असा मी, असामी…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रम्य नव्हते माझे बालपण
गोळा केले गावगुरांचे शेण,
मला लहानपण दिले देवा
नव्हता नशिबी साखरेचा मेवा |

शाळा काॅलेजात शिष्यवृत्तीची साथ
बंधु नातलगांनी केली खुप मदत,
देह कष्टवून घातला गरिबीला गंडा
मॅट्रिक परिक्षेत लावला झेंडा,
काॅलेजातहि चालला हाच फंडा |

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
भोगले आम्ही यातनामय मोठेपण,
झालो मोठा इंजिनिअर मारी भास
सचोटीची कास, गुणवत्तेचा ध्यास |


केली सेवा एन एच ईसीत, प्रवरेत
कोसाका बलसाड,चलथाण,मढीत,
मिळविले नवे तंत्रज्ञान बाॅयलरात
झेंडा रोवला दिल्लीत अन परदेशात |
पंजाब, युपी बिहार अन गुजरातेत ||


एसटीए, सिस्टा, डीएसटीएच्या अंगणी
मांडला ज्ञान यज्ञ , सहभागी होऊनी,
एसएनएसआय बेळगावची धरली कास
नवविचार एकच ध्यास, एकच ध्यास |
शुन्य टक्के मील बंद तास ||


लाभले भाग्य रूप कावड्याचे
लोकशिक्षणाची गंगा वाहण्याचे,
साखर उद्योगात डंका वाजला
कृतार्थ जीवनाचा आनंद झाला |


म्हणे साखरेचे खाणार त्याला देव देणार
सांगा मधुमेही मी साखर कशी खाणार
असा मी असामी, असा मी असामी !!!


रचनाकार : आहेर वा. र., नासिक
9958782982

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »