त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक बुधवारी
मुंबई : साखर कामगारांच्या मागण्यांबाबत स्थापन करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक येत्या बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. सर्व समिती सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पाठपुराव्यामुळे साखर कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात प्रतिनिधी मंडळाबरोबरच, साखर कामगार महासंघ, राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन या संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. शिवाय शासन आणि साखर कारखाना मालकांचेही प्रतिनिधी समितीत आहे.
ही बैठक मुंबईतील साखर संघाच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता सुरू होईल. नवा वेतन करारसह इतर मागण्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.