राज्यात ऊसगाळपाचा वेग वाढला

आतापर्यंत ६६५ लाख टनांचे गाळप
पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगामात यंदा मोठी गती पाहायला मिळत आहे. राज्यात ६६५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत (४८० लाख टन) हे प्रमाण तब्बल २०० लाख टनांनी जास्त आहे. साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्याचा सरासरी साखर उतारा ९.२५% असून आतापर्यंत ६१५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
विक्रमी गाळप: सध्या दररोज १० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३६० लाख क्विंटल साखर उत्पादित झाली होती, यंदा हे उत्पादन १९४ लाख क्विंटलने वाढले आहे.
कारखान्यांची स्थिती: राज्यात सध्या एकूण १९९ साखर कारखाने सुरू आहेत, ज्यामध्ये ९७ सहकारी आणि १०१ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे.
- विभागवार आघाडी:
पुणे विभाग: १५९ लाख मेट्रिक टन गाळपासह राज्यात आघाडीवर.
सोलापूर व कोल्हापूर: प्रत्येकी १४८ लाख मेट्रिक टन गाळप.
इतर विभाग: अहिल्यानगर (८४ लाख टन), नांदेड (७० लाख टन) आणि छत्रपती संभाजीनगर (६५ लाख टन).




