आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, सप्टेंबर ८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १७, शके १९४७
सूर्योदय : ०६:२५ सूर्यास्त : १८:४७
चंद्रोदय : १९:१६ चंद्रास्त : ०६:४५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – २१:११ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा – २०:०२ पर्यंत
योग : धृति – ०६:३० पर्यंत
क्षय योग : शूल – ०३:२०, सप्टेंबर ०९ पर्यंत
करण : बालव – १०:२७ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २१:११ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : कुंभ – १४:२९ पर्यंत
राहुकाल : ०७:५८ ते ०९:३०
गुलिक काल : १४:०९ ते १५:४२
यमगण्ड : ११:०३ ते १२:३६
अभिजित मुहूर्त : १२:११ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १३:०१ ते १३:५०
दुर्मुहूर्त : १५:२९ ते १६:१९
अमृत काल : १२:३५ ते १४:०४
वर्ज्य : ०४:५२, सप्टेंबर ०९ ते ०६:२०, सप्टेंबर ०९

आज आंतर राष्ट्रीय शारीरिक उपचार दिन आहे,
आज आंतर राष्ट्रीय साक्षरता दिन आहे.

दिल हूँ हूँ करे, घबराए
घन धम धम करे, गरजाए
एक बूँद कभी पानी की
मोरे अँखियों से बरसाए

वयाच्या १० व्या वर्षी गीत तयार करून गाणाऱ्या भूपेन हजारिका यांनी इंद्रमालती या चित्रपटात भूमिका केली. पुढे १० वी नंतर शिक्षणासाठी गुवाहाटी तसेच बनारस हिंदू विश्वविद्यालयातून राजनीति विज्ञान हा विषय घेऊन एम ए केले तर न्यूयॉर्क मध्ये कोलंबिया विश्वविद्यालय येथे उच्चं शिक्षण घेत पीएचडी केली.

त्यांना १९७५ मध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्रीय फिल्म साठीचा पुरस्कार मिळाला तर १९९२ मध्ये
चित्रपट सृष्टीचा मानाचा दादा साहब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २०११ साली भारत सरकारने पद्म भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला.
ब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव दिले आहे.

१९२६ : भारतरत्न पुरस्कार सन्मानित (मरणोत्तर) संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म ( मृत्यू : ५ नोव्हेंबर, २०११ )

‘जे शोधित होतो जीवनात दिन-रात
ते नाही सापडले कधीही शब्दात
शब्दातूनी शब्दच फिरूनी हाती आला
दोन्हीतूनी अंती अर्थ गळूनिया गेला
कविताही काय अंती एक निसटणे
लाटांची लीला गळ टाकोनी बसणे -‘


वा.रा कांत यांची काही गाणी – त्या तरुतळी विसरले गीत, बगळ्यांची माळ फुले, राहिले

ओठांतल्या ओठांत,
सखी शेजारिणी


कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत – दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. त्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. जिथं त्या काळात मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वतःच्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं.

व्हिएतनाम व बांगलादेश येथील सामाजिक दुरावस्था व शोषणावरही कांतांनी प्रहार केला आहे. क्रांतििदर्शी, प्रकाशपूजन, देहभान जागवून बेभान करणारी कांतांची कविता ही अगदी भावतरल, संवेदनशील व हळुवारही होती. जीवनातील सौंदर्य, सुखदुःख, प्रीतितवियोग, मृत्यू आदी जीवनानुभवांना सजीवपणे प्रकट करीत कांतांची कविता वाचकांना खचीतपणे अंतःर्मुख करणारी आहे. अन् ही कविताच कांतांच्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाची प्रमाण होतं. शब्द माझा धर्म / शब्द माझे कर्म / शब्द हेच वर्म / ईश्वराचे असं म्हणणारे कांत आपल्या अखेरच्या कवितासंग्रहात ‘मावळते शब्द’मध्ये लिहतात –

वार्धक्याने हताश झालेल्या कांतांची या आजारपणातही काव्यलेखनाची उमेद शाबूत होती. तिथेच आपल्या शब्दांना त्यांनी बजावून सांगितलं होतं – ‘मी पंगू झालो म्हणून तुम्ही अपंग होवू नका माझ्या शब्दांनो!’

१९९१ : कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन ( जन्म : ६ ऑक्टोबर, १९१३ )

महाराष्ट्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व पंडित वसंत अनंत गाडगीळ : मूळचे वेंगुर्ला येथील गाडगीळ कुटुंबातील. यांचे वडील अनंत सीताराम गाडगीळ हे कोल्हापूर महालक्ष्मीच्या देवळात पूजारी होते. पण्डितजी पुण्यात लहानपणीच आले आणि पुण्यात आणि संपूर्ण देशात चालते-बोलते संस्कृतज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. शारदा या संस्कृत मासिकाचे संस्थापक संपादक आहेत. शेकडो संस्कृत पुस्तक प्रसिद्ध केलेली आहे.

दर वर्षी ऋषितुल्य व्यक्तींचा सत्कार करण्याची परंपरा श्री. पण्डितजींनी सुरू केली. अंदाजे ४७० लोकांचा आत्तापर्यंत त्यांनी सत्कार केलेला आहे. हा सत्कार अनेक वर्षे टिळक स्मारक मंदिरातील सभांगणात होत होता. श्रृंगेरी मठाचे महाराष्ट्रातील एक प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत. आज ९३ व्या वर्षांत पदार्पण करीत असतानासुद्धा तरुणांसारखी ऊर्जा यांच्याकडे सुस्थिर आहे.
सोरटी सोमनाथच्या देवळांत बाबू राजेंद्र प्रसाद यांच्या समक्ष शपथ घेतली ती, म्हणजे पुढील आयुष्य संस्कृतकरिताच. त्याप्रमाणे त्यांनी संस्कृत भाषेकरिता जे जे करता येईल ते ते सर्व काही केलेले आहे. संस्कृत भाषा न च क्लिष्टा न च कठिणा हे त्यांचे ब्रीद वाक्य अनेक राज्यांमधील शालेय पुस्तकांमध्ये शिकविले जाते. सुलभ आणि सोप्या पद्धतीने चालतं बोलकं संस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे पण्डित वसन्त अनन्त गाडगीळ.

दैनिक सकाळमध्ये सुद्धा कै. ना. भि. परुळेकर यांच्यासोबत वृत्तांकनाचेही काम केले. शिवाय १९५२ ते १९७२ या कालावधीत एक फोटोग्राफर म्हणूनही त्यांनी दै. सकाळसोबत काम केलं. माजी राष्ट्रपती दिवंगत फक्रुद्दीन अली अहमद यांना पुण्यात बोलावून श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आरती करवून घेणारे म्हणून पण्डितजींची ओळख. आज पुण्यात सर्वांत जुने, अनेक आठवणी सांगणारे एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व अनेक वर्षे भाण्डारकर प्राच्य विद्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. तसेच अनेक संस्थांसोबत काम करणारे, सल्लागार म्हणूनही सेवा दिली.

१९३० : पंडित वसंत अनंत गाडगीळ यांचा जन्मदिन. ( मृत्यु : १८ ऑक्टोबर, २०२४ )

  • घटना :
    १८३१ : विल्यम ( ४ था ) इंग्लंडच्या राजेपदी बसले
    १८५७ : ब्रिटिशांच्या विरुद्ध उठावात भाग घेतल्या बद्दल रंगो बापूजी गोखले यांचा मुलगा सीताराम यांच्यासह १४ क्रांतीकारकांना साताऱ्यातील गेंडा माळावर फाशी देण्यात आली.
    १९०० : अमेरिकेत ग्लॅव्हस्टोन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० नागरिक ठार झाले.
    १९४४ : दुसऱ्या महायुद्धात – लंडनवर पहिल्यांदा V २ बॉम्बचा हल्ला झाला
    १९५४ : साऊथ ईस्ट आशिया ट्रीटी ऑरगॅनिझशन ( S E A T O ) ची स्थापना झाली
    १९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.
    १९६६: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
    १९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.
    २०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

• मृत्यू :
•१९६० : पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती, राजकारणी, पत्रकार फिरोज गांधी यांचे निधन ( जन्म : १२ सप्टेंबर, १९१२ )
•१९८१ : तत्वज्ञानी निसर्ग दत्त महाराज यांचे निधन ( जन्म : १७ एप्रिल, १८९७ )
•१९८२ : जम्मू काश्मीर मधील नेते, राजकारणी शेख अब्दुल्ला यांचे निधन ( जन्म : ५ डिसेंबर, १९०५ )
••२०१० : कन्नड व तामिळ अभिनेते मुरली यांचे निधन ( जन्म : १९ मे, १९६४ )
●२०१९ : केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचे निधन ( जन्म : १४ सप्टेंबर, १९२३ )

  • जन्म :
    १८४६ : भारतीय – हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म ( मृत्यू : २७ मे, १९२६ )
    १८८७ : योगी व अध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म ( मृत्यू : १४ जुलै, १९६३ )

१९३३ : जगप्रसिद्ध पार्श्व गायिका आशा भोसले यांचा जन्म दिन ” आशा ताईनां वाढदिवस शुभेच्छा “

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »