आजचे पंचांग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, सप्टेंबर ३, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १२, शके १९४७
सूर्योदय :०६:२४
सूर्यास्त :१८:५१
चंद्रोदय : १५:४४
चंद्रास्त०२:४९, सप्टेंबर ०४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह भाद्र : पद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : परिवर्तिनी एकादशी – ०४:२१, सप्टेंबर ०४ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – २३:०८ पर्यंत
योग : आयुष्मान् – १६:१७ पर्यंत
करण : वणिज – १६:१२ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०४:२१, सप्टेंबर ०४ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : धनु – ०५:२१, सप्टेंबर ०४ पर्यंत
राहुकाल : १२:३८ ते १४:११
गुलिक काल : ११:०४ ते १२:३८
यमगण्ड : ०७:५७ ते ०९:३१
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१३ ते १३:०३
अमृत काल : १८:०५ ते १९:४६
वर्ज्य : ०७:५८ ते ०९:३९

आध्यात्मिक गुरू श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर

‘का फेडित पापताप! पोसवीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप ॥’
पंत महाराज म्हणत, “भक्तांचे दुःखच माझे दुःख; भक्तांचे सुखच माझे सुख. पाहिजे ते कर, पण मला विसरू नको. तुझ्या योगक्षेमचा भार मजवर घालून निश्चित राहा. तुझे सर्वस्वाची काळजी मला आहे. परमर्थसिद्धर्थ विनाकारण कष्ट नको. निष्काम भजनी रम. ज्यास त्याचेप्रमाणे वागत जा. मोक्ष-पंथ ध्वज उभारू नको. बसल्या ठिकाणी सर्वकाही प्रवृत्ती निवृत्ती-वैभव पुरवून देतो.”

पंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले. व त्याहून अधिकच अध्यात्म – विद्यादानाचे कार्य केले. त्यांचे बंधू पाच. त्यांना पंतांनी शिक्षण देऊन पुढे आणले. व त्यांच्या भरभराटीतच स्वत:चे समाधान मानले. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत.

श्री बालमुकुंद / बाळाप्पा (मूळ नाव श्री बाळाजी अनंत कुलकर्णी), यांचे कडून त्यांना गुरु दीक्षा घेतली व त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले.

सन १८८३ पासून पंतांची वृत्ती योग्याभ्यासावरून भक्तीकडे वळली. मन भजनात रंगू लागले. सहज काव्य-स्फूर्ति होऊ लागली. त्यांचा काव्यसंग्रह ‘श्रीदत्तप्रेमलहरी’ (पुष्प १ले) या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे काव्य नानाविध रसांनी व भावनांनी ओथंबलेले आणि त्याबरोबर तत्त्वज्ञानाने रसरसलेले असे आहे. तसेच गीतासार, अमृतानुभव, श्रीदत्त प्रेम लहरी इ. वाङ्मय लेखन केले.

इ. स. १९०३पासून पंतांची प्रकृति ठीक राहिनाशी झाली. त्यांनी शिक्षकीपेशाचा राजीनामा देऊन, अखंड अवधूत- चरण – सेवेला भरपूर सवड काढली व ते भजन, प्रवचनात रंगून राहू लागले. गुरूबद्दल नितांत प्रेम हे त्यांचे एकमेव सूत्र. गुरू भक्तीने ते बेभान होत असत. पंतांची भक्ती प्रेमस्वरूप व स्वरूपानुसंधान करणारी होती. त्यांनी ज्ञानभक्तीचे महत्त्व गायिले आहे.

१८५५: आध्यात्मिक गुरू श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर ( दत्तोपंत रामचंद्र कुलकर्णी ) यांचा जन्म ( तारखेप्रमाणे )(- श्रावण वद्य ८ शके १७७७ ) निर्याण: अश्र्विन वद्य ३ शके १८२७, दिनांक १६-१०-१९०५, (५१ व्या वर्षी)

लयभास्कर लक्ष्मण पर्वतकर तथा खाप्रुमामा – खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरुन त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते. १९१९ साली पं. विष्णु पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या लयकारीमुळे अनेक संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.

लयीच्या ज्ञानामुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरुन त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत.उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या हाताने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या हाताने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरुन समेवर आणणे त्यांना सहज जमत असे.

त्यांनी अनेक नविन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे ‘परब्रह्मताल’ (१५.७५ पावणेसोळा मात्रा).[ संदर्भ हवा ]त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे.
१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक ‘लयभास्कर’ हि पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना ‘तालकंठमणि’ हि पदवी देण्यात आली.

• १९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर यांचे निधन.( जन्म : – १८७९ )

  • घटना :
    ३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.
    १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
    १९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.
    १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.
    १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.
    २०२० : जपानच्या दक्षिण किनाऱ्याजवळील भागात एक मालवाहू जहाज बुडाले. या जहाजातील ५८०० गायींना जलसमाधी मिळाली.

• मृत्यू :
• १९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८९२)
• १९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९०)
• २०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन यांचे निधन. ( मृत्यू : २ सप्टेंबर, २०१४ )

  • जन्म :
    १९१४ : रा. स्व. संघ कार्याचा दक्षिण भारतात पाया भक्कम करणारे ज्येष्ठय प्रचारक , (सम्राट सवाई गंधर्व यांची शास्त्रीय संगीत क्षेत्रात काम करण्याची विंनती बाजूला ठेऊन ) एम . ए व कायद्याची पदवी घेतल्यानांत १९४१ पासुन संघाचे प्रचारकी जीवन व्रत स्वीकारणारे सहसरकार्यवाह श्री यादवराव कृष्णराव जोशी यांचा जन्म ( मृत्यु : २० ऑगस्ट , १९९२ )
    १९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे २००८)
    १९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म. ( मृत्यू:२० मार्च, २०१५ )
    १९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)
    १९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म.
    १९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २०१२)
    १९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा जन्म.
    १९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »