जागतिक हिमोफिलिया दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, एप्रिल १७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २७, शके १९४७
सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त : १८:५६
चंद्रोदय : २२:४९चंद्रास्त : ०८:५६
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – १५:२३ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : वरीयान् – ००:५०, एप्रिल १८ पर्यंत
करण : बालव – १५:२३ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०४:१८, एप्रिल १८ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १४:१३ ते १५:४७
गुलिक काल : ०९:२९ ते ११:०४
यमगण्ड : ०६:२० ते ०७:५४
अभिजितमुहूर्त : १२:१३ ते १३:०३
दुर्मुहूर्त : १०:३२ ते ११:२२
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२५
अमृत काल : २२:३९ ते ००:२५, एप्रिल १८
वर्ज्य : १२:०५ ते १३:५१

अनसूया ही कपिल ऋषींची बहीण असुन तीने शिक्षिका म्हणूनही काम केले. तिला सती अनसूया (तपस्वी अनसूया) आणि अत्रि ऋषींची पवित्र पत्नी माता अनसूया म्हणून गौरवले जाते. ती विष्णूचे ऋषी-अवतार दत्तात्रेय, ब्रह्माचे रूप चंद्र आणि शिवाचे क्रोधी ऋषी अवतार दुर्वास यांची आई बनते. अनसूया ही भगवान दत्तात्रय यांची माता आहे.

आज अनुसूया माता जयंती आहे.

हिमोफिलिया म्हणजे रक्त न गोठण्याचा आजार. हा एक अनुवांशिक आजार आहे. आपल्याला काही लागले, जखम झाली की रक्तस्त्राव होतो. पण रक्तातील काही घटकांमुळे हा रक्तस्त्राव लगेच थांबतो. याला रक्त गोठणे असे म्हणतात.

रक्तामध्ये असणारे हे घटक, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या रक्तामध्ये नसतात, किंवा कमी प्रमाणात असतात. तेंव्हा त्याला हिमोफिलिया आहे, असे म्हंटले जाते. रक्तामध्ये एकूण १३ प्रकारचे घटक असतात. आपण याला प्रथिने म्हणू शकतो. यांपैकी एक जरी घटक कमी असला, किंवा नसला, तर रुग्णाला आपोआप रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. किंवा रक्तस्त्राव झाला, तर थांबत नाही.
रक्त न गोठण्याचे २० प्रकारचे आजार आहेत. पण त्यात हिमोफिलिया सर्वसाधारणपणे आढळतो.

आज जागतिक हिमोफिलिया दिन आहे.

.१९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर , १८८८)

“बिनती सुनौ दीन की चित दै, कैसे तब गुन गावै।
मेरे तो तुमही पति तुम गति, तुम समान को पावै।
सूरदास प्रभु तुम्हरी कृपा बिनु, को मो दुःख बिसरावै।।”

१४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.

निसर्गदत्त महाराज – हे अधुनिक युगातील एक ज्ञानी सत्पुरूष व नवनाथ संप्रदायाचे अद्वैतवादी तत्वज्ञानी गुरू होते. त्यांचे जन्मनाव मारुती शिवरामपंत कांबळी होते. त्यांच्या जन्मदिनी हनुमान जयंती असल्याने त्यांचे नाव मारुती असे ठेवण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदलगाव या लहानशा खेड्यात ते लहानाचे मोठे झाले. तरुणपणी ते अनेक गोष्टींवर चिंतन करत असत. गुरूंना भेटण्यापूर्वी अध्यात्मावर त्यांचा विश्वास नव्हता. दीक्षा घेऊन कोणास शरण जायचे नाही असे त्यांनी मनोमन ठरवले होते.

एकेदिवशी सिद्धरामेश्वर महाराज त्यांच्या परिसरात आले असता निसर्गदत्त यांच्या एका मित्राने निसर्गदत्त यांची इच्छा नसतानाही त्यांना सोबत चलण्याची गळ घातली. त्यांच्या मित्राने आपल्यासोबत पुष्पहार व मिठाई घेतली आणि निसर्गदत्त यांना उत्तम पोशाख चढविण्यास सांगितले. निसर्गदत्त जेंव्हा आपले गुरू सिद्धरामेश्वर महाराज यांना भेटले, तेंव्हा गुरूंनी त्यांना आपले डोळे बंद करण्यास सांगितले आणि दीक्षा देण्यास सुरुवात केली. काहीवेळाने त्यांनी निसर्गदत्त यांना डोळे उघडण्यास सांगितले. त्यावेळी स्वतःत काही विस्फोट व्हावा तशी त्यांना अनुभूती झाली आणि त्या क्षणापासून त्यांचे आयुष्य बदलून गेले.

१८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर , १९८१)

भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – भारतीय स्वातंत्र्य – चळवळीतील एक नेमस्त पुढारी व भारतसेवक समाजाचे नेते. पूर्ण नाव वलंगईमन शंकरनारायण श्रीनिवास श्रीनिवास शास्त्री. जन्म तमिळनाडूतील कुंभकोणम् – जवळच्या वलंगईमन या खेड्यात. शिक्षण बी.ए. (१९८८). पुढे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून १८९९ पर्यंत नोकरी.

शास्त्री यांचे जीवन, कार्य व एकूणच राजकीय- सांस्कृतिक दृष्टिकोण यांवर गोपाळ कृष्ण गोखले यांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्याच प्रेरणेने शास्त्रींनी सक्रिय राजकारणात १९०७ नंतर प्रवेश केला. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निधनानंतर ते भारतसेवक समाजाचे अध्यक्षही झाले (१९१५–१९२७). त्यांनी सर्व्हंट ऑफ इंडिया हे साप्ताहिक सुरू केले (१९१८). तत्कालीन मद्रास इलाख्याच्या विधिमंडळात ते सरकारनियुक्त सदस्य होते (१९१३–१९१६). तसेच व्हाइसरॉयच्या मध्यवर्ती कायदेमंडळातही त्यांनी काही वर्षे काम केले.

वसाहतीच्या स्वराज्याचे ते पुरस्कर्ते होते. महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळवळीला त्यांचा विरोध होता. त्यामुळे ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले व राष्ट्रीय उदारमतवादी संघ (नॅशनल लिबरल फेडरेशन) स्थापना करण्यात त्यांनी हिरिरीने भाग घेतला (१९१८). भारतातील ब्रिटिश सरकारच्या वतीने त्यांनी इंग्लंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड वगैरे देशांत विविध कामांसाठी दौरे केले. ब्रिटिश सरकारचे पक्षपाती म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली असली, तरी भारताला स्वराज्य हवे आहे, याचा राष्ट्रीय उदारमतवादी संघाच्या अधिवेशनात (१९२२) स्पष्ट निर्वाळा देऊन त्यांनी आपल्या टीकाकारांना गप्प बसविले.

भारत सरकार व दक्षिण आफ्रिका यांच्यातील गोलमेज परिषदेत त्यांनी भाग घेतला (१९२६). त्यातून केपटाउन करार झाला. आफ्रिकेतील वर्णविद्वेषाविरुद्धही त्यांनी आवाज उठविला. तसेच केनिया व पूर्व आफ्रिकेतील अनिवासी भारतीयांना नागरी हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून दर्बान येथे शास्त्री महाविद्यालय सुरू करण्यात आले.

१९३०-३१ मधील गोलमेज परिषदांना ते सरकारी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. त्यांना ब्रिटिश शासनाने के. सी. एस. आय. ही उपाधी दिली; पण ती त्यांनी नाकारली. त्यांनी महंमद अली जिना यांनी मांडलेल्या द्विराष्ट्र सिद्धांताला विरोध केला होता (१९४५). शास्त्री हे एक व्यासंगी विद्वान व प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे खाजगी जीवन अत्यंत साधे होते. भारतातील सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांना त्यांच्याविषयी आदर वाटत असे. मद्रास (सध्याचे चेन्नई) येथे त्यांचे हृद्‌शूलाने निधन झाले.

• १९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८६९)

  • घटना :
    १९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
    १९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.
    १९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
    १९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
    १९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
    १९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
    २००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.

• मृत्यू :

• १९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१६)
• १९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.
• २००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर, १९२५ )
• २००४: कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचे निधन. ( जन्म: १८ जुलै, १९७२)
• २०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै, १९२६)
• २०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: १७ जुन, १९१२)

  • जन्म :
    १८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च , १९७३)
    १९४२ : उद्योजक, क्रिकेट खेळाडू, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आगाशे यांचा जन्म ( मृत्यू : २ जानेवारी, २००९ )
    १९४५ : भारतीय माजी लष्करप्रमुख , अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल जोगिंदर जसवंत सिंग यांचा जन्म
    १९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदू यांचा जन्म.
    १९५७ : मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचा जन्म ( मृत्यू : १९ डिसेंबर २०१८ )
    १७६१ : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय बिल्यर्ड्झपटू गीत श्रीराम सेठी यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »