आला दिवाळी- दसरा
आला जवळ दिवाळी दसरा
जुन्या आठवणींना द्या घसरा,
दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा
नाव लौकिकाचे सोनं मनसोक्त लुटा ।
आनंदाची उधळण, करा घरात फराळ
द्या वाटा त्याले, बाहेर उभा तराळ,
रामाने केला हो धाराशयी दुष्ट रावण
झाला लंकेचा राजा रामभक्त बिभीषण ।
दिवाळीत दिसू लागलेआसमंतात नवे रंग
वाजवा फटाके सर्व नववर्ष स्वागतात दंग,
मन पाखरू पाखरू,घाला त्याले आवर
गेले आकाशात,आता होतं हो भुईवर ।
बांधा इमले माडी, परी राहा उभे पायावर
ऐका पुढल्या हाका सावध होऊन लवकर,
नका पिटवू आपुल्या कर्तृत्वाचा डांगोरा
व्हा सहनशील, नका मिरवु आपला तोरा ।
आठवा दानी बळीराजा अन याचक वामन
हेच दसरा दिवाळीचे सार ,आपलं भूषण ।।
रचनाकार : आहेर वा.र.नाशिक (9958782982)
(साखर उद्योगातील सल्लागार)