आज विषुव दिन आहे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, सप्टेंबर २३, २०२३

युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १ शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३४
चंद्रोदय : १३:४५ चंद्रास्त : ००:४७, सप्टेंबर २४
शक सम्वत १९४५ शोभन
ऋतू : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – १२:१७ पर्यंत
नक्षत्र : मूळ – १४:५६ पर्यंत
योग : सौभाग्य – २१:३१ पर्यंत
करण : बव – १२:१७ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २३:२४ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : धनु
राहुकाल : ०९:२९ ते ११:००
गुलिक काल : ०६:२७ ते ०७:५८
यमगण्ड : १४:०२ ते १५:३३
अभिजितमुहूर्त : १२:०७ ते १२:५५
दुर्मुहूर्त : ०६:२७ ते ०७:१६
दुर्मुहूर्त : ०७:१६ ते ०८:०४
अमृत काल : ०८:४२ ते १०:१६
वर्ज्य : १३:२३ ते १४:५६
वर्ज्य: ००:०२, सप्टेंबर २४ ते ०१:३३, सप्टेंबर २४

आज गौरी विसर्जन आहे.
तसेच प्रथेप्रमाणे काही घरातील श्री गणरायाचे सुद्धा विसर्जन होते ( दीड दिवस, पाच , सात किंवा गौरी गणपतीबरोबर अथवा अनंत चतुर्दशीला सुद्धा )

आज विषुव दिन आहे (अंग्रेजी मध्ये ‘इक्विनॉक्स’)
पृथ्वीवर सर्वत्र समसमान दिवस व रात्र असते

ढीली करो धनुष की डोरी, तरकस का कस खोलो ,
किसने कहा, युद्ध की बेला चली गयी, शांति से बोलो?

किसने कहा, और मत बेधो हृदय वह्रि के शर से,
भरो भुवन का अंग कुंकुम से, कुसुम से, केसर से?

कुंकुम? लेपूं किसे? सुनाऊँ किसको कोमल गान?
तड़प रहा आँखों के आगे भूखा हिन्दुस्तान।

१९०८: पद्मभूषण पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल, १९७४)

अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रज्ञ – डॉ. राजा रामण्णा एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. एक विख्यात अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रज्ञ होते. एक अतिशय परिपूर्ण तंत्रशास्त्री (टेक्नॉलॉजिस्ट), समर्थ प्रशासक, प्रेरक पुढारी, उपजत संगीतकार, संस्कृत पंडित आणि तत्त्वज्ञ होते. तसेच सर्वोपरी ते एक परिपूर्ण मनुष्यमात्र होते.

सैद्धांतिक आणि प्रायोगिक भौतिकीच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांचा सहभाग मोलाचा आहे. ते काही तथाकथित हस्तिदंती मनोर्‍यांत राहणारे वैज्ञानिक नव्हते. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील; होमी भाभा आणि विक्रम साराभाई ह्यांच्यासारख्या त्यांच्या उद्यमी (इलस्ट्रिअस) पूर्वसुरींच्या आदर्शांवर मार्ग चालत; रामण्णांनी, भारताच्या स्वदेशी अणुसामर्थ्यास दृढ पायावर उभे करण्यात लक्षणीय भूमिका बजावली.

भारताचे ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रम घडवण्यात त्यांचा सहभाग मोलाचा होता. वस्तुतः भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्जकांत, रामण्णा सर्वात यशस्वी मानले जातात. त्यांचा भारताच्या शांततामय अणुस्फोटांतील सहभाग तर सर्वश्रुतच आहे.

भारतातील पहिला शांततामय अणुप्रयोग, १८ मे १९७४ रोजी, राजस्थानातील वाळवंटात करण्यात आला होता. पुढे रामण्णांनी वर्णन केले त्यानुसार, “भारतातील अणुसंशोधनाच्या इतिहासात पोखरणमधील प्रयोग ही एक लक्षवेधी घटना होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने ज्या क्षेत्रातील प्रगतीस पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला, त्या तंत्रशास्त्रीय प्रगतीची ती सिद्धता होती.”

रामण्णा एक कट्टर देशभक्त होते. ते सहजच परदेशात स्थायिक होऊ शकले असते, पण विकसित देशात राहण्याच्या सुखसोयींचा त्यांनी त्याग केला आणि होमी भाभांच्या हाकेला ओ देऊन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सशक्त स्वदेशी पाया विकसित करण्याच्या भारतीय प्रयासात ते सहभागी झाले. देशात कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यास त्यांनी हातभार लावला.

रामण्णांना संगीतात सखोल अभिरुची होती. ते स्वतःही एक परिपूर्ण संगीतज्ञ होते. त्यांनी संगीतावर “द स्ट्रक्चर ऑफ रागा अँड वेस्टर्न म्युझिक” ह्या नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. बंगलोर स्कूल ऑफ म्युझिकच्या स्थापनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना तत्त्वज्ञानातही रुची होती. योगातही स्वारस्य होते. त्यांना तरल आणि आस्वाद्य विनोदाची जाण होती. ते अत्यंत साधे आणि सर्वांना सहज पोहोचता येण्यायोग्य व्यक्ती होते.

राजा रामण्णा एक समर्थ प्रशासक होते. त्यांनी अनेक प्रतिष्ठेची पदे भूषवली होती. ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक होते. (१९७२-७८ आणि १९८१-८३). ते संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार होते; डी.आर.डी.ओ. चे प्रमुख संचालक आणि भारत सरकारचे संरक्षण संशोधन सचीवही होते (१९७८-८१). ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. (१९८४-८७).

जे.आर.डी. टाटांनी निर्माण केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज, बंगलोर चे ते पहिले संचालक होते. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेले होते (जानेवारी ते नोव्हेंबर १९९०). रामण्णा राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते (ऑगस्ट १९९७-ऑगस्ट २००३)

पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते. ज्या ज्या अधिकारात त्यांनी कार्य केले, त्या त्या अधिकारात त्यांनी अभियानांच्या उत्साहाने काम केले. अशातऱ्हेने अखेपर्यंत कार्यरत राहून, डॉ. राजा रामण्णा यांनी २४ सप्टेंबर २००४ रोजी जगाचा निरोप घेतला. देश एका रसिक संरक्षण शास्त्रज्ञाला मुकला.

२००४ : शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचे निधन ( जन्म : २८ जानेवारी, १९२५ )

‘श्रम हीच पूजा हे तत्त्व पाळत जिवंत असेपर्यंत माझी काम करण्याची इच्छा आहे’ असा निर्धार व्यक्त करणाऱ्या विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. असिमा चॅटर्जी. —

डॉ. इंद्र नारायण मुखर्जी आणि कमलादेवी या बंगाली दांपत्याचे हे पहिले अपत्य. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर, १९१७ रोजी कलकत्ता (आता कोलकाता) येथे झाला. पेशाने डॉक्टर असले तरी मुखर्जी यांना वनस्पतीशास्त्रात, विशेषतः औषधी गुणधर्म असणाऱ्या देशी वनस्पतींचा अभ्यास करण्यात विशेष रस होता. हेच बाळकडू असिमा यांना बालपणी मिळाले. पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या संशोधनाचा पाया त्यांच्या बालपणीच घातला गेला.

१९३२ मध्ये असिमा बंगाल सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ‘बेथून कॉलेजिएट स्कूल’ मधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. १९३६ मध्ये ‘स्कॉटिश चर्च कॉलेज’ मधून त्यांनी बसंती दास सुवर्णपदकासह पदवी प्राप्त केली. स्कॉटिश चर्च कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागातील त्या एकमेव विद्यार्थिनी.
आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र राय आपल्या वेतनातून विद्यापीठाला देणगी देत असत. यातूनच त्यांनी असिमांना पाठ्यवृत्ती मिळण्याची व्यवस्था केली. त्यांचे संशोधन वनस्पतीजन्य नैसर्गिक पदार्थांचे रसायनशास्त्र आणि कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्र या विषयावर होते.

त्यांनी प्रामुख्याने अल्कलॉईड (नैसर्गिक नत्रयुक्त कार्बनी संयुग – यामध्ये किमान एक तरी नायट्रोजनचा अणू असतो) आणि कुमारिन (Coumarin – बेन्झोपायरॉन वर्गातील सुगंधी कार्बनी संयुग) या पदार्थांचा अभ्यास केला. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना १९४० मध्ये कलकत्ता विद्यापीठाचे सुवर्णपदक आणि नागार्जुन पारितोषिक मिळाले.

१९४२ मध्ये प्रेमचंद रॉयचंद स्टुडंटशिप आणि अतिशय मानाच्या मुअॅट सुवर्णपदकाने (Mouat gold medal) त्यांना गौरवण्यात आले. १९४४ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एससी.) पदवी घेतली. भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारी ही पहिली महिला. डॉ. प्रफुल्लचंद्र राय, डॉ. एस. एन. बोस, डॉ. मेघनाद सहा यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. सन १९४० ते १९५४ या काळात त्यांनी लेडी ब्रेबॉर्न कॉलेज येथे प्राध्यापक आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पहिले. १९४४ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात मानद अधिव्याख्याता म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

लेडी ब्रेबॉर्न कॉलेज आणि विद्यापीठात अध्यापन आणि संशोधन चालू असताना असिमांना परदेशी जाण्याची संधी मिळाली.

१९४९ मध्ये त्या अमेरिकेला रवाना झाल्या. अमेरिकेतील ‘विस्कॉन्सीन विद्यापीठातील’ प्रा. एल. एम. पार्क्स यांच्या प्रयोगशाळेत, ‘कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे प्रा. एल. झेकमायस्टर यांच्या प्रयोगशाळेत तर, झ्यूरिक विद्यापीठात नोबेल विजेते शास्रज्ञ प्रा. पॉल करीर यांच्या प्रयोगशाळेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

तेथे त्यांनी नैसर्गिक ग्लायकोसाइड (Glycosides – शर्करेचा रेणू अन्य रेणू किंवा गटाशी जोडल्याने निर्माण होणारे संयुग. वनस्पतींमध्ये हे संयुग निष्क्रीय अवस्थेत साठवले जाते), कॅरोटीनॉईड्स (Carotenoids- वनस्पतींमध्ये आढळणारे रंगद्रव्य) आणि प्रोव्हिटॅमिन (Provitamin – शरीरात चयापचय क्रियेद्वारे याचे जीवनसत्वात रूपांतर होते) यांचा अभ्यास केला. परदेशी संशोधनाचा हा अभ्यास त्यांना समृद्ध करून गेला.

सन १९५० मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांनी लेडी ब्रेबॉर्न कॉलेज आणि कलकत्ता विद्यापीठात पुन्हा आपला पदभार स्वीकारला आणि संशोधनही पुढे चालू ठेवले. त्या काळाचा विचार केला तर, ‘नैसर्गिक घटकांचे रसायनशास्त्र अभ्यासणे’ म्हणजे एखादा अवघड गड सर करण्यासारखे होते.

औषधी वनस्पतींची उपयुक्तता आपल्याला ज्ञात होती आणि त्यांचा वापर अनेक शतकांपासून आपण करत आहोत. पण त्या मागची जैविक प्रक्रिया मात्र माहीत नव्हती. या औषधी घटकांचा अभ्यास करण्यासाठी वनस्पतींमधून हे घटक वेगळे करणे आवश्यक असते. पण वनस्पतींमधील या घटकांचे प्रमाण अतिशय सूक्ष्म असल्याने हे घटक वेगळे करणे हेच मोठे आव्हान होते. त्यानंतर या घटकांची रेण्विय रचना अभ्यासणे हे दुसरे आव्हान.

१९४० च्या दशकात, जेव्हा असिमांनी आपले संशोधन सुरु केले, तेंव्हा आजच्यासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. म्हणूनच असिमांनी केलेल्या कामाचे महत्व शब्दातीत आहे.

