा निवडणुकीआधी पर्रिकर यांनी जनसंपर्क यात्रा काढत जनतेशी संवाद साधला. या यात्रेचं फळ पर्रिकर आणि भाजपला मिळालं व २१ आमदारांसह पूर्ण बहुमतातलं भाजपचं सरकार गोव्यात विराजमान झालं.
पर्रिकर यांच्याच कार्यकाळात उरी हल्ल्याचा बदला म्हणून सप्टेंबर २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देऊन भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राइक घडवला. मार्च २०१७ मध्ये पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. फेब्रुवारी २०१८ मध्ये पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि या आजाराशी चाललेली त्यांची झुंज थांबली.
• १९५५: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म. ( मृत्यू : १७ मार्च २०१९)
- घटना
१९३०: प्रभात चा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९९१: मधुकर ही रालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
२००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर. मृत्यू :
• १९९४: सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचे निधन. ( जन्म: १७ ऑक्टोबर १९१४ )
• १९९६: स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये यांचे निधन. - जन्म :
१८९९: छायालेखक (cinematographer) पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट , १९७६ )
१९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुन , २००५)
१९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा जन्म.