सेनापती तात्या टोपे

आज शुक्रवार, एप्रिल १८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २८, शके १९४७
सूर्योदय : ०६:१९ सूर्यास्त : १८:५७
चंद्रोदय : २३:४३ चंद्रास्त : ०९:४६
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : पञ्चमी – १७:०७ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – ०८:२१ पर्यंत
योग : परिघ – ०१:०४, एप्रिल १९ पर्यंत
करण : तैतिल – १७:०७ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०५:४८, एप्रिल १९ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : वृश्चिक – ०८:२१ पर्यंत
राहुकाल : ११:०३ ते १२:३८
गुलिक काल : ०७:५४ ते ०९:२८
यमगण्ड : १५:४७ ते १७:२२
अभिजितमुहूर्त : १२:१३ ते १३:०३
दुर्मुहूर्त : ०८:५१ ते ०९:४१
दुर्मुहूर्त : १३:०३ ते १३:५४
अमृत काल : ०३:२५, एप्रिल १९ ते ०५:०९, एप्रिल १९
वर्ज्य : १७:०१ ते १८:४५
आज आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन आहे.
स्वातंत्र्यवीर सेनापती तात्या टोपे :- यांचा जन्म १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यात झाला. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.
१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती, पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.
नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता.
शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.
तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.
७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेऱ्यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, देशाभिमान अन् हौतात्म्याचे समाधान मात्र होते. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आले.
या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तसे तात्या टोपेंचे पुतळे मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी आहेत. भोपाळला तात्या टोपे नगर (टी.टी. नगर) नावाची पेठ आहे, तात्या टोपे स्टेडियम आहे, शेजारी टोपेंचा भव्य पुतळाही आहे.
• १८५९: स्वातंत्र्यवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन.
१८५८: स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ – मुरुड)
- घटना :
१३३६: हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.
१७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.
१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.
१८३१: युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली.
१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
१८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.
१९१२: टायटॅनिक मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन कार्पेथिया हे जहाज न्यूयॉर्कला पोचले.
१९२३: पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली.
१९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.
१९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.
१९३६: पेशव्यांची राजधानी असणार्या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.
१९५०: आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.
• मृत्यू :
• १८९८: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा अर्थातच बलिदान दिन (जन्म: २४ जून १८६९)
• १९६६: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट, १८८३ )
• १९७२: विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)
• १९९५: पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते यांचे निधन.
• १९९९: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२ – जयपूर)
• २००२: महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष शरद दिघे यांचे निधन. (जन्म : १० ऑक्टोबर, १९२४)
- जन्म :
१७७४: सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १७९५)
१८९९ : कोंकणी कवी, प्रकाशक व मुद्रक काशीनाथ श्रीधर नायक यांचा जन्म
१९१६: हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी, १९९८)
१९६२: हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लन यांचा जन्म.