*शुगरटुडे*चे लंडनमध्ये कार्यालय, युरोप प्रमुखपदी आशीष के

आवडल्यास ही बातमी शेअर करा
Ashish Kakade, London SugarToday
Ashish K

लंडन : साखर उद्योग, सहकार आणि पूरक क्षेत्रांसाठी समर्पित असलेल्या ‘शुगरटुडे’चे (SUGARTODAY Magazine) लंडनमध्ये नवीन वर्षात कार्यालय सुरू करण्यात आले असून, युरोप प्रमुख पदी वरिष्ठ पत्रकार आशीष के यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते युरोपसह पश्चिमी खंडातील साखर क्षेत्रातील घडामोडींचे विश्लेषण करतील.

साखर उद्योग क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘शुगरटुडे’ची ऑनलाईनसह प्रिंट आवृत्तीदेखील प्रसिद्ध होते. १ जानेवारी २०२६ रोजी ‘शुगरटुडे’ने आपला चौथा स्थापना दिन साजरा केला. याचे औचित्य साधून ‘शुगरटुडे’ने आपली पावले भारताबाहेर ठेवण्याचा संकल्प करून, लंडनमध्ये कार्यालय सुरू केले आहे. त्याचे प्रमुख म्हणून वरिष्ठ पत्रकार आशीष के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारिता, माहिती संप्रेषण क्षेत्रामध्ये ते दोन तपांपासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी इंडिया टुडे, बीबीसी अशा नामांकित माध्यमांमध्ये काम केले आहे.

आशीष के हे मूळचे महाराष्ट्रातील असून, ते २४ वर्षांपासून लंडनमध्ये काम करत आहेत. ‘शुगरटुडे’चे मुख्य संपादक आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार यांनी श्री. काकडे यांचे स्वागत करून, त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री. सुतार यांनी ‘शुगरटुडे’ सुरू करण्यापूर्वी लोकमत, पुढारी, सकाळ अशा नामांकित माध्यमांमध्ये वृत्तसंपादक ते संपादक अशा पदांवर तब्बल ३० वर्षे काम केले आहे, तसेच ते बीव्हीजी या आंतरराष्ट्रीय कंपनीचे माध्यम सल्लागारदेखील होते.

लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे (आयएसओ) मुख्यालय आहे. तसेच ब्रिटनसह युरोपात शुगर आधारित उद्योगांची मोठी चेन आहे, त्यांचा जगाच्या अर्थकारणावर आणि राजकारणावर परिणाम होत असतो, भारत कृषी आधारित उद्योगांची जननी आहे. साखर हे तर कृषी क्षेत्राचे सर्वात महत्त्वाचे उत्पादन आहे. त्यामुळे अशा क्षेत्रात काम करणे अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया आशीष के यांनी व्यक्त केली.

(आशीष के यांचा ईमेल : ashishk@sugartoday.in)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »