शिवतेज दिन, विकट चतुर्थी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, एप्रिल ५, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १५, शके १९४८
सूर्योदय : ०६:२९ सूर्यास्त : १८:५३
चंद्रोदय : २१:५४ चंद्रास्त : ०८:११
शक : १९४८
संवत्सर :पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथितृतीया – ११:५९ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – ००:०८, एप्रिल ०६ पर्यंत
योग : वज्र – १४:४४ पर्यंत
करण : विष्टि – ११:५९ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०१:०३, एप्रिल ०६ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : तूळ – १७:२८ पर्यंत
राहुकाल : १७:२० ते १८:५३
गुलिक काल : १५:४७ ते १७:२०
यमगण्ड : १२:४१ ते १४:१४
अभिजित मुहूर्त : १२:१६ ते १३:०६
दुर्मुहूर्त : १७:१४ ते १८:०४
अमृत काल : १४:२४ ते १६:१०
वर्ज्य : ०४:३६, एप्रिल ०६ ते ०६:२३, एप्रिल ०६

नमामि देवं द्विरदाननं तं यः सर्वविघ्नं हरते जनानाम् ।
धर्मार्थकामांस्तनुतेऽखिलानां तस्मै नमो विघ्नविनाशनाय ॥१॥

मैं उन गजाननदेव को नमस्कार करता हूँ, जो लोगों के समस्त विघ्नों का अपहरण करते हैं। जो सबके लिये धर्म, अर्थ और काम का विस्तार करते हैं, उन विघ्नविनाशन गणेश को नमस्कार है ।

आज विकट चतुर्थी आहे

१६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.
लालमहालात शाहिस्तेखानाविरुद्ध झालेले युद्ध म्हणजे जगाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक होता.

शाहिस्तेखानाची मोहीम अखेरीस – ५ एप्रिल १६६३ – रोजी संपली.

( तिथि नुसार चैत्र शुद्ध अष्टमीचा – हा दिवस शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो. )

भारताचे उपपंतप्रधान जगजीवन राम ( बाबू )- जगजीवन राम ज्यावेळी आपल्या कुटुंबियांसोबत जगन्नाथ मंदिरात गेले, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, आपण मंदिरात जाऊ शकता कारण तुम्ही मोठे नेते आहात, मात्र आपली पत्नी आणि तुमच्यासोबत असलेले बाकीचे लोक मंदिरात प्रवेश करु शकत नाहीत, कारण दलितांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. त्यावेळी त्यांनी मंदिरात जाणे टाळले. उत्तर प्रदेशाच ते ज्यावेळी मुख्यमंत्री राहिले होते, त्यावेळी त्यांनी संपूर्णानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते, त्यानंतर तेथील पारंपरिक लोकांनी त्या पुतळ्याला गंगाजलाची अंघोळ घातली होती. त्यानंतर ते जेव्हा जम्मूमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते, त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आणि ती त्यांची व्यथाही होती, ते म्हणाले की, ‘रोटी और बेटी बराबरी में मिलती है, बिरादरी में नहीं’. आणि हिच खरी भारतातील दाहकता होती. हे सगळं ज्यांच्या वाट्याला आलं त्या नेत्याचं नाव आहे, जगजीनव राम.

भारतातील एक असा नेता ज्याच्या नावावर संसदेत सलग ५० वर्षे जाण्याचा जागतिक विक्रम नोंदविला गेला आहे. जो असा नेता की, भारतातील दलित, शोषित आणि वंचित समाजातून येऊनही राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा लाभलेली. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून ते स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेल्या पहिल्यावहिल्या सरकारमध्ये महत्वाची खाती सांभाळली. संरक्षण मंत्री असताना १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला हार पत्करावी लागली होती. आणि यांच्याच कार्यकाळात बांगलादेशाची निर्मितीही झाली,

1936 मध्ये, वयाच्या 28 व्या वर्षी जगजीवन राम यांना बिहार विधान परिषदेसाठी त्यांचे नाव सूचित करण्यात आले. आणि 1937 मध्ये, डिप्रेस्ड क्लासेस लीगचे नेते म्हणून ते शहााबाद ग्रामीणमधून बिहार विधानसभेवर बिनविरोध निवडून गेले. एवढेच नाही तर त्या निवडणुकीत या पक्षाचे 14 आमदार भरघोस मतांनी विजयीही झाले. या घटनेमुळे ते बिहारचे मोठे नेते झाले आणि त्यानंतर काही दिवसातच काँग्रेसने त्यांना कोंडीत पकडण्याचे काम केले.

दलित-शोषित समाजाचे गंभीर प्रश्न एका बाजूला, स्वातंत्र्य चळवळ दुसऱ्या बाजूला आणि परस्पर राजकारण एका बाजूला होते. या परिस्थितीत मात्र जगजीवन राम यांनी सिंचनावरील कर, अंदमानमधील राजकीय कैदी आणि दुसरे महायुद्ध हे मुद्दे घेऊन त्यांनी त्या काळात बड्या नेत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले, आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्याच वेळी ते ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगच्या स्थापनेत पुढे आले. तेव्हा एक महत्वाची घटनाही घडली. जातीयवादी राजकारण करणाऱ्या हिंदू महासभेच्या एका अधिवेशनात जगजीवन राम यांनी दलितांसाठीही मंदिरे आणि विहिरी उघडण्याचा प्रस्ताव मांडला. हा मोठा कार्यक्रम होता. त्याकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नावर प्रचंड टीका केली, त्याच काळात जगजीवन राम यांनी आपल्या पदाचा वापर करुन विरोधी बाकावरच्या लोकांच्या कार्यक्रमात जाऊन त्यांनी मंदिरे आणि विहिरी खुल्या करण्याचा प्रस्ताव मांडला.

याच काळात भारत छोडो आंदोलन सुरु झाले आणि अनेक नेत्यांसोबतच जगजीवन राम यांना तुरुंगात जावे लागले, मात्र त्या तुरुंगावासानंतर एक चांगली गोष्ट त्यांच्यासाठी घडली, की 1946 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांचे सरकार बनले. नेहरु सरकारच्या काळात जगजीवन राम कमी वयातच मंत्री झाले. नेहरुंच्या मंत्रीमंडळात त्यांना कामगार मंत्री पद त्यांना देण्यात आले. त्यानंतर कामगारांच्या समस्या, अडचणी समजून घेऊन कामगारांसाठी स्वतंत्र कायदे तयार करण्याचे काम सुरु झाले. इतिहासात असं खूप कमी वेळा घडलं आहे जे काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहे. कारण कम्युनिस्टांचे नेते आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेत्यांनीही कामगारांसाठी झोकून देऊन काम केले. मात्र पगार, विमा आणि बोनस आणि कामगारांच्या इतर समस्यासंबंधित कायदे बनवण्याचे श्रेय मात्र एका दलित नेत्याला जाते. आणि त्याच्या समाजाचा कामगार हा एक अविभाज्य भाग होता, आणि हे काम म्हणजे लोकशाहीचे एक सौंदर्य होते. त्यानंतर पुढे जगजीवन राम यांची आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या अध्यक्षपदीही निवड झाली.

राजकारणात आपल्या कामाने ठसा उमटविल्यानंतर ते भारताच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सक्रिय झाले, मात्र त्यावेळी 1966 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या आणि त्यांच्या मंत्री मंडळातही जगजीवन राम मंत्री झाले. त्यांचा मंत्री पदाचा प्रवासही थक्क करुन सोडणारा होता, कारण त्यांनी आपल्या कामावर राजकारणात आपले स्थान निर्माण केले होते. आधी ते कामगार, रोजगार, नंतर अन्न आणि कृषी मंत्री झाले. आणि याच काळात भारतात हरितक्रांतीही झाली. कृषी क्षेत्रातील ही भरारी जगजीवन राम यांचेच हे यश होते.

1969 मध्ये काँग्रेस फुटली आणि जगजीवन राम इंदिरा गांधींसोबत गेले. त्यानंतर इंदिराजी गांधी यांनी त्यांना काँग्रेसचे अध्यक्षही केले. याच काळात ते संरक्षण मंत्री झाले. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांना जे स्थान होते, ते आज नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये अमित शहांचे आहे, असे म्हटले जात होते. त्याच वेळी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, म्हणून भारताच्या इतिहासात संरक्षणमंत्री म्हणून जगजीवन राम यांची ही मोठी कामगिरी नोंदवली गेली आहे.

जगजीवन राम यांच्या कामाची दखल म्हणून बांगलादेशने आपल्या स्वातंत्र्याच्या 41 वर्षांनंतर भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री जगजीवन राम मोठ्या मनाने त्यांचा गौरव केला होता. भारत आणि बांगलादेशच्या लष्कराची संयुक्त कमांड तयार झाली होती त्यानंतरच अंतिम लढाई झाली आणि त्यातूनच बांगलादेशाची निर्मिती झाली, हा त्यांचा पराक्रम आजही बांगलादेश आणि भारतातही सांगितला जातो.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी पुकारल्यानंतरच्या काळात जगजीवन राम यांना पुन्हा कृषी मंत्री पद देण्यात आले. पण आणीबाणीच्या काळात राजकारणाची दिशा बदलली. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जगजीवन राम यांनी त्यांचा काँग्रेस फॉर डेमोक्रसी हा पक्ष स्थापन केला. जनता पक्षाची साथ सोडली. जनता पक्षाला ज्या काँग्रेसची सर्वात जास्त भीती वाटत होती त्या काँग्रेसमधील एक बडा नेता जगजीवन राम त्यांच्यासोबत होता. जानेवारी 1977 मध्ये मार्च महिन्यात निवडणुका घेण्याची घोषणा करण्यात आली, आणि जनता पक्षाच्या नेत्यांची निराशा झाली. मात्र या काळात त्यांच्याबाबतीत एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जगजीवनराम त्यांच्या पक्षात येताच त्यांच्यात पुन्हा जीव संचारला कारण एक मोठी व्होट बँक त्यांच्यासोबत आली होती.

1977 मध्ये निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये जनता पक्षाचा विजय झाला, त्यानंतर मोरारजी देसाई नवे पंतप्रधान झाले तर जगजीवन राम उपपंतप्रधान झाले. या काळातील राजकारणात पंतप्रधान पदाचे खरे दावेदार होते ते जगजीवन राम हेच. मात्र त्यामध्ये वेगळे राजकारण खेळले गेले. दलित चेहरा असल्याने जगजीवन राम यांचे पंतप्रधान होणे भारताच्या लोकशाहीसाठी आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. म्हणूनच 27 मार्च 1977 रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात ते सहभागी झाले नाहीत. पण जयप्रकाश नारायण यांच्या सांगण्यावरून ते नंतर सरकारमध्ये स्वतः सहभागी झाले, आणि त्यांना पुन्हा संरक्षण मंत्री पद देण्यात आले. हे असे झाले असले तरी जनता पक्षाचा प्रयोग फसला होता. जगजीवन राम यांनी त्यांना सोडून काँग्रेस “जे” नावाचा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला होता.

जगजीवन राम यांनी 1937 पासून काँग्रेसचे प्रत्येक पद भूषवले आहे 1940 ते 1977 पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्यही होते. त्यानंतर 1950 ते 1977 पर्यंत त्यांनी केंद्रीय संसदीय मंडळात काम केले होते, ही काँग्रेस पक्षासाठी ही मोठी गोष्ट होती. त्याहूनही मोठी गोष्ट ही की जगजीवन राम हे नेहरूंच्या प्रचंड बहुमतातून मोरारजी देसाईंच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते.

आज प्रचंड बहुमतासाठी नरेंद्र मोदी आणि आघाडी सरकारसाठी अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक केले जाते पण जगजीवन राम यांनी हे खूप वर्षापूर्वीच केले होते. त्या काळात त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार केले नसल्यामुळे काँग्रेसने आधीच आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली होती. त्यानंतर त्यांनी ज्या पक्षाला साथ दिली त्या जनता पक्षानेही तेच केले. त्या काळात ते पंतप्रधान झाले असते तर देशातील एका मोठ्या वर्गाचा आत्मविश्वास आणखी वाढला असता. पण ज्या नेत्याने संसदेतील अनेक खाती हाताळली, काम करताना देशहित जपले, ज्या व्यक्तीने देशाच्या संसदेसाठी 50 वर्षे काम केले अशा जनमाणसातील नेत्याला मात्र भारतरत्न पुरस्कारापासून कायमच वंचित ठेवण्यात आले.

१९०८: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९८६)

घटना :
१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.

मृत्यू :

१९१७: स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे निधन.
१९२२: आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)
१९४०: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे स्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)
१९६४: नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचे निधन.
१९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन. (जन्म: २ जुलै, १९२५)
१९९३: हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)
१९९६: बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचे निधन.
१९९८: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचे निधन.
२००२: दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया यांचे निधन.

जन्म :
१९२०: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)
१९३० : ‘रामनगरी’ ह्या एकपात्री नाट्य प्रयोगाचे १९८० पासून देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग करणारे राम नगरकर यांचा जन्म ( मृत्यू : ८ जून १९९५ )
१९५२ : ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील यांचा जन्म
१९६१ : मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य अभिनेता व जवळपास आठ हजार नाटकांचे प्रयोग करणारे प्रशांत पुरुषोत्तम दामले यांचा जन्म .
१९६६: भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »