संत सेना महाराज पुण्यतिथी
आज सोमवार, सप्टेंबर ११, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद २० शके १९४५
सूर्योदय : ०६:२५, सूर्यास्त : १८:४५
चंद्रोदय : ०४:००, सप्टेंबर १२. चंद्रास्त : १६:४३
शक सम्वत : १९४५
संवत्सर : शोभन
दक्षिणायन
ऋतू : वर्षा
चंद्र माह : निज श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वादशी – २३:५२ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – २०:०१ पर्यंत
योग : परिघ – ००:१४, सप्टेंबर १२ पर्यंत
करण : कौलव – १०:३९ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २३:५२ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : ०७:५८ ते ०९:३०
गुलिक काल : १४:०८ ते १५:४०
यमगण्ड : ११:०३ ते १२:३५
अभिजित मुहूर्त : १२:१० ते १३:००
दुर्मुहूर्त : १३:०० ते १३:४९
दुर्मुहूर्त : १५:२८ ते १६:१७
अमृत काल : १२:५० ते १४:३८
॥विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये॥१॥
॥श्रीमुकुट रत्नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय॥२॥ – संत सेना महाराज
सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरून सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात, अशी त्याची जीवन यात्रा अखेर पर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले.
जिथे जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनर्वैभव प्राप्त झाले राजा बिरसिंहांनी त्याचे स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाच रूप ङोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चितंनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अङकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले ‘जाता पंढरीसी सूख वाटे जीवा’ असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते.
आज संत सेना महाराज पुण्यतिथी आहे.
“अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागतानं माझं हृदय भरून आलं आहे. या स्वागताबद्दल मी जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीनं आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, करोडो हिदूंच्या वतीनं आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. पूर्वेकडील देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे, असं या व्यासपीठावरून सांगणाऱ्या वक्त्यांचेही आभार मानतो.“
“जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असं नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मांतील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या व आजही त्यांचं पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे.”
*१८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर मांडलेल्या विचारांनी भाषण गाजले. *
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !
- कवी अनिल
साहित्यिक कवी अनिल- मूर्तिजापूर ह्या गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा अभ्यासक्रम करीत असतानाच त्यांचा कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय झाला, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर होऊन, प्रेमाची ६ ऑक्टोबर १९२९ रोजी विवाहात परिणती झाली.
पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कवी अनिलांनी कलकत्त्याला प्रयाण केले. तेथे त्यांना अवींद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी व नंतर सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे त्यांची सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यांनी १९५६ साली दिल्लीच्या राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्राच्या मुख्याधिकारीपदावर व पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाच्या सल्लागार ह्या पदांवर त्यांच्या नेमणुका झाल्या.
कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी – १० चरणांची कविता – हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.कवी अनिलांना इ.स. १९७९ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.
१९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे, १९८२)
घटना :
१२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
१७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
१७९२: होप हिरा चोरला गेला.
१९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
१९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
१९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.
१९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
१९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
१९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.
१९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
१९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
१९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
२००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
२००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.
मृत्यू :
- १९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)
- १९६४: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
- १९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.
- १९८७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)
- १९९३: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.
- १९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९)
- २०११: भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन. (जन्म: १२ मे, १९७०)
जन्म :
१८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)
१८९५: भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)
१९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२)
१९११: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)
१९१५: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)
१९५० : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा जन्म दिवस.
(संकलन : संजय सोहोनी, पुणे) (सकलन सहकार्य : डॉ. वासुदेव शंकर डोंगरे, पुणे)
आपला दिवस मंगलमय जावो