असिमांनी वनस्पतींमधील अनेक औषधी घटक वेगळे करून त्यांचे रासायनिक गुणधर्म अभ्यासले. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत., तर याहीपुढे जाऊन हे घटक प्रयोगशाळेत निर्माण करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि त्यामध्ये त्या यशस्वीही झाल्या.
त्यांचा सप्तपर्णी या प्रजातीचा अभ्यास अत्यंत महत्वाचा समजला जातो. त्यांनी सप्तपर्णी (Alstonia Scholaris), चिरायत (Swertia Chirata), कुटकी (Picrorphiza Kurroa) आणि सागरगोटे (Caesalpinia Crista) या वनस्पतींपासून हिवतापावरील औषध विकसित केले.

हिवतापावरील प्रसिद्ध औषध क्विनाईनला पर्याय म्हणून हे औषध वापरले जाते. पुढे त्यांनी चतुष्पत्री आणि जटामान्सीपासून आयुष-५६ हे अपस्मार या आजारावरील प्रभावी औषध विकसित केले. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. तसेच हे औषध अतिशय कमी किंमतीत उपलब्ध होते.

या दोन्ही औषधांसाठी ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ रीसर्च इन आयुर्वेद अँड सिद्ध’ या संस्थेकडून त्यांना पेटंट मिळाले. ही औषधे नंतर अनेक औषध कंपन्यांनी बाजारात आणली. या संशोधनामुळे औषधनिर्माणशास्त्राची दिशाच बदलून गेली. दुष्परिणाम विरहीत औषधोपचाराला महत्त्व आले. कर्करोगाच्या उपचारातील केमोथेरपीमध्ये वापरले जाणाऱ्या ‘विन्का अल्कलॉइड’चाही त्यांनी अभ्यास केला. हे अल्कलॉइड विशिष्ट प्रकारच्या सदाफुली वनस्पतीपासून मिळवले जाते.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय वनौषधींचा अभ्यास करणारे स्वतंत्र आयुर्वेदिक हॉस्पिटल असावे, हे त्यांचे सुरुवातीपासूनच स्वप्न होते. यासाठी बंगाल सरकारकडून त्यांना ‘सॉल्ट लेक सिटी’ येथे साडेतीन एकर जागा मिळाली. त्याचबरोबर संस्थेच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून चार कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यांच्या अथक प्रयत्नातून ‘रीजनल रीसर्च इन्स्टिट्यूट’ (आता ‘सेंट्रल रीसर्च इन्स्टिट्यूट’) ही संस्था उभारली. या संस्थेमध्ये नवनवीन औषधे विकसित करून त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.

असिमांना अनेक मानसन्मान मिळाले. १९६० मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (ता इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडेमी) च्या सभासद म्हणून त्या निवडून आल्या. १९६१ मध्ये अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘शांतीस्वरूप भटनागर’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला.

१९७५ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरवले. विद्यापीठ अनुदान आयोगाने १९८२ चा सर सी. व्ही. रामन’ पुरस्कार बहाल केला.

१९१७: ‘पद्मभूषण’ पुरस्कार सन्मानित भारतीय रसायनशास्त्रज्ञ आसिमा चॅटर्जी यांचा जन्म. ( मृत्यू: २२ नोव्हेंबर, २००६)

घटना :
१८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
१८४६: अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
१८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.
१९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.
१९०८: कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली.
१९३२: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
१९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
२००२: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

मृत्यू :
•१९६४ : नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन ( जन्म : २७ एप्रिल, १८८३ )
•१९९९ : मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन ( जन्म : १६ ऑगस्ट, १९४३ )
•२००४ : जादूगार कांतीलाल गिरीधारीलाल उर्फ के. लाल यांचे निधन ( जन्म : १० एप्रिल, १९२४ )

जन्म :
१९०३: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांविरोधात ‘चले जाव’ घोषणा तयार करणारे ‘चले जाव’ युसूफ मेहेर अली यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९५०)
१९११: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म. ( मृत्यू : २ ऑक्टोबर, १९९९ )
१९१९: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर , २०१०)
१९२०: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर, १९८७)
१९४३: अभिनेत्री तनुजा यांचा जन्म.
१९५०: समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.
१९५२: क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.
१९५७: पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »