॥ उध्दार पामराचा ॥
लोंबती लक्क्तरे तयाचि, लाळही गळे
विपन्नावस्थेत उभा रस्त्यावर तो पामर बळे।
नाही कुणास चिंता त्याच्या भुकेची
नाही कुणास दया त्याच्या अपंगांची ॥१॥
रूपेरी दौलतीचे धनी वाकुल्या दाखवित
राजरोस पळती आलिशान गाडीत ।
पथिकांचेही गावीही नसे त्याचे आक्रीत
या नि:संग वृतीने आला तो जीव धोक्यात ॥२॥
सरकार दरबारात अर्ज त्याचा फायलीत
हलेना तो वजनाविना म्हणती ती जग रीत ।
रोज करि नमस्कार परि घडेना चमत्कार
आर्जविता नेत्यास तो टाकीतसे फुत्कार ॥३॥
बघुनि त्यास एकदा कळवळला एक दयावंत
उपचार करि बळे नेऊन पथिकाश्रमात ।
केशवपनाचा सोहळा झाला नवी वस्रे ल्याला
खुप दिवसांनी मिष्टान्न खाऊन तृप्त झाला ॥४॥
वेळीच कौशल्य मिळवून विणकामाचे
स्वहस्ते भरजरी शेला विणितसे रामाचे।
तयाचा झुकलेला माथा उन्नत झाला
जगी एका पामराचा उध्दार झाला ॥५॥
रचनाकार : आहेर वा.र., नासिक
बी.ई.एमआयई.बीओई
९९५८७८२९८२