विजय दिन
आज सोमवार, डिसेंबर १६, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २५, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०५ सूर्यास्त : १८:०४
चंद्रोदय : १९:०२ चंद्रास्त : ०८:००
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – १२:२७ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – ०१:१३, डिसेंबर १७ पर्यंत
योग : शुक्ल – २३:२३ पर्यंत
करण : कौलव – १२:२७ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २३:३७ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : ०८:२७ ते ०९:४९
गुलिक काल : १३:५७ ते १५:१९
यमगण्ड : ११:१२ ते १२:३४
अभिजितमुहूर्त : १२:१२ ते १२:५६
दुर्मुहूर्त : १२:५६ ते १३:४०
दुर्मुहूर्त : १५:०८ ते १५:५२
अमृत काल : १५:४१ ते १७:१३
वर्ज्य : १०:२० ते ११:५२
विजय दिन शक्ति शौर्यसाधना दिन – १६ डिसेंबर १९७१ स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक सोनेरी दिवस ! अखंड भारताच्या दोन बाजू खंडित करून पाकिस्तान राष्ट्राची निर्मिती झाली. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्या मध्ये भारत भौगोलिक दृष्ट्या दिसत होता.
भविष्यात पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानला जोडणाऱ्या भागात मुस्लिम बहुसंख्य भाग तयार करून भारताला दक्षिण उत्तर विभागण्याचा मोठा कट होता. ह्या कटावर प्रहार करून शत्रूराष्ट्राला खिळखिळं करून त्याचीच दोन शकले करून राष्ट्रीय एकता व एकसंधता अबाधित राखण्याचा कूटनैतिक व सामरिक यशस्वी प्रयत्न म्हणजेच १९७१ चे युद्ध !
या युद्धात भारताला पराभूत करण्याची वल्गना करणाऱ्यांचे ९३,००० सैनिक भारताने युद्धकैदी बनवले. पाकिस्तानला बिनशर्त शरणागती पत्करावी लागली व बांगलादेश हा स्वतंत्र देश निर्माण झाला. भारतही भविष्यातील विभागणी पासून काही अंशी संरक्षित झाला.
या युद्धात भारतीय सैनिकांनी अभूतपूर्व विजय मिळवला. त्यासाठी काही सैनिकांचे बलिदानही कामी आलं. या विजयाची आठवण म्हणून भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतात.
१९७१: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.
आदय सर्कस चालक विष्णुपंत छत्रे – ब्रिटिश अंमलात अनेक यूरोपीय सर्कशी भारतात येत व प्रमुख शहरी खेळ करून जात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन व भारतीयांची स्वतंत्र सर्कस असावी, हा विचार मूर्त स्वरूपात आणून भारतातील पहिली सर्कस काढणारे आदय सर्कस चालक म्हणजे महाराष्ट्रातील विष्णुपंत छत्रे हे होत. त्यांनी १८७८ मध्ये सांगलीला छत्रे सर्कसची स्थापना केली. ते स्वत: उत्कृष्ट अश्वशिक्षक असून, घोडयांवरील कसरतींची अनेक कौशल्यपूर्ण कामे सर्कशीत करीत.
त्यांनी १८८४ मध्ये विल्सन सर्कस खरेदी करून अनेक यूरोपीय कसरतपटू आपल्या सर्कशीत घेतले. त्यांनी आपल्या सर्कसला ‘गँड इंडियन सर्कस’ हे नाव देऊन भारतभर तसेच परदेशांतही दौरे काढले. छत्रे सर्कशीत असलेले सदाशिव कार्लेकर यांनी १८८३ मध्ये सांगली येथे ‘कार्लेकर गँड सर्कस’ची स्थापना केली. प्रचंड शिकारखाना हे छत्रे सर्कसचे प्रमुख वैशिष्टय; तर त्या काळातील जेंकिन्स व फॅमिलीचे चित्त-थरारक मोटारसायकल उड्डाण हे कार्लेकर सर्कशीचे खास आकर्षण होते, १९४३ मध्ये ती बंद पडली.
