‘गोपूज कारखान्याला ‘स्वाभिमानी’ने ठोकले टाळे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

थकीत बिलावरून हल्लाबोल आंदोलन

वडूज : शेतकऱ्यांच्या थकीत बिलावरून संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोपूज कारखान्यावर शुक्रवारी हल्लाबोल केला. खटाव माणमधील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात प्रशासनाची भेट घेऊन ऊस बिले अदा करण्याची मागणी केली; मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांची बिले अदा झाली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात प्रवेश करत संपूर्ण कारखान्याला टाळे लावले.

शेतकरी संघटनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे कारखान्यामधील कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. दरम्यान, संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कारखान्याची व्यवस्थापकीय संचालक हनुमंत जाधव यांची भेट घेऊन तातडीने बिल अदा करावेत अन्यथा साखर रोखली जाईल, असा इशारा तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे यांनी दिला.

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष वैभव पाटील कार्यकारणी सदस्य संतोष बागल, स्वाभिमानीचे मायणी भाग परिसराचे युवा नेते अनिल कचरे यांच्यासह अनेक स्वाभिमानचे पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, १३ तारखेला बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाहीत, तर १४ तारखेला मुक्काम आंदोलनाची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »