भक्त पुंडलिक पुण्यतिथी
![Daily Panchiang](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2022/06/panchang1-e1722857444442.webp?fit=768%2C436&ssl=1)
आज शुक्रवार, फेब्रुवारी ७, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १८ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:११ सूर्यास्त : १८:३५
चंद्रोदय : १३:३७ चंद्रास्त : ०३:३५, फेब्रुवारी ०८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : दशमी – २१:२६ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – १८:४० पर्यंत
योग : इन्द्र – १६:१७ पर्यंत
करण : तैतिल – १०:०७ पर्यंत
द्वितीय करण : गर – २१:२६ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : वृषभ – ०६:२१, फेब्रुवारी ०८ पर्यंत
राहुकाल : ११:२७ ते १२:५३
गुलिक काल : ०८:३६ ते १०:०२
यमगण्ड : १५:४४ ते १७:०९
अभिजितमुहूर्त : १२:३० ते १३:१६
दुर्मुहूर्त : ०९:२७ ते १०:१३
दुर्मुहूर्त : १३:१६ ते १४:०१
अमृत काल : १५:३४ ते १७:०७
वर्ज्य : १०:५६ ते १२:२९
वर्ज्य : ००:०८, फेब्रुवारी ०८ ते ०१:४२, फेब्रुवारी ०८
भक्त पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त होता. प्रचलित आख्यायिकांनुसार पुंडलिक पंढरपुरात स्वतःच्या आईवडिलांची सेवा करीत असताना अचानक तेथे विठ्ठल(पांडुरंग) आला. त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विटेवर तो कंबरेवर हात ठेवून उभा राहिला. पंढरपूरच्या देवळात मूर्तिरूपाने विठ्ठल अजूनही तसाच उभा आहे, असे मानले जाते. स्कंद-पुराणानुसार भक्त पुंडलिकाने मागितलेला वर खालीलप्रमाणे आहे.
इति स्तुत्वा ततो देवं प्राह गद्गदया गिरा ।
अनेनैव स्वरूपेण त्वया स्थेयं ममान्तिके ॥
ज्ञानविज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि ।
दर्शनान्ते भवेन्मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः ॥
– स्कन्दपुराण
आज भक्त पुंडलिक पुण्यतिथी आहे.
विद्यार्थी सहायक डॉ. अच्युतराव आपटे – भारत व बांगला देशांच्या सरहद्दीतून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा व निम्नगंगा (लोअर गँजेस) या नद्यांना सालोसाल येणाऱ्या महापुराचा तडाखा दोन्ही राष्ट्रांना दरसाल बसतो. त्यातून होणारी अपरिमित वित्त व जीवितहानी वाचवण्यासाठी उभय राष्ट्रातल्या पुराची झळ बसणाऱ्या प्रदेशात संयुक्तरीत्या पूरनियंत्रण प्रकल्प राबवण्याचे युनेस्कोने सुचवले. या समस्येची उकल करण्यासाठी ३५० अव्यक्ते (चले) व सुमारे ७१५ समीकरणे एकसमयावच्छेदेकरून सोडवणे अपरिहार्य होते. त्यासाठी गणिती प्रतिकृतींची आखणी करून प्रकल्प मार्गी लावण्याचे शास्त्रज्ञांपुढे असलेले जबरदस्त आव्हान भारत सरकारने विश्वासाने जलविद्युत केंद्रापुढे ठेवले. अर्थातच, अखंड परिश्रम करून सहा महिन्यांच्या अल्पावधीत अच्युतरावांनी या कामात यश मिळवले इतकेच नव्हे, तर त्यांनी त्यांच्या प्रतिकृतीतून युनेस्कोच्या मूळ प्रणालीतल्या त्रुटी दाखवून दिल्या.
अच्युतरावांनी सोडवलेला दुसरा आव्हानात्मक प्रश्न होता.
हुगळी नदीतल्या उपसा केंद्रातून कोलकाता शहराला पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा. बंगालच्या उपसागरातून हुगळी नदीत येणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण खूप असल्याने ते पिण्यायोग्य नसे. सागरातून येणारे पाणी कमीतकमी क्षारयुक्त असावे यासाठी अच्युतरावांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून आधीच्या दहा वर्षांच्या काळातल्या सागराच्या भरती व ओहोटीचा अभ्यास करणे सुकर झाले. परिणामी, हुगळी नदीवरील सर्वांत कमी क्षार असलेले पाण्याचे ठिकाण निवडणे शक्य झाले व तिथल्या उपसा केंद्रातून मिळणारे पाणी पिण्यायोग्य ठरले.
१९५२-१९५५ या अवधीत फ्रान्समधील ग्रिनोबल विद्यापीठात गणिती संशोधनासाठी अच्युतराव राहिले असताना, त्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांवर त्यांचे मार्गदर्शक अत्यंत खूष झाले. या काळात गणिताच्या कुशल प्राध्यापक असलेल्या त्यांच्या पत्नी मधुमालतीबाईदेखील उच्च बीजगणितावर संशोधन करण्यासाठी फ्रान्समध्ये गेल्या. दोघेही अनुक्रमे बी.एस्सी. व पीएच.डी. या उच्च पदव्या संपादन करून स्वदेशी आले. अच्युतरावांच्या संपूर्ण सामाजिक कार्यामागची केवळ प्रेरणाच नव्हे, तर परिपूर्ण शक्ती अशी भूमिका त्यांच्या जीवनात मधुमालतीबाईंनी बजावली.
जगात कुठेही भूकंप झाला तरी जमिनीखाली विशिष्ट खोलीवर बसवलेल्या भूकंपमापन यंत्रावर त्यांची नोंद होते. त्यावर उमटलेला आलेख पाहून भूकंपाची तीव्रता, संभाव्य ठिकाण (एपीसेंटर) व बहुमजली इमारतींना असलेला धोका ओळखता येतो. मात्र, असे यंत्र जमिनीखाली बसवण्यापूर्वीच जर भूकंप झाला, तर आलेखावरून अशी माहिती मिळत नाही.
१९६७ साली, १०/११ डिसेंबरच्या रात्री कोयनेस झालेल्या भूकंपाबाबत असेच घडले. यंत्र जमिनीखाली बसवण्यापूर्वी भिंतीतल्या उंच जागी ठेवले होते. एवढ्यात, रात्री ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला आणि उंच जागी ठेवलेल्या यंत्रावर जो आलेख आला त्यावरून मूळ आलेख मिळवणे, ही शास्त्रज्ञांची एक कसोटीच होती. अशा प्रसंगी, प्रयत्नांची शिकस्त करून अच्युतरावांनी मूळ संभाव्य आलेख मिळवण्यात यश संपादन केले.
फ्रान्समध्ये असतानाच, फ्रेंच सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राहण्या-जेवण्याची मोफत सोय करते हे लक्षात घेऊन अच्युतरावांच्या मनात विद्यार्थी साहाय्यक समितीचे बीज अंकुरले असावे. गणितात मूलभूत संशोधन करून मोठे नाव मिळवण्याची संधी असताना, त्याकडे पाठ फिरवून अच्युतराव समाजकार्याकडे वळले. ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’, ‘इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन’ आणि ‘फ्रेंच मित्र मंडळ’ ही त्यांची तीन सामाजिक अपत्ये. शिक्षणाची इच्छा असूनही गरिबीमुळे ग्रमीण भागातल्या असंख्य मुलांना शहरात राहण्या-जेवण्याच्या सोयीअभावी शिक्षण सोडावे लागते. हे जाणून १९५६ साली विद्यार्थी साहाय्यक समितीची स्थापना करून अच्युतरावांनी विद्यार्थ्यांची अल्पदरात ही सोय केली.
उत्तम संस्कार, व्यक्तिविकासाबरोबर श्रमशक्तीची जाणीव करून देताना समितीच्या मनात ना उपकाराची भावना ना विद्यार्थ्यांच्या लेखी लाचारीची, असे वातावरण ठेवले. गेल्या ४०/४२ वर्षांत मुलांसाठी दोन व मुलींसाठी एक अशी तीन वसतिगृहे बांधली आहेत. तेथे ४०० ते ५०० विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवली जाते.
अशाच प्रकारे मनुष्यबळातली गुंतवणूक (इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन) ही दुसरी सामाजिक संस्था, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील ग्रमीण परिसरात, फुगेवाडी येथे अच्युतरावांनी काढली. तेथे निराधार बालकांवर सुसंस्कार करण्यासाठी बालसदन, नरसी मोनजी तंत्रशाळा उभारण्याबरोबरच ग्रमीण भागातील तरुणांना शेती, दुग्धव्यवसाय, छपाई व इतर औद्योगिक व्यवसायांतले कसब आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देण्याची ही व्यवस्था केली. त्यांतून अनेकांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध झाले. दोन्ही संस्थांत अच्युतराव निर्मळ वृत्तीने विश्वस्त राहून, संस्थांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याबद्दल दक्ष असत.
फ्रेंच मित्र मंडळातर्फे गेली पस्तीस वर्षे फ्रान्सचे नागरिक भारतात येणे आणि भारतीय नागरिक फ्रान्समध्ये जाणे ही व्यवस्था चालू आहे. यामुळे ह्या दोन देशांत सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हायला मदत झाली.यातून अच्युतरावांच्या आंतरभारती दृष्टीची साक्ष पटते.
• २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.
एक भारतीय अभिनेते आणि निर्माते – सुजित कुमार
१९६० ते १९९० च्या दशकात ते १५०न हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये आणि किमान २० भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसले . सुजीत यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. तर हिंदी चित्रपटांमध्ये त्याने खलनायक किंवा चरित्र अभिनेता म्हणून महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. १९६९ च्या आराधना चित्रपटात राजेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांच्यासोबत जीप चालवताना माउथ ऑर्गन वाजवलेल्या मित्राची स्क्रीनवरील सर्वात संस्मरणीय भूमिका होती . १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते २००० च्या दशकापर्यंत सुजीतने प्रामुख्याने चित्रपट निर्माता म्हणून काम केले.
हिंदी चित्रपट – लाल बांग्ला आणि एक साल पहले प्रमाणे १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला हिंदीतील सस्पेन्स फ्लिक्समध्ये सुजीत आघाडीवर होता . आराधना , इत्तेफाक , आन मिलो सजना , हाथी मेरे साथी , अमर प्रेम , मेरे जीवन साथी , रोटी , मेहबूबा , अवतार , आखीर क्यों यांसारख्या चित्रपटांमध्ये तो राजेश खन्ना यांच्यासोबत मुख्य नायक होता. आणि अमृत .
रामानंद सागर यांच्या आंकी , नया रास्ता , जुगनू , हमराही , चरस , धरमवीर , देव आनंदच्या देस परदेस मधील गुप्तहेर या त्यांच्या इतर उल्लेखनीय भूमिकांचा समावेश आहे .
बर्निंग ट्रेन , कामचोर , क्रांतिवीर , तिरंगा आणि बरेच काही. सुजीतने १९८० च्या दशकात अस्मान से ओंचा सारखे लहान बजेट चित्रपट आणि नंतर नंतर दरार १९९६ आणि चॅम्पियन सारखे मोठे बजेट चित्रपट तयार केले .
फिल्म इंडस्ट्रीतील त्यांचे जिवलग मित्र होते, जितेंद्र आणि राकेश रोशन , ज्यांच्यासोबत सुजीत नियमितपणे जिमला जायचा. इतर जवळच्या मित्रांमध्ये निर्माते सावन कुमार टाक आणि रणधीर कपूर यांचा समावेश होता , जे सर्व १९६० च्या दशकाच्या सुरुवातीपासून हिंदी चित्रपट उद्योगात व्यावहारिकरित्या एकत्र वाढले.
भोजपुरी सिनेमा – बिदेसिया , लोहा सिंग , दंगल , पन खाये सैय्या हमारा , चंपा चमेली , पटोह बिटिया , साजन करे कन्यादान, बैरी भैले हमर , नाग पंचमी , सैय्या से भैले मिलनवा , आईल बसंत बहार , बिधाना के ना , यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला. लाल , संपूर्ण तीर्थ यात्रा , सजाई दा मांग हमर , सैय्या मगन पहलवानी मी , गंगा कहे पुकार के , गंगा जैसन भाऊजी हमर आणि गंगा हमारी माई .
कुमार २०१० मध्ये कर्करोगाने निधन पावले.
१९३४: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)
- घटना :
१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.
१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्याची अंगठी.
१९२०: बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.
१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
२०२१ : उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला . उत्तराखंडवर मोठं संकट ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेला व तेथे काम करणारे १५० कामगार बेपत्ता झाले.
• मृत्यू :
२०१५ : सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांचे निधन (जन्म : ७ मे , १९२३ )
- जन्म :
१९३४: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)
१९३८: कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.
१९५१ : स्पष्ट शब्दोच्चार, खर्जातील घनगंभीर स्वर, आणि भावपूर्ण गायन ही ओळख असणारे गायक रवींद्र साठे यांचं जन्म.
१९६४ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय लेखक अशोक कुमार बँकर यांचा जन्म.