छत्रे यांच्या सर्कशीत नाव कमावलेले देवल बंधू यांनी आपली स्वतंत्र ‘देवल सर्कस’ १८९५ मध्ये काढून भारतभर व परदेशांतही दौरे करून चांगली नावारूपाला आणली. ही सर्कस ‘ग्रेट इंडियन सर्कस’ या नावाने प्रसिद्ध होती. १९५७ साली ती बंद पडली. शारीरिक कसरतींचे खेळ व पशूंची कौशल्याची कामे ही या सर्कसची लक्षणीय वैशिष्टये होती. काशिनाथ सखाराम ऊर्फ बंडोपंत देवल हे या सर्कसचे एक मालक भारतातील सर्वोत्कृष्ट विदूषक म्हणून ख्यातकीर्त होते. ‘द बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवली. सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले.
२००२: सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे निधन.
लोकसाहित्य या अभ्यास शाखेला विद्यापीठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर अधिकाधिक ‘जाणतं’ करणाऱ्या संशोधकांच्या परंपरेत डॉ. प्रभाकर मांडे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या रूपाने त्यांनी महाराष्ट्रात या विषयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांची मोठी फळी उभी केली.
महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजित करून या परिषदांमधून डॉ. दुर्गा भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. अशोक रानडे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. तारा परांजपे, डॉ. तारा भवाळकर आदी मान्यवरांचे मार्गदर्शन तरुण अभ्यासकांना मिळवून देण्यात डॉ. मांडे यांचे मोलाचे योगदान होते. लोकसाहित्य परिषद ही एक चळवळच महाराष्ट्रात सुरू झाली. त्याचे नेतृत्व मांडे यांनी केले आणि आजही करीत आहेत. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन, लोककला या विषयांचा अभ्यास अधिकाधिक शास्त्रपूत कसा होईल, याचा विचार डॉ. मांडे यांनी अभ्यासकांमध्ये रुजविला.
लोकसाहित्याचे स्वरूप, लोकसाहित्याचे अंतःप्रवाह, लोकगायकांची परंपरा, लोकरंगभूमी, मौखिक वाङ्मयाची परंपरा, लोकमानस रंग आणि ढंग, मांग आणि त्यांचे मागते, गावगाड्याबाहेर, लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी, कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी, अशा अनेक मौलिक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली व मानववंशशास्त्राच्या अंगाने लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या संशोधनात स्वतः असे सिद्धांतही तयार केले.
सामाजिक अस्वस्थता आणि असुरक्षितता वाढली, की जीवन आधाराच्या नव्या वाटा आपण शोधू लागतो. या नव्या वाटांवर लोककलांच्या पताका मोठया आश्वासक पद्धतीने आपल्याला खुणावतील आणि जगण्याचे नवे बळ देतील हे निश्चित! असे मत डॉ. मांडे अग्रहाने मांडतात.
आदिवासी मूलत: हिंदूच, आदिवासींचे धर्मांतर : एक समस्या, उपेक्षित पर्व, कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी (१९६१ साली लिहिलेल्या पीएच.डीच्या प्रबंधाचे ग्रंथरूप), गावगाडा, जातगाव आणि जातगावाची पंचायत, गावगाड्याबाहेर, चतुरदास विरचित एकादश स्कंध भाषाटीका (हिंदी, संपादित), दलित साहित्याचे निराळेपण अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे
सन २०१० आणि २०१८मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
१९३३ : लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.
- घटना :
- १४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
१७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी.
१८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
१९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
१९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.
१९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९८५: कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर राष्ट्राला समर्पित.
१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली. - मृत्यू :
• १९६०: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)
• २००४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४) - जन्म :
१९२६ : प्रहसन (फार्स) नाट्याभिनेता बबन प्रभू यांचा जन्म
मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार गोष्टी, चुटके किंवा विनोद सांगत असत.
१९३३ : भारत नाट्यम नृत्यातील ज्येष्ठ कलाकार अडायर के लक्ष्मणन यांचा जन्म ( मृत्यू : १९ ऑगस्ट, २०१४ )
१९४९ : दक्षिण भारतीय चित्रपट कला दिगदर्शक पदमश्री पुरस्कार सन्मानित तोट्टा दरनी यांचा जन्म
१९९३ : जगातील सर्वात बुटकी महिला ज्योति आम्गे (2 फीट 0.6 इंच) यांचा जन्म ( नागपूर ) (एकॉन्ड्रोप्लेसिया यानि बौनेपन ह्या आजाराने हि महिला त्रस्त आहे )