आज हनुमान जयंती

आवडल्यास ही बातमी शेअर करा


आज गुरुवार, एप्रिल २, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १२, शके १९४८
सूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:५२
चंद्रोदय : १९:१६ चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शक : १९४८
संवत्सर :पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माहचैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – ०७:४१ पर्यंत
नक्षत्र : हस्त – १७:३८ पर्यंत
योग : ध्रुव – १४:२० पर्यंत
करण : बव – ०७:४१ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २०:०८ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : कन्या – ०६:२८, एप्रिल ०३ पर्यंत
राहुकाल : १४:१५ ते १५:४७
गुलिक काल : ०९:३७ ते ११:१०
यमगण्ड : ०६:३२ ते ०८:०४
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:०७
दुर्मुहूर्त : १०:३९ ते ११:२८
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२४
अमृत काल : ११:१८ ते १२:५९
वर्ज्य : ०२:१४, एप्रिल ०३ ते ०३:५७, एप्रिल ०३

॥ श्रीआंजनेय द्वादशनामस्तोत्रम् ॥
हनुमानंजनासूनुः वायुपुत्रो महाबलः ।
रामेष्टः फल्गुणसखः पिंगाक्षोऽमितविक्रमः ॥ १॥
उदधिक्रमणश्चैव सीताशोकविनाशकः ।
लक्ष्मण प्राणदाताच दशग्रीवस्य दर्पहा ॥ २॥
द्वादशैतानि नामानि कपींद्रस्य महात्मनः ।
स्वापकाले पठेन्नित्यं यात्राकाले विशेषतः ।
तस्यमृत्यु भयंनास्ति सर्वत्र विजयी भवेत् ॥

हनुमान हे चिरंजीव आहेत म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेथे मारुती राया हजर असतो.

रामभक्त हनुमान, दास मारुती, वीर मारुती अशा विविध नावांनी व गुणांनी ओळखली जाणारी देवता शक्ती व बुद्धी दाता अशा हनुमान देवतेचा आज जन्मोत्सव आहे.

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला

छत्रपती शिवरायांच्या संघर्षमय आयुष्यात ते अगदी जिद्दीने लढले. एक कुशल प्रशासक म्हणून आजही त्यांचा आदर्श घेतला जातो. अनेक लढाया, मोहिमा शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने जिंकल्या. तेजस्वी, प्रेरणादायी, आदर्श अशा राजाला पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम! आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांमधील एकतरी गुण अंगिकारुया आणि पुढील पिढीपर्यंत पोहचवूया.

पराक्रमी योद्धा, कुशल रणनीतिकार, वीर महानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!

आज जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरुकता दिन आहे

१८९१: टीबी कुन्हा – या पोर्तुगीज नावात , पहिले किंवा मातृ आडनाव डे ब्रागांका आहे आणि दुसरे किंवा पितृ आडनाव कुन्हा आहे . ट्रिस्टाओ दे ब्रागांका कुन्हा टीबी कुन्हाम्हणून ओळखले जाणारे, हे एक पोर्तुगीज राष्ट्रवादी आणि वसाहत विरोधी कार्यकर्ते होते. “गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे, ते गोव्यात पोर्तुगीज राजवट संपवण्याच्या पहिल्या चळवळीचे संयोजक होते.

१८९१ : टीबी कुन्हा यांचा जन्म ( मृत्यू : २६.सप्टेंबर , १९५८ )

अखिल भारतीय कीर्तीचे पतियाळा घराण्याचे प्रख्यात गायक बडे गुलाम अली खाँ
त्यांचा जन्म लाहोर, पाकिस्तान येथे झाला. त्यांचे घराणे गायकवादकांचे असून ते मूळ कसूर (जि.लाहोर) गावचे राहणारे होते. पतियाळा घराण्याच्या आकर्षक व विविध अंगानी परिपूर्ण अशा गायकीचा परिचय भारतात सर्वत्र करून देण्यात बडे गुलाम अलीखाँचा वाटा फार मोठा आहे. त्यांचे वडील अलीबक्ष व चुलते कालेखाँ हे दोघेही पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक फतेह अली यांचे शिष्य. अलीबक्ष गायनही करीत व दिलरूबाही उत्तम तऱ्हेने वाजवीत असत.

अलीबक्ष काश्मीरच्या महाराजांच्या दरबारी गायक होते. बडे गुलाम अलीखाँ व त्यांचे कनिष्ठ बंधू बरकत अलीखाँ हे दोघेही वडिलांजवळच संगीताचे पहिले पाठ शिकले. १९१९ मध्ये लाहोर संगीत संमेलनात त्यांनी पहिल्यांदा जाहीर गायन केले. गुलाम अलीखाँ यांचा आवाज गोड व ग्रहणशक्ती तीव्र असल्यामुळे ते वयाच्या विसाव्या वर्षांपासूनच उत्तम तऱ्हेने गाऊ लागले. त्यानंतर कोलकाता व अलाहाबाद येथील संगीत संमेलनातील त्यांचे सादरीकरण गाजले. स्वतंत्र मैफली करून, गायक म्हणून त्यांना १९२७ नंतर कीर्ती मिळू लागली.

पंजाबमधील तसेच कोलकाता येथील संगीत परिषदांमध्ये १९४०-४२ पर्यंत बडे गुलाम अलीखाँ यांनी चांगलेच नाव कमाविले. १९४४ साली भरलेल्या ‘विक्रम संगीत परिषदे’त त्यांनी आपल्या कलेने मुंबईकरांना थक्क करून सोडले.

देशाच्या फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले होते; मात्र पुन्हा ते भारतात परतले व मुंबईत येऊन राहिले. ख्याल, ठुमरी, भजने इ. प्रकार सारख्याच समर्थपणाने व गोडव्याने गाणारे सर्वढंगी व अद्वितीय गायक म्हणून त्यांची कीर्ती सर्व देशभर पसरली. विशेषतः पंजाबी ढंगाचे ठुमरी गायक म्हणून त्यांचा खास लौकीक होता. ‘सबरंग’ या टोपणनावाने त्यांनी अनेक ख्याल व ठुमऱ्या रचल्या.

त्यांनी मुगले आझम या चित्रपटात गाण्यासाठी त्या काळातील सर्वाधिक पार्श्वगायनाचे मानधन घेतले होते. त्यांनी गायलेल्या का करू सजनी आए ना बालम, याद पिया की आए, प्रेम जोगन बनके, नैना मोरे तरस रहे, कंकर मार जाए या ठुमरी खूप लोकप्रिय झाल्या.
आवाजाचा लगाव, सुरेलपणा व भरदारपणा, गायकीतील सौंदर्य व लोच, तरल कल्पकता, नावीन्य, विविधता आणि भावनाप्राधान्य ही बडे गुलाम अलीखाँ यांच्या गायनाची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये होती. १९५७ साली त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमीने त्यांना पुरस्कार दिला व भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन गौरविले (१९६२). त्यांचे सुपुत्र मुनव्वर अलीखाँ हे देखील नामवंत गायक होते.

बडे गुलाम अलीखाँ १९६१ साली अर्धांगवायूच्या विकाराने आजारी पडले आणि पुढे सात वर्षांनी हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले. भारतीय टपाल खात्याने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण केलेले आहे.

१९०२: पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल १९६८ – हैदराबाद, तेलंगण )

घटना :
१८७०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
१८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.
१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
१९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.

• मृत्यू :

• १९३३: क्रिकेट खेळाडू महाराजा के. एस. रणजितसिंह यांचे निधन. यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात. (जन्म: १० सप्टेंबर, १८७२ )
• १९९२: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते आगाजान बेग ऊर्फ आगा यांचे निधन.
• २००९: गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१७)

  • जन्म :

१८९८: हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९९० – मुंबई, महाराष्ट्र)
१९०७ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार यांचा जन्म ( मृत्यू : १३ ऑगस्ट, १९८८ )
१९२६: कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९७९)
१९४२: भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »