व्यथा गुरुजींची…

Sunday Poem
घंटा वाजली, शाळा सुटली,
पोरं दंगा करत घरी पळाली…
खडूची धुळ झटकली पंचाने ,
गुरूजींनी घाम पुसला रुमालाने…
घशाची तहान भागवली पाण्याने,
आठी पडली कामाच्या यादीने …
रात्रीचे साक्षरता वर्ग सुरु करा,
जनगणना करा,कुष्ठरोग्यांची यादी करा…
मासिक तक्ते, हजेरीपट भरा…
सरपंचाच्या मुलाची घ्या शिकवणी,
हेडमास्तरची ऐकताच दटावणी…
आमचे आदर्श साने गुरूजी चितळेमास्तर, हिरवे गुरुजी |
निकाल आमचा शंभर टक्के,
सातव्या वेतनाने आम्ही पक्के..
नाठाळा करितो आम्ही सरळ,
ऐकतो बरळ, परि वागतो करळ…
आम्हीच सांदिपनी अन वशिष्ठ,
मायबापानंतर आम्हीच श्रेष्ठ …
रचनाकार: आहेर वा.र. नाशिक
(कवी साखर उद्योगातील नामवंत सल्लागार आहेत. )
9958782982