थोरात कारखान्याकडून अपघातग्रस्त सभासदांच्या कुटुबियांना मदत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर : येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने सर्व सभासदांचा दोन लाख रुपये विमा उतरवला असून अपघातग्रस्त झालेल्या दोन सभासदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांच्या धनादेशाचे वितरण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

संगमनेर येथील साखर कारखान्याच्या अतिथीगृहात तालुक्यातील कोल्हेवाडी येथील स्व. साहेबराव पुंडलिक वामन व आश्वी बुद्रूक येथील स्व. जाखोजी राणू पिलगर यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, शेअर्स विभागाचे गीताराम साबळे आदी उपस्थित होते.

थोरात सहकारी साखर कारखान्याने आर्थिक शिस्त काटकसर व पारदर्शकता जपताना शेतकरी व सभासदांचे हित जोपासले आहे. कारखान्याने सुरक्षितता म्हणून सर्व सभासदांचा दोन लाख रुपयांचा अपघातग्रस्त विमा उतरवला आहे. मागील काही महिन्यात आश्वी बुद्रूक येथील जाखोजी पिलगर यांचा नगर-मनमाड हायवेवर दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला, तर कोल्हेवाडी येथील साहेबराव कुंडलिक वामन यांना मोटरसायकलवर मागून वाहनाने धडक डोक्याला गंभीर दुखापत हाऊन त्यांचा मृत्यू झाला.

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या सहकार्याने काढलेल्या वैयक्तिक विमा अपघात योजनेमधून त्यांना दोन लाखांचा विमा अपघात मिळून दिला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कायम सभासद शेतकरी यांची काळजी घेतली. शेतकरी व सभासदांवर संकट आले, त्या-त्या वेळी कारखाना मदतीला धावला. आमच्या कुटूंबियावरही आघात झाल्याने कारखान्याने अत्यंत मोलाची मदत केली, अशा भावना वामन व पिलगर यांच्या कुटूंबियांनी व्यक्त केल्या.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »