साखर आयुक्तालयांतर्गत तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

साखर आयुक्तालयातील सहसंचालकपदी प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती
पुणे : साखर आयुक्तालयांतर्गत कार्यरत तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश २ जुलै रोजी राज्य शासनाने जारी केले आहेत. साखर आयुक्तालयातील सहसंचालकपदी (प्रशासन) प्रकाश अष्टेकर यांची बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये सहनिबंधक गट ‘अ’ संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांची येथील साखर आयुक्तालयातील सहसंचालक (साखर-प्रशासन) प्रवीण फडणीस यांच्या बदलीने रिक्त झालेल्या साखर सहसंचालकपदी बदली करण्यात आली; तर लातूर विभागीय सहनिबंधक सुनील शिरापूरकर यांची बदली अष्टेकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालकपदी केली; तर शिरापूरकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या लातूर विभागीय सहनिबंधकपदावर प्रवीण फडणीस यांच्या बदलीचे आदेश शासनाने जारी केले आहेत.