आयटीतल्या सखूचा तोरा
काय गं सखू बोलू का नकू
घडीभर जराशी थांबशील का
माझ्याशी जरासं बोलशील का
बोला दाजिबा, बोला दाजिबा..
आयटीत नोकरीला येशील का
सायबीन माझी होशील का ||1||
काय सांगू बाई, लई मला घाई
बोलायला मला येळंच नाही
हिंजवडीला रातच्याला जमायचं नाही
डेक्कन, सदाशिव सोयीचा हाई
नवीन पीना सेकंडला मारायच्या नाही
फायलीवर फायली धाडायच्या नाही ||2||
घरात बसून करू या आयटीत काम
मी तुझी राधा,तु माझा श्याम
काय गं सखू बोलू का नकू
घडीभर जराशी थांबशील का
माझ्याशी जरा बोलशील का
बोला दाजिबा, बोला दाजिबा
काय गं सखू कॅन्टीनला तरी येशील का
चहा न क्रीम रोल खाशील का|| 3||
काय सांगू बाई, लई मला घाई
बोलायला मला येळंच नाही
पिझ्झा,बर्गर शिवाय खातंच नाही
फायू स्टार शिवाय बसत नाही ||4||
काय गं सखू बोलू का नकू
घडीभर जराशी थांबशील का
माझ्याशी जरा बोलशील का
बोला दाजिबा, बोला दाजिबा
लोणावळा खंडाळा बंगलोरला
जाऊ या दोघं पिकनिकला ||५||
काय सांगू बाई, लई मला घाई
बोलायला मला येळंच नाही
फ्लाइट शिवाय जमणार नाही
रोल्स राईस शिवाय बसणार नाही
आयटीच्या पोरीचा नाद करायचं नाही ||६||
( कै.दादा कोंडके यांची क्षमा मागून)
रचनाकार:आहेर वा.र. (नासिक)
साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत सल्लागार
9958782982