कृषी बाबत मोदी अमेरिकेशी कधीच तडजोड करणार नाहीत : डॉ. सुरेश प्रभू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेशी कोणतीही तडजोड करणार नाहीत, असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला .

डॉ. प्रभू यांनी आपल्या या ठाम मतामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मी वाणिज्य आणि उद्योग मंत्री असताना, सर्व देशांशी व्यवहार करताना, विशेषतः जागतिक व्यापार संघटना (WTO) आणि इतर व्यापार वाटाघाटींमध्ये, शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांची काळजी घेणे हेच आमचे मार्गदर्शक तत्त्व होते.   या महत्त्वाच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी अनेक साधनांचा वापर करण्यात आला, असेही त्यांनी अधोरेखित केले.

“अशा महत्त्वपूर्ण बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गंभीरपणे विचार करतात, असा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे,” असे डॉ. सुरेश प्रभू यांनी नमूद केले. या अनुभवाच्या आधारावरच मी मोदींबद्दल हे ठाम मत आणि आत्मविश्वास बाळगतो,” असे डॉ. प्रभू यांनी स्पष्ट केